गोकुळातील संघर्ष - पूतना, तृणावर्त आणि इतर
गोकुळातील
संघर्ष -
आपल्या सहा लेकरांचे
आणि एका आदिमायेचा
जीव पणाला लावून बलराम आणि कृष्ण हे दोन जीव वाचविण्यात
देवकी आणि वसुदेव
यशस्वी
झाले.
ह्या वाचवलेल्या
जीवाला
जन्मतःच
अजून किती लढाया लढायच्या
होत्या,
किती संघर्षांना
तोंड द्यायचे
होते,
त्याला
गणतीच नाही.
मुसळधार
पावसात
रोरावणार्या,
तुफान वेगाने
धावणार्या
यमुनेला
पार करून गोकुळात
पोचायचे
होते.
त्याला
जवळ पडलेल्या
टोपल्यात
घालून वसुदेव
निघाला.
सार्या
जनतेच्याच
आशा आकांक्षा
कृष्ण रूपात अंकुरित
झाल्या
होत्या.
त्यांना
पल्लवित
व्हायला
गोकुळापर्यंत
पोचायलाच
हवं होतं.
एकदा का काम करायचा
निश्चय
झाला की हातापायातील
जड जड बेड्या,
साखळदंड,
पहारे ह्या कडेकोट
बंदोबस्ताच्या
गोष्टी
किती कुचकामी
असतात नाही?
निसर्गाचा
कोपही आशीर्वाद घेऊन येतो. शत्रूचा प्रत्येक वार ढाल होऊन झेलतो. एवढ्या धुवाँधार पावसात सारे मथुरावासी, सारे द्वारपाल गाढ झोपले. सारं जग शांत झोपेत असतांना ` या निशा सर्व भूतानां तस्यां जागर्ति संयमी' ही उक्ति खरी करत वसुदेव, देवकी आणि हा संयमी शिशु जागा होता.
डोक्यावर धरलेल्या टोपलीत भगवंतच असतांना, मस्तकावर भगवंताचच
छत्र असतांना, आता अवघड काय असणार! ``देव धरावा मस्तकी’’ – मग सारीच कामे सोपी
होतात. तोच पैलतीरी पोचवितो. जनता जनार्दनाचे
आशीर्वाद
पाठीशी
असल्यावर
वसुधेचे
आणि वसुदेवाचे
भाग्य अनुकूल
झाले नसते तरच नवल.
वसुंधरेचच
भाग्य अनुकूल
असल्याने
वसुदेवाचे
प्रयत्न
असफल होणार नव्हते.
वसुदेव
जे करेल त्याला
यश येणार होतं.
भाग्य अनुकूल
झाले की स्मृती
तीव्र होते.
बुद्धी
कुशाग्र,
लखलखीत,
प्रकाशमान
होते.
काय काम करायचे
आहे कसे पार पाडायचे
आहे हे लख्खपणे
दिसू लागते,
उमजते.
निराशा
दूर होते.
काम करायचा
निश्चय
दृढ होतो.
केलेला
विचार वाया जात नाही.
मंत्रणा
सफल होते.
योग्य असे तर्क मनात स्फुरायला
लागतात.
चित्त प्रसन्न
होऊ लागते.
मनोरथ सहजरीत्या
सफळ होतांना
दिसू लागते.
उन्नतीसाठी
कितीही
धडपड करावी लागली तरी प्रचंड
शारिरीक
आणि मानसिक
ताकद प्राप्त
होऊन कार्य आपोआप सिद्धीस
जाते
(मात्रा
- 12/12)
अनुकूल भाग्य होता,
नाही अशक्य काही
बुद्धी कुशाग्र होते,
होते तल्लख स्मृतिही
आलस्य वा निराशा,
ना ये कधी उदासी
सत्तर्क चित्त व्यापी,
सन्मार्ग
वाट दावी
दृढताच निश्चयासी ऐसी अमोघ येई
घेईल काम हाती,
जाईल ते तडीसी
करण्यास श्लाघ्य कामे,
लाभे अपूर्व
शक्ती
प्रगती पथिच नेती यश-अश्व तेचि साती
प्रसरति मतिः कार्यारम्भे
दृढीभवति
स्मृतिः,
स्वयमुपनमन्त्यर्था मन्त्रो न गच्छति
विप्लवम्
।
स्फुरति सफलस्तर्कश्चित्तं समुन्नतिमश्नुते,
भवति च रतिः श्लघ्ये
कृत्ये
नरस्य भविष्यतः
।। 241 (काकोलूकीयम्)
पावसाचा जोर ओसरला होता. कृष्ण गोकुळात पोचला तर वसुदेव
परत कारागृहात.
कृष्णाची
जागा घेतलेली
आदिमाया
कारागृहात
कंसाची
जणु वाट बघत होती.
पहाट होत असतांनाच
पहारेकर्यांना
जाग येऊ लागली आणि आतून बालकाच्या
रडण्याचा
आवाज.
पहारेकरी
धावले.
कंसाला
खबर मिळाली
आणि कंस तातडीने
कारागृहात
येऊन हजर झाला.
देवकीचा
आठवा मुलगा---- का--- आठवे आपत्य त्याला
काहीच आठवायचे
नव्हते.
