Posts

2 सप्टेंबर- आज नारळ दिवस!

  2 सप्टेंबर- आज नारळ दिवस! नारळाचं उंच झावळीदार झाड मला फार आवडतं. वारा येताच जाहिरातीमधल्या सुंदरीप्रमाणे वार्‍यावर सार्‍या झिपर्‍या वार्‍याच्या दिशेने सोडून   वार्‍याच्या सोबत खोडासकट मंदमंद हालणार झाड पाहूनच मला ते फार आनंदी वाटतं. कायम उत्साहाने सळसळत असत. ‘समुद्र आहे का कुठे जवळ’ म्हणून उंच वाढून आकाशातून डोकावून बघत असतं. समुद्र किनारपट्टीला वाढणारे माड कायम नार्सिसस सारखे समुद्रात डोकावून डोकवून बघत   आपलं सुंदर रुपडं न्याहाळत असतात. समुद्राच्या दिशेने वाढल्यास आपले सर्व खाली पडणारे नारळ समुद्र सुरक्षित कुठेतरी किनार्‍याला लावेल आणि तेथे ते रुजतील, माझा वंश दूर दूर वाढेल ही सुप्त इच्छाही त्यात असते. समुद्राशी प्रेमाच्या बंधानं बांधलं गेलेलं झाड जवळ इमारत किंवा भिंत असेल तर मात्र घाबरतं आणि त्याच्यापासून दूर वाढण्याचा प्रयत्न करतं.   नारळाचे प्रकार तरी किती! बुटका नारळ, उंच नारळ, सिंगापुरी नारळ , फिलिपिनी नारळ, मलेशियन नारळ, उंच बाणवली नारळ, चेन्नगी नारळ, सनंगी नारळ, ह्या कमी की काय !----परवा मारवाड्याच्या दुकानात ‘एक नारळ दे’ म्हणताच तो   बाहेरच्या...

तुकाराम बीज-

  तुकाराम बीज- कुठल्याही चमत्कारांवर माझा विश्वास नाही . तरूणपणी हा ताठरपणा, कडकपणा जरा अजूनच जास्त असतो. एक बंगाली मैत्रिण आणि मी एकदा तुकारामबीजेला देहूला जाऊ या का? म्हणून ठरवत होतो. सर्वांनी सांगितलं, ‘तेव्हा देहूला खूप गर्दी असते हं, उगीच जाऊ नका.’ आम्हालाही पटत होतं. पण ज्या नांदुरकी वृक्षावरून तुकोबाराय सदेह वैकुंठाला गेले त्याची पानं दुपारी बरोबर बारा वाजता सळसळतात आणि तुकोबारायांचं तेथील निसर्गात भरून राहिलेलं अस्तित्व जाणवतं असं जे म्हणतात त्याचा प्रत्यय येतो का नाही हे पहायला आम्ही दोघी उत्सुक होतो. आणि कसं काय माहित नाही पण, आमच्या मनातील शंका वा लोकश्रद्धेवर आमच्या मनात उत्पन्न झालेला संदेह पाहून तुकोबोरायांनी थेट निमंत्रणाचा खलिताच पाठवला असावा. त्याच दिवशी मैत्रिणीच्या पतिदेवांना ऑफिसच्या कामासाठी गाडीने देहूवरून पुढे कुठेतरी कामाला जायचं होतं.  त्यांनी आम्हाला देहूला सोडायचं मान्य केलं. आणि ज्याच्यासाठी केला होता अट्टाहास – त्या नांदुरकीच्या ओढीने आम्ही देहूला पोचलो. अकरा साडे अकरा वाजले असावेत. प्रचंड उन्हाने आमचा ताबा घेतला. त्यात जनतेचा महासागर लोटले...

‘सर गुलगुल द बुलबुल’

Image
  Dear बुलबुल!   मी जेथे जेथे पतीसवे नवीन बदलीच्या गावी जायचे तेथे तेथे जवळच्याच झाडाच्या फांदीवर, कधी वेलाच्या कमानीवर तर कधी कुंडीतल्या झाडावरच तू तुझी वाटीसारखी गोलगोल सुबक सुंदर घरटी बांधून तुझाही संसार थाटायचास. कावळा चिमण्यांच्या अरसिक काड्यांच्या बोजड घरांहून तुझी ही वेगळी सुंदर वाटीसारखी सुबक घरटी मला फार आवडत. तुझ्यासवे मांजर, मुंगुस, साप, सरडे आदि एकमेकांचे शत्रू असलेले अतिथीही घरी हजर होत. आणि तुझ्या पिलांना वाचवण्याची अजून एक नसती जबाबदारी माझ्यावर येऊन पडे. वरवर तुझ्यावर डाफरत मी तुझ्या संसारात समरस होऊन ती पार पाडू लागे. तुझा फास्ट कलर आपल्या सस्य श्यामल देशाला अगदी शोभेसा! तू काही स्थलांतरि पक्षीही नाहीस. ब्रह्म मुहूर्ताला ऊठायची तुला पिढ्यानु पिढ्या लागलेली सनातन सवयही तीच! तरी तुझा जरा आगाऊ ‘स्नॉबिश’ पणा पाहिला की तू जरा अंतर राखूनच मानवी जीवनात वावरतोस असं वाटतं वा तुझा शिष्ठपणा पाहून तुला फार जवळ कोणी केलं नसावं. शुक सारिका मोरांना जवळ करणार्‍या देवदेवताही तुझ्यापासून जरा फटकूनच असतात.   कदाचित अलेक्झांडरच्या शिरस्राणासारखा दिसणारा तुझा तुरा तुल...

