॥ श्री गणेशाय नमः ॥ अर्पण पत्रिका - ज्या ज्या भारतीय पूर्वजांनी आजचं सुंदर मॉरिशस उभारण्यासाठी आयुष्य खर्ची घातली , ज्या आपल्या परिवा रा ला सुखी करण्यासाठी ते इतक्या दूरवर येऊन राबराब राबले , तो त्यांचा प्रेमळ परिवार ---- ती त्यांची मातृभूमी , तो भारताचा किनारा ज्यां ना परत कधीच दिसला नाही . भारताचं स्वप्न बघता बघताच ज्यांची आयुष्यच संपून गेलं त्या माझ्या भारतीय बांधवांसाठी हे पुस्तक सादर अर्पण – मॉरिशसच्या अंतरंगात – दोन शतकांपूर्वी भारतीय संस्कृतीचं बीज मॉरिशसच्या खडकाळ मातीत जाऊन पडलं . तेथील खडक फोडून ते तिथे रुजलं . नुसतच रुजलं नाही तर भारताच्या मातीतून आपल्या हृदयदलांमधे भरून नेलेल्या भारतीय संस्कृतीच्या वारशावर ते फोफावलंही . मॉरिशसच्या मात...
Posts
Showing posts from June, 2022