आठव्याची
गाठ ही त्याच्या
कंठनालेशी
दाटत चाललेली
त्याला
दिसत होती.
त्याला
आपल्या
हातात असलेली
मुलगी आहे का मुलगा ह्याचे
भान नव्हते.
त्या आदिमायेचा
जीव घेण्यासाठी
त्याने
देवकीच्या
कुशीतून
तिला ओढून घेतलं.
गरगर फिरवून
शिळेवर
आपटण्या
आधीच त्याच्या
हातून वीजेसारखी
निसटून
गेलेली
ती बाला परत तीच शापवाणी
धारदारपणे
कंसाला
सुनावून
गेली.
इतकच नाही तर कृष्णाचा
पत्ताही
देऊन गेली,
``कंसा,
तुझा मृत्यू
गोकुळात
आनंदाने
नांदत आहे.''
दुसर्यांच्या जीवांशी लीलया खेळणारा
कंस स्वतःच्या
मृत्यूभयाने
ग्रासला
होता.
जेथे पहावे तेथे त्याला
मृत्यूचा
उग्र,
भीषण चेहरा दिसू लागला होता.
कधी त्याला
स्वप्न
पडे की तो आरशात पहात आहे आणि प्रतिबिंबाचे
मस्तकच
गायब आहे;
तर कधी स्वप्नात
तो वाळूत चालता चालता मागे वळून बघे तो वाळूत त्याच्या
पावलांचे
ठसेच उमटलेले
नाहीत.
एक ना दोन
--! मृत्यूची पावलं आपल्या
जवळच तर येऊन थांबली
नाहीत ना? ह्या आशंकेने
तो घामाघूम
होऊन रात्री
अपरात्री
अचानक झोपेतून
उठत होता.
मृत्यू
त्याला
खदखदा हसत होता.
संशय पिशाच्च
लागलेला
कंस वेडापिसा
झाला होता.
त्याने
नुकत्याच
जन्मलेल्या
सर्व अर्भकांची
हत्या करण्याचं
फर्मान
सोडले.
जमिनीतून वर येणारे
सर्व अंकुर छाटले तरी दूर गोकुळात,
व्रजभूमीत
नंदाच्या
घरी नव बालकाचा
जन्मोत्सव
सुरू असल्याच्या
वार्ता
येऊन थडकल्या.
कंसाच्या
जीवाची
उलघाल होऊ लागली.
पूतनेला बोलावलं
गेलं.
मायावी
पूतनेने
कृष्णाच्या
हत्येची
सुपारी
घेतली.
नुकत्याच
जन्मलेल्या
इवल्याश्या
पोरट्याला
मारायला
असे कितीसे
कष्ट लागणार? नंद-यशोदेच्या घराचा,
गोकुळाचा
सर्व तपशील तिला मिळाला
होता.
त्यानुसार
एका सुंदर युवतीचं
रूप घेऊन
,स्तनांना विष लावून पुतना गोकुळात दाखल झाली. `ही कोण? कोणाची कोण?' पहिल्याच भेटीत तिची अशी काही छाप पडत होती की, कोणालाच
तिला काही विचारायचं
धाडस होत नव्हतं.
तिच्या
मिठ्ठास
वाणीने
सर्वांना
भूल पाडली.
तिच्या
शहरी अधिकारवजा
शब्दांनी
`तू
कोण ग बाई?
कोठून आलीस?'
असं विचारायचं
त्या ग्रामबालांना
सुचलंही
नाही.
किंवा सुचलं तरी विचारायचं
धाडस झालं नाही.
तिच्या
शहरी सफाईदार
वागण्याने
ग्रामबाला
बुजल्या. रेशमी जरीची साडी चापून चोपून नेसलेली,
अंगभर दागिने
ल्यायलेली,
ठुमकत चाललेली,
नजरेत भरेल अशी पूतना पहाताच
वाटवे कुठल्या
राजघराण्यातून
आली आहे न कळे.
जणु प्रत्यक्ष
लक्ष्मीच
स्वर्गातून
खाली उतरली आहे असं वाटावं.
जाता जाता गावातल्या
मिळेल त्या बाळाला
विषारी
दूध पाजून,
त्याला
तडफडणारा
मृत्यू
देऊन पुतना नंदाच्या
वाड्याकडे
जाणार होती.
पण ज्याच्यावर
भगवंतांचीच
कृपा आहे त्याला
यम तरी कसे मारणार?
पूतनेला
गोकुळात
एकही बालक सापडले
नाही.
पूतना नंदाच्या
वाड्यात
पोचली.
यशोदेला
पाहून जन्मजन्मांतरीची
ओळख असल्यासारखी
पूतना बोलू लागली.
``अगं
यशोदे,
हा लबाड कान्हा
एवढा मोठा झाला,
त्याचं
बारसंही
तू मोठ्या
थाटात केलस आणि ह्या मावशीला
बोलवायला
विसरलीस?
अशी गं कशी तू विसरभोळी?''
यशोदेला
ही मावशी आठवेना
पण मावशीच्या
इतक्या
सहज,
घरगुती,
हक्काच्या,
आपलेपणाच्या
बोलण्याने
इतर गोपींची
जी गत झाली होती तीच गत यशोदेचीही
झाली.
