Posts

Showing posts from August, 2025

स्वातंत्र्य आणि श्रीकृष्ण

  स्वातंत्र्य आणि श्रीकृष्ण ज्या श्रीकृष्णाचा जन्म शत्रूच्या काटेकोर नियंत्रणात असलेल्या एका काळकोठडीत, पारतंत्र्यात झाला आणि जन्मापासूनच ज्याचा स्वातंत्र्यलढा सुरू झाला; आई वडिलांची तटातूटही बरी पण साक्षात मृत्यूची टांगती तलवार असलेलं पारतंत्र्य नको म्हणून, आईच्या स्तनांपासून बळजबरीनी दूर करून, देवकीच्या हुंदक्यांची परवा न करता वसुदेवाने   ज्याला नंदाच्या स्वातंत्र्याच्या अंगणात नेऊन पोचवंलं; सूर्य किरणांची तिरीप येताच जग उजळून जावं तसे, ज्याने छोट्याशा गावातील, भोळ्या-भाबड्या स्वतःच्या संसारात लिप्त झालेल्या, संसारापुढे भविष्यच नसलेल्या गवळणींना भवतापापासून स्वातंत्र्य देणारं, उजळवून टाकणारं तत्त्वज्ञान दिलं; ज्याने कंस, शिशुपाल, जरासंध, जयद्रथ इतकच कशाला तर भीष्म द्रोणांसारख्या अनेका अनेकांना मोक्षाचा मार्ग सुलभ करून, दुराचारी अमलातून जनतेला मुक्त करून उर भरून श्वास घेण्याचा अनंद दिला; ज्याने कुटिल, कट कारस्थानी कौरवांच्या राजकारणात फसलेल्या वनवासी पांडवांना वनवासातून सोडवून, स्वातंत्र्याचं   आणि धर्माचं/जनहिताचं राज्य स्थापन केलं; लांड्यालबाड्या, अयोग्य वर्...