3 गंधवती (सुजला सुफला सस्यश्यामला)

‘‘सुजला सुफला सस्यश्यामला’’ 3 ‘‘ गंधवती ” - आपली वसुंधरा ही गंधवती आहे. सर्व सुगंधांचं आगर. पावसाचे चार थेंब तापलेल्या मातीवर पडताच मातीचा अस्सा सुगंध दरवळायला लागतो की मन वेडावून जातं. असा गंध जगात दुसरा सापडणार नाही.   अन्नपूर्णा स्तोत्रात सर्व प्राणीमात्रांना अन्न पुरवणारी शिवाची पत्नी पार्वती ही दुसरी तिसरी कोणी नसून उर्वी म्हणजे पृथ्वी असल्याचा उल्लेख आहे. (उर्वी सर्व जनेश्वरी- श्लोक 7) ज्या प्रमाणे आपण ध्वज हा राष्ट्राचं प्रतिक मानतो त्याप्रमाणे संपूर्ण पृथ्वीच्या मध्यभागी असलेल्या भारतभूमीला आपण जगाचं प्रतिक मानतो. (पूर्वी zero meridian ही काल्पनिक रेखा भारताच्या मध्यातून उज्जयनीतून जाते असं सर्वत्र मानलं जायचं. ब्रिटिशांच्या सत्तेनंतर ती इंग्लंडमधून जाते असं मानू लागले.) आपल्या भारतभूमीचं वर्णन करताना श्री जगद्गुरू शंकराचार्य म्हणतात, ‘‘ह्या भारतभूमीच्या, ह्या उर्वीच्या, ह्या पार्वतीच्या अंगाला अत्यंत सुगंधी उटी लावलेली आहे. त्यात केशर, चंदन, आगरू, वाळा अशा सुगंधी वनस्पती आहेत. आपल्या भारतभूमीचा नकाशा पाहिला तर भारतभूमीच्या कपाळाच्या जागी असलेल्या काश्मिरमधे केशराची शे...

2 ‘‘ नदीचा जन्मदिवस ’’ (सुजला सुफला सस्यश्यामला)

‘‘सुजला सुफला सस्यश्यामला’’ 2 ‘‘ नदीचा जन्मदिवस ’’ एकदा वसंतपंचमीला आम्ही काहीजण IRCTC तर्फे मध्यप्रदेशात ओंकारेश्वराच्या दर्शनाला गेलो होतो. ओंकारेश्वर हे कावेरी आणि नर्मदा नद्यांच्या संगमावर असलेलं ज्योतिर्लिंग आहे. (ही कावेरी कर्नााटकातील नव्हे.... मध्यप्रदेशातील) तेव्हा तेथे सर्व घाट सजवले जात होते सर्वत्र सुंदर रोषणाई केली गेली होती. देवळांवर विविध रंगी उजेडाचे झोत सोडले होते. आमची राहण्याची सोय नर्मदेच्या तिरी, मध्यप्रदेश टूरिझमच्या ‘Temple View’ यात्रीनिवासात केली होती. रात्री जाग आल्यावर रात्रीच्या नीरव शांततेत समोर वाहणारा नर्मदेचा वेगवान प्रवाह, ओंकारेश्वर मंदिर आणि 108 फूट उंच बाल शंकराचार्यांचा पुतळा प्रकाशाच्या रोषणाईत उजळून गेलेले दिसत होते. मनाला प्रसन्न करत होते. तो वेगवान प्रवाह पाहून वारंवार नर्मदाष्टक जिभेवर रेंगाळत होतं.   पुढे पुढेचि धावतो जलौघ नर्मदे तुझा मिळावयासि सिंधुलाचि ओढ लागली तुला तरंगमालिका असंख्य रम्य सौम्य सुंदरा तुझ्या पदास भूषवी अनंत ह्या अनंत ह्य...