`ही
कोण?'
असा विचार मनात येण्याआधीच
पुतनेने
तिला कुठल्यातरी
लांबच्या
नात्याने
बांधून
टाकले.
``अग,
अशी नुसती बघतच उभी राहणार
का? ह्या दूरून आलेल्या
मावशीला
काही गुळ पाणी तरी देणार का नाही?
आण त्या लब्बाडाला
माझ्याकडे
आणि मावशीला
पाणी घेऊन ये.'' वरवर हसत आणि मनात तिची ओळख आठवत यशोदेने
आपला बाळ तिच्या
स्वाधीन
केला.
खरच!
का बर आपल्याला
अशा सभ्य चोरांची
भूल पडते?
विवेक परत परत सांगत असतो नीट चौकशी कर मगच विश्वास
ठेव म्हणून.
पण मनाला हिम्मतच
होत नाही चोराला
खडसवायची.
हेच तर चोराचं
कौशल्य
असतं.
मैत्रीचे
नाटक करणारा
सभ्य चोर वेळ येताच आपले खरे रूप प्रकट करतो.
तसचं झालं.
बाळ हाती आल्या आल्या प्रेमाचं
भरतं आल्यासारखी
पूतना कृष्णाला
पदराआड
घेऊन बसली.
मनात शंकेची
पाल चुकचुकली
तरीही वरवर दिसणार्या
दृश्यावर
विश्वास
ठेऊन यशोदा लाडक्या
कृष्णाला
त्या कैदाशीणीकडे
सोपवून
आत निघून गेली.
``आता
सामना तुझा आणि माझा आहे कारट्या
! '' पूतना
मनात खदाखदा
हसली.
पण तिला काय माहित की दोर म्हणून
हातात सापालाच
उचलून धरावं त्याप्रमाणे
तिने असहाय्य दुबळ्या बाळाला उचलून घेतलं नसून तो तिचा प्रत्यक्ष काळच आहे. वरवर दिसणार्या राखेच्या ढिगात हात घालावा आणि आत प्रखर अग्नी असावा तशी तिची गत होणार होती. पूतनेला पाहताच कृष्णाने डोळे मिटून घेतले. त्याच्या आयुष्याच्या संघर्षाची जी सुरवात झाली तीच मुळी एका क्रूरकर्मा स्त्रीशी लढण्याने. स्त्री वध शास्त्रानुसार योग्य नसला तरी शब्दांची टरफल सोलून काढली की सुनितीच्या, विवेकाच्या गाभ्यात असलेला शास्त्राचा आत्मा हेच सांगत होता कृष्णा, येथे दया नाही! मार त्या पूतनेला. श्रीरामांच्या अवतारातही त्राटिकेला मारूनच सनातन धर्माचं रक्षण तू केलं होतस. आता कसली द्विधा वृत्ती. आता तळ्यात मळ्यात नको.
स्तन चोखणारं बाळ कधी काळनीळं
पडतय ह्याची
मोठठ्या
आतुरतेने
वाट पाहाणार्या
पुतनेच्या
स्तनातून
त्याचवेळेला
एक बारीकशी
कळ आली.
कृष्ण त्याच्या
इवल्या
इवल्या
ओठांनी
ओढून ओढून दूध पीत होता.
त्याच्या
आसुसलेल्या
मुखातून
चुकचुक
आवाज होत होता.
``पी
कारट्या
पी. थोड्याच
वेळात तुझा खेळ संपलेला
असेल.''
कृष्णाने
दूध पिता पिता तिच्या
बोलण्याला
हुंकार
भरला.
त्याच्या
इवल्या
इवल्या
पावलांनी
पुतनेच्या
पोटावर
बाळलाथा
मारत दुसर्या हाताने तो तिच्या
दुसर्या
स्तनाशी
खेळत होता.
आता मात्र पुतनेच्या
स्तनातून
असह्य कळ आली.
आणि नंतर कळांमागून
कळा.
पूतना कृष्णाला
स्तनापासून
सोडवण्याचा
प्रयत्न
करत होती.
निकराचा
प्रयत्न
करत होती.
पण हे काय?
कृष्णाने दोन्ही ओठांत तिचा स्तन घट्ट धरून ठेवला होता.
तो अत्यंत क्रोधाने
स्तनपान
करत होता.
दूधासोबत
पूतनेचे
प्राणही
ओढून घेत होता.
जणु क्रोधाला
म्हणजेच
रुद्राला
त्याने
आपला साथी बनवलं होतं.
कृष्णाने
स्तनपान
तर कृष्णाच्या
साथीदार
क्रोधाने/रुद्राने पूतनेच्या प्राणांचं पान केलं.
त्याच्या बाळओठांचा पाश पुतनेला
असह्य झाला.
``सोड
मेल्या
सोड!!!
'' तिची
मिठ्ठास
वाणी बदलली.
तिचं खरं रूप प्रकट व्हायला
सुरवात
झाली.
असह्य वेदनांनी तडफडणारी पूतना तिचं खरं राक्षसी
रूप प्रकट करत धाडकन कोसळली.
