21 परतीचे वेध -
21 परतीचे वेध - नेहमी प्रमाणे नवीन ठिकाणी गेल्यावर आम्ही आप्त - स्वकीयांना बोलवत राहिलो , ते येत गेले . मॉरिशसला आप्त - स्वकीयांना बोलावण्याचा माझ्या मनात बराच काळ राहून गेलेला वेगळाच हेतू होता . आम्ही दिल्लीला असतांना आमच्या आजूबाजूला राहणार् या अनेक जणांचे नातेवाईक बाहेरच्या देशात असत . ते त्यांच्याकडे जाऊन त्याच्या सुरस गोष्टी सांगत . त्याकाळी मराठी लोकांचे नातेवाईक अभावानेच बाहेरच्या देशात असत . आणि ते असले तरी त्यांना भेटायला जाण्याचा खर्चही कोणाला परवडणारा नसे . मला माझे मराठी आप्त - स्वकीय `` आपल्या कोणाकडेतरी ’’ जाऊ शकले हा फार मोठा आनंद त्यातून मिळत होता . ह्या साध्याभोळ्या लोकांना मॉरिशसचं तिकिट कुठे आणि कसं काढावं हाही प्रश्न पडे . कणादच्या ऑफिसमधेच ही सोय होती . ह्यावेळेला मी शहाणी झाले होते आणि कणादही . येणार् या पाहुण्यांच्या बॅचेस बनवून दर पंधरा दिवसानी त्यांना मॉरिशसला पाठवायचं काम तो करत होता . एक बॅचनंतर घर आवरायला आणि पुढच्या बॅचसाठी सामान ...