तिच्या
किंकाळीने
हृदयात
धस्स होऊन सर्वजण
धावत आले.
मरणप्राय
वेदनांनी
तळमळणारी,
तडफडणारी
पूतना एक किंकाळी
फोडून मरण पावली.
यः परस्य
विषमं विचिन्तयेत्प्राप्नुयात्स कुमतिः स्वयं हि तत् ।
पूतना हरिवधार्थमाययौ
प्राप सैव वधमात्मनस्ततः ।।
जो माणूस एखाद्या निष्पाप,
सज्जनाचं वाईट व्हावं ह्यासाठी योजनाबद्ध खलनीतीचा अवलंब करतो; अशा दुर्जनाला दुसर्याचं
अहित करता येत नाहीच पण तो त्याच्याच दुष्टपणाच्या चक्रात अडकून स्वतःच मत्युमुखी पडतो.
पूतना आली होती मारे कृष्णवधाचा निश्चय करून. तिने योजनाही मोठी कौशल्याने आखली होती.
पण कृष्ण मेला नाही. पूतना मात्र मरण पावली
यशोदेचा कान्हा अजूनही
तिच्या
प्रचंड
धुडावर
आनंदाने
खेळत होता.
तिच्या
स्तन्यासोबत
तिचे रक्त आणि प्राण शोषून घेत होता.
खुदुखुदु
हसत होता.
जणु म्हणत होता,
``मी तर एक दुधपिणारा शिशु आहे.
स्तनपान
ही माझी जीविका
आहे.
पूतने,
तू आपणहून
माझ्या
मुखात तुझा स्तन दिलास.
आणि मी स्तनपान
केलं आता त्यामुळे
जर तू मेलीस तर त्यात माझा काय अपराध आहे?’’
धावत आलेल्या यशोदेने
कान्ह्याला
उचलून घेतलं.
जमलेल्या
सगळ्याच
गोप गोपींच्या
अंगातून
भयाची एक थंडगार
लहर सरसरत अंगभर गेली.
``अगोऽऽबाई!!! थोड्यावेळापूर्वीची ती लावण्यवती?----- ती लावण्यवती नाही?---- मग ही अघोरी आहे तरी कोण? ही मायावी
आहे तरी कोण?
ही कोणाचीही
मावशी नाही?’’ भयाने डोळे विस्फारून
पूतनेच्या
राक्षसी
महाप्रचंड
देहाकडे
पाहणारे
विस्फारलेले
सर्वांचे
स्तब्ध
डोळे अचानक स्फुंदून
स्फुंदून
रडू लागले.
कृष्णावरचं
किटाळ टळलं म्हणून
कृष्णाच्या
चेहर्यावरून
हात फिरवून
आपल्या
कानशीलावर
बोटं मोडू लागले.
कृष्ण सुरक्षित
होता.
खुदुखुदु
हसत होता.
सर्वांनी
निःश्वास
सोडले.
तरीही परत परत `तिच्या'कडे पाहून सारेच बुचकळ्यात पडले. ही कोण? कोणाची कोण? येथे कशी आली? कशासाठी आली? काय हेतू मनात ठेऊन आली? हेतू तर स्पष्टच दिसतो आहे. कृष्णाची हत्या करायचा. मग कोणी पाठवली हिला येथे? प्रश्न प्रश्न आणि प्रश्न!!!! एवढ्या मोठ्या राक्षसिणीला स्वर्गाचा रस्ता सहज सोपा करणारा बालक पाहून मात्र सर्वांचीच खात्री पटली. सारे म्हणू लागले, `` एकाचवेळेला दूध आणि विष पचवणारा हा बालक सामान्य
नाही.
हा कोणी बालयोगी तर नसावा?
हा बालयोगी
मनात नित्य रहावा असं सार्यांनाच
वाटू लागलं ''
स्तन्यं पयश्च
गरलं बत निर्विकारं
तुल्यं निपीय
सहसैव हि पूतनायाः।
साम्यं दिशन्नभिमतं
सुखदुःखयोस्तत्
हृत्पङ्कजे मम
सदाऽस्तु स बालयोगी ।।13
जो स्तन्यपान करिता खल
पूतनेचे
पीतोचि दूध, विषही
जणु एकभावे
नाहीच अंतर म्हणे जणु
सौख्य-दुःखे
योगीच तो
चिमुकला मम चित्ति राहे।।13
आत्तापर्यंत सारेच व्रजवासी सावध झाले.
त्या राक्षसीणीची
अंत्यक्रिया
चुपचाप
उरकून सारे गोकुळवासी
कुठल्याही
प्रकारचा
डांगोरा
न पिटता सावधपणे
चौफेर लक्ष ठेऊन होते.
गोकुळात
कृष्ण मरण्याऐवजी
कृष्णाला
मारायला
आलेली ही दहशतवादी
कोण हे थोड्याच
दिवसात
उघड होणार होते.
कारण कुठेतरी
त्याचे
पडसाद उमटल्याशिवाय
रहाणार
नव्हते.
दहशतवादी मेला की कोण कोण गळे काढत आहेत ह्याची
शांतपणे
नोंद ठेवायला
लागते.
कोणकोणती
वार्ता
देणारी
माध्यमे
त्याच्या
बाजूने
कंठशोष
करणारी
भाषा बोलत आहे ह्याचा
मागोवा
घ्यायला
लागतो.
त्यांच्या
उद्देश्यांच्या
मूळापर्यंत
जावे लागते.
इतरवेळेस
जनतेवर
कितीही
अन्याय
झाला तरी जनतेच्या
मानवी हक्कांबद्दल
उदासीन
असणार्या
कुठल्या
संस्था
दहशतवाद्यांचा
पुळका येऊन त्यांच्या
मानवी हक्कांसाठी
`न्याय
द्या!'
म्हणत अन्यायाचा
कटोरा घेऊन न्यायव्यवस्थेच्या
दारी धावत पोचतात
ह्याचे
निरीक्षण
आवश्यक
असते. अशावेळेस न्यायसंस्थांचा तराजू कुठे झुकतो आहे हे पहायला
लागते.
कारण कुठलीच
न्यायसंस्था
निःपक्षपाती
नसते.
न्यायासनावर
बसलेल्या
प्रत्येकाला
स्वतःचे
पूर्वग्रह
असतात.
त्यांच्या
पूर्वग्रहाचा
कल न्यायसंस्था
कोणाच्यामागे
खंबीरपणे,
भक्कमपणे
उभ्या आहेत हे दर्शवतात.
न्यायसंस्था
निःपक्षपातीपणे
काम करतात असा दुधखुळा
निष्कर्ष
कोणी काढू नये.
हीच वेळ असते न्यायसंस्थेचे
अंतरंग
जाणून घ्यायची.
हीच वेळ असते न्यायसंस्थेच्या
नीरक्षीर
विवेकाचे
अवलोकन
करण्याची.
निष्ठा
तपासून
बघण्याची.
दहशतवाद्याचा सफाया कुठल्या
भूभागावर
काय परिणाम
करत आहे ह्याचा
साकल्याने
विचार करायला
लागतो.
एका असफल दहशतवादी
कृत्यानंतर
सटपटलेले
दहशतवादी
अजून कुठे आणि कशा कारवाया
करतील ह्याची
डोळ्यात
तेल घालून निगराणी
करावी लागते.
त्यांचं
उद्दीष्ट
समजावून
घ्यायला
लागतं.
त्यांना
मिळणारी
कुमक कुठल्या
परकीयांकडून
येत आहे,
कशा स्वरूपात
येत आहे.
ती स्वीकारणारे
वरवर आपले वाटणारे
पण प्रत्यक्षात
सत्तापिपासू,
देशविघातक
कारवाया
करण्यासाठी
मागेपुढे
न पाहणारे,
देशवासीयांच्या
मनात संभ्रम
निर्माण
करणारे
कोण आहेत त्यांच्या
शक्तीचा
आढावा घेऊन त्यांना
वेळच्यावेळी
ठेचणे जरुरीचे
असते.
त्यानुसार मथुरेत कंसाच्या
राज्यात
उडालेला
हाहाक्कार
पूतनेची
ओळख पटवून गेला.
पुतना परत आली नाही.
आली ती फक्त तिच्या
मृत्यूची
खबर.
तीही गुप्तहेरांकडून.
एका दूध पिणार्या
शिशुने
तिचा अंत करावा ही बातमी कंसासाठी
मुळीच चांगली
नव्हती.
कंसाच्या
भयात वाढ करणारी
होती.
इकडे गोकुळवासीयांनी
मात्र पूतनेची
होळी जाळून आनंदाची
दिवाळी
साजरी केली. कंसाला आपला शत्रू नक्की कोण हे कळून चुकले.
कंसाचे
लक्ष्य
पक्के झाले कृष्ण कृष्ण आणि कृष्ण!
दहशत उत्पन्न करणार्या
पूतनेच्या
वधाने कंसाचा
झालेला
प्रक्षोभ कंसाच्या
नीच कृत्यांचा
पुरावा
नंदाला
आणि गोकुळाच्या
रहिवाशांना
देऊन गेला.
येणार्या
संकटांना
सज्ज राहण्याचा
निरोप देऊन गेला.
कंस ह्या दहशतवाद्याचं
लक्ष्य
कृष्णच
आहे आहे ही मोलाची
खबर देऊन गेला.
कंसाचा
मृत्यू
आपल्या
गोकुळातच
मोठा होत आहे हे गोकुळवासीयांना
कळून चुकले. गोकुळवासी सावध झाले की आता ज्याच्याशी
आपला सामना आहे तो आहे महा बलाढ्य
कंस कंस आणि कंस ! कंस काय काय डावपेच खेळेल त्याला तोंड देण्यासाठी सज्ज रहायला पाहिजे. आपल्या बाळकृष्णाला डोळ्यात तेल घालून जपायला पाहिजे.
बाळ कृष्णाने अत्यंत
निर्विकारपणे
जिंकलेली
ही पहिली बाळाकोटी
लढाई!
कृष्णाच्या
सामर्थ्याचे
पडघम कंसाच्या
दरबारापर्यंत
वाजवून
आली.
कंसाला
हादरवून
गेली.
``कंसा,
तुझा मृत्यू
गोकुळात
नुसताच
आनंदात
नांदत नाही तर दिसामाशी
बलवान होत आहे.''
हा निरोप पोचवून
आली.
नंद यशोदेच्या
वाड्यात
आणि सर्व भोळ्याभाबड्या
गोप जनतेच्या
सुरक्षा
कवचाखाली
प्रखर आणि प्रबळ होत आहे ही सुई वर्मी टोचून आली.
कंसमामासारख्या
एका मोठ्या
दहशतवाद्यापर्यंत
पोचण्यासाठी
त्याच्या
पुतनेसारख्या
बगलबच्च्यांचा
प्रथम सफाया करायला
लागतो.
आणि तो वारंवार
होईलही
हा निरोप कंसाला
देऊन आली.
`वेळ
पडल्यास
तुझ्या
राज्यात
शिरून हा कृष्ण तुझे शिरकाण
करेल.'
कृष्णाने
न बोलता कृतीतून
हा संदेश कंसमामापर्यंत
पोहचवला.
पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या
माणसाला
नदीने त्याला
बुडवलं
असं म्हणत नाहीत.
डोंगरावरून
पडून मेलेल्याला
पृथ्वीने
त्याला
मारलं असं समजत नाहीत.
कारण कुठल्याच
पंचमहाभूतांकडे
`मी
केलं'
किंवा
`मी
नाही केलं'
हा अहंकार
नावालाही
अस्तित्त्वात
नसतो.
त्याप्रमाणे
ज्या राज्यकर्त्याच्या
बुद्धीला
`मी'
शिवतच नाही,
जो फक्त विवेकाने,
कुठच्याही
दबावाखाली
न येता योग्य निर्णय
घेत राहतो अशा राज्यकर्त्यांनी
जनतेच्या
जीवावर
उठणार्या
दहशतवाद्यांना
ठार केले,
देशाच्या
प्रगतीच्या
मार्गात
अडथळा आणणार्या
असुरांचा
खातमा केला तरी त्याला
कुठलाच
दोष लागत नाही.
यस्य नाहङ्कृतो भावो
बुद्धिर्यस्य न लिप्यते ।
हत्वापि स इमाँल्लोकान्न
हन्ति न निबध्यते ।।
(गीता अध्याय 18 श्लोक17)
----------------------------------------------------
दहशतवादी पूतना मेली.
सावध झालेल्या
कंसाला
कृष्णाची
ताकद चांगलीच
उमजली.
आपला खरा शत्रू हाच आहे आणि लवकरात
लवकर ह्या काट्याचा
नायटा व्हायच्या
त्याचा
कसाही करून खातमा करायच्या
उद्योगाला
कंस लागला.
कृष्णाला
ठार मारण्यासाठी
वेश पालटून
एका पाठोपाठ
एक दहशतवादी
तो गोकुळात
घुसवत होता.
पूतनेपाठोपाठ
शकटासूर
आला.
तृणावर्त
आला.
कृष्ण एका कुशीवर
वळु लागला,
पालथा पडायला
लागला आणि गोकुळात
आनंदाला
उधाण आलं.
कृष्णाच्या
पोटावर
वळण्याचा
उत्सव आणि पूजा करत असतांनाच
कृष्णाला
ज्या बैलगाडीच्या
/ छकड्याच्या खाली झोपवलं होतं तो छकडा जू तुटून उलटा झाला. घाबरलेल्या यशोदेने कृष्णाला उचलून घेतांना तेथे खेळणार्या बाळ गोपाळांनी सांगितलं, `` माई, आम्ही पाहिलं, ह्या बाळकृष्णाने ह्या छकड्याला लाथ मारली आणि त्याचं जू तुटून तो उलटला. गोकुळवासीयांच्या मनात पूतनेची दहशत असतांनाच शकटासूराचा नाश झाला.
मग कंसाचा स्वतःचा सेवक तृणावर्त
आला.
आपल्या
कडेवर असलेल्या
बाळकृष्णाला
यशोदेने
जरा खाली ठेवलं आणि धुळीचं
एक चक्रवात
वादळ सुरू झालं.
सार्या
गोकुळाला
त्याने
घेरलं.
त्याच्या
भयानक वेग आणि आवाजाने
सार्या
दिशा हादरून
गेल्या.
ह्या तृणावर्ताने
इतकी धूळ,वाळू उडवली की सार्या गोकुळात हाहाक्कार माजला. धुळीमुळे कोणाला
काही दिसेना.
सगळीकडे
अंदाधुंदी
माजली.
सारे एकमेकांना
हाका मारत,
शोधत,
दृष्टीहीनाप्रमाणे
सैरावैरा
पळू लागले.
चक्रवाताचा वेग कमी झाल्यावर
यशोदा रडत रडत आपल्या
लाडक्या
बाळाला
शोधत फिरत असतांना
तिला कृष्णाच्या
रडण्याचा
आवाज आला..
चक्रवाताचं रूप घेतलेला
तृणावर्त
जेंव्हा
कृष्णाला
उचलून आकाशात
वर वर घेऊन जाऊ लागला तेंव्हा
त्याला
कृष्णाचं
वजन सहन होईना.
जणु काही एखादा विशाल पर्वतच
त्याच्या
उरावर पडल्यासारखा
तो घुसमटून
जाऊ लागला.
कृष्णाने त्याचवेळेस त्याचा
गळा पकडून असा काही दाबला की तृणावर्त
मोठा धोंडा खाली कोसळावा
त्याप्रमाणे
आकाशातून
गोकुळाच्या
भूमीवर
कोसळला.
तृणावर्ताच्या शरीराला बिलगलेला
कृष्ण सुरक्षित
खाली आला.
ह्या राक्षसाच्या मृत शरीरावर बिलगलेला छोटा बाळ पाहून यशोदा, नंद, सारेच गोपगोपी कृष्णाकडे
धावले. दैवाने आत्ताही त्यांच्या लाडक्याला वाचवलं म्हणून त्यांच्या कुलदेवतेचे आभार
मानू लागले. साश्रु नयनांनी त्याला हृदयाशी धरू लागले. बाळ रडत होता.
आत्ताशी तो रांगणारा छोटा बालक होता.
ह्याच सुमाराला गर्गमुनी
नंदाला भेटायला गोकुळात आले. गर्ग हे यदुवंशियांचे आचार्य होते. नंद आणि गर्ग ह्यांच्या
संगनमतानी दोन्ही मुलांची नाव ठेवली गेली. बलराम आणि कृष्ण!! पण तीही गुपचुप--- एकांतात,
कुठलाही बभ्रा न होऊ देता. एका छोट्याशा गोठ्यात. कारण गर्ग मुनींनी ह्या दोन बालकांची
नावं ठेवली हे लोकांना कळलं असतं तर ही बातमी मथुरेला कंसापर्यंत पोचली असती ---आणि
कृष्ण हा वसुदेवाचाच मुलगा आहे हे निश्चित झालं असतं.
कृष्ण जरा मोठा होऊन,
उभा राहून, स्वतःच्या पायावर चालायला पळायला लागला. आणि त्याच्या खोड्या वाढल्या. रोज
गोपींच्या तक्रारींनी यशोदेला भंडावून सोडलं. अगं यशोदे आम्ही आमचे दही, दूध, लोणी
अंधारात लपवून ठेवतो. पण जणु काही ह्या सावळ्याच्या देहातच ज्योत तेवत असते आणि तिचाच
प्रकाश बाहेर सर्वत्र फाकतो आणि त्याला अंधारात दडवलेलं सगळं काही सापडतं. खरच होतं
ते. विवेकाचा, ज्ञानाचा प्रकाश हा आतूनच बाहेर पसरतो. डोळ्यांमधून कृतींमधून दुसर्यालाही
लक्षात येतो. ह्या सावळयाच्या
जवळ विनाविलंब क्षणात सर्व टिपून घेणार्या निरीक्षण शक्तीचा आणि तीव्र आकलन शक्तीचा
इतका सुरेख मेळ होता की त्यानुसार कृती करायला त्याला वेळ लागतच नव्हता. त्याला अगम्य
आणि अशक्य काही नव्हतच! शेवटी आईला चकवून पुढे पुढे धावणर्या ह्या खोडकर लेकराला,
आपल्याच कान्ह्याला यशोदेनी अंगणात दाव्याच्या सहाय्यानी उखळाला बांधून ठेवलं. हातातील
छडीनी त्याला दटावून घरकामाला ती आत गेली.
थोड्याच वेळात काडकडाडऽऽऽ !! जोराचा आावाज झाला. नंदाला तर वाटलं वीजच कोसळली.
कान्हाच्या आठवणीने दोघेही अंगणात धावले. बघतात तर काय दोन शेजारी शेजारी असलेले अर्जुनवृक्ष
धराशायी झाले होते. त्यात उखळ अडकून कान्हा पुढे जाण्यासाठी जोर लावत होता. यशोदेच्या
काळजाचं पाणी पाणी झालं. अरे देवा! माझं लेकरू म्हणत तिने घाईघाईने कृष्णाच्या पोटाला
बांधलेलं दावं सोडवलं आणि मोठ्या काळजीने हृदयाशी धरलं. नंदाच्याही काळजात चर्रर्रऽऽ
झालं. तेथे जवळपास खेळणारी गोपमुलं सांगु लागली, ``माई
हा तुमचा उखळाला बांधलेला कान्हा एवढ्या जड उखळासकट उखळ ओढत सगळ्या अंगणात फिरत होता.
हया शेजारी शेजारी असलेल्या दोन झाडातून जात असतांना उखळ आडवं होऊन दोन्ही झाडांच्या
बुंध्यात अडकलं. ह्याला पलिकडे जाता येईना म्हणून त्याने जरा जोर लावला तर ही दोन्ही
झाडं मुळापासून उखडून खाली पडली.’’ अजून स्वतःचाच तोल सावरता न येणारा, हेलपाटत, उठत,पडत
चालणारा एवढासा कान्हा एवढे मोठे दगडी उखळ ओढत पुढे कसा जाईल? ह्या झाडांना पाडण्याएवढी
ताकद त्याच्या अंगात कशी असेल? असा विचार करत असतांनाच मुले म्हणाली ``इतकच नाही तर
नंदबाबा, ही झाडं पडल्यावर त्यांच्यातून दोन तेजस्वी पुरूष बाहेर पडले आणि हया कान्हाला
नमस्कार करून आकाशात निघून गेले. सगळ्याच गोष्टी अशक्य वाटत होत्या. प्रत्यक्ष कुबेराचे
नलकूबर आणि मणिग्रीव असे दोन पुत्र कृष्णलीलेने शापमुक्त होऊन स्वर्गात परत गेले हे
सर्व आख्यान नंदबाबा, यशोदा आणि इतर कोणाला पटण्यासारखं नव्हतं. परत कोणी तरी राक्षस
कृष्णाला मारायला आले असणार पण दैव बलवत्तर म्हणून कान्हा वाचला ह्या कल्पनेने यशोदा
आणि नंदबाबा दोघे त्याला हृदयाशी धरून रडू लागले. त्याचे मुके घेऊ लागले.
आता मात्र गोकुळातील,
व्रजभूमीमधील हे सर्व उत्पात पाहून गोकुळातील समजदार वयोवृद्धांना आणि नंदाला काळजी
वाटणं बरोबरच होतं. बरेच उन्हाळे पावसाळे पाहिलेला म्हातारा उपनंद नावाचा गोप म्हणाला,
ह्या मुलांवर येणारी संकटं, राक्षसांचे हल्ले पाहून मला तर असं वाटतयं की आपल्या गोकुळवासीयांना
रहायला ही जागा योग्य राहिलेली नाही. ह्या यशोदेचा लाडका पहिल्यांदा पुतनेच्या तडख्यातून
वाचला, मग छकडा अंगावर कोसळून इजा होता होता वाचला. मग काय तर धुळीच्या वादळा सोबत
उडून जाऊनही त्या दुष्ट दैत्याच्या छातीवरच राहिल्यामुळे वाचला. आता तर एवढे प्रचंड
वृक्ष उन्मळून पडले. यमलार्जुन हे वृक्ष पडताना मधे आल्यामुळेच आजूबाजूला खेळणारी मुले
किंवा कान्हा जखमी झाले नाहीत. घोर आपत्ती टळली. आपल्या कुलदैवतानेच सगळ्यांचे रक्षण
केले. आता अजून संकटांची वाट न बघता आपण गोकूळ सोडून वृंदावनला जाऊ. वृंदावनमधे अजून
छोटी छोटी बरीच वनं आहेत. तेथे मऊ, लुसलुशीत गवत आहे. यमुना नदी तेथे असल्याने, भरपूर
पाणी, सुंदर पर्वत, वृक्ष, लता, वनस्पती असा मोठा समृद्ध, सुंदर भूभाग आहे. आपण सर्वजण
तिकडे प्रस्थान करू.’’
त्याचं बोलणं सर्वांना
पटलं. लवकरात लवकर छकड्यांवर आपलं सारं सामान लादून, स्वतः धनुष्यबाण आणि हत्यारांनी
सज्ज होऊन, सारे गोप आपली गायी, गुरं, प्राणी, मुलं, घरातील सर्व कुटुंबीयांसह वृंदावनमधे
येऊन दाखल झाले. थोड्याच दिवसात त्यांनी तेथे आपली नवीन घरे उभारून नवी गोपवस्ती थाटली.
राक्षसांपासून बचाव होण्यासाठी, त्यांना पुरून उरण्यासाठी,
पुढच्या
महत्त्वाच्या
संग्रामांसाठी
स्वतःची
ताकद वाढवून
टिकून राहण्यासाठी हे आवश्यकच होतं. कंसही कृष्णाचा नायनाट करण्यासाठी वत्सासुर, बकासुर, अघासुर, धेनुकासुर, प्रलंबासुर असे अनेक मारेकरी वृंदावनात पाठवत राहिला.
----------------------------------------------------
पूतना, शकटक, तृणावर्त
इत्यादि
इत्यादि
अनेक दैत्यांना
मारणारा
कृष्ण एक अबोध शिशु होता.
त्यामुळे
त्यानेच
ह्या दैत्यांना मारले का? मारले तर कसे?
असे प्रश्न
सहजच मनात येणे स्वाभाविकच
आहे.
नशीब थोर म्हणून
कृष्ण वाचला त्यात त्याचा
काही खास वाटा होता हे कोणी अमान्यही
करू शकतात.
पूतनेच्या बाबतीत म्हणायचं
तर काही विषं महाभयंकर
असली तरी ती रक्तात
मिसळली
तरच हानी पोचवतात.
पोटात गेली तर इतकी हानीकारक
नसतात.
पचनसंस्थेत
पचून जातात.
अंगावर
छोटीशी
जरी जखम असेल तर मात्र जखमेमधून
रक्तात
भिनतात.
छोटा बाळकृष्ण
पूतनेचे
दूध पितांना
तिच्या
स्तनांशी
हातांनी
चाळा करता करता बालनखांनी
उमटलेल्या
ओरखाड्यातून
वा छोट्याशा
जखमेतून ते विष तिच्याच रक्तात
भिनल्याची
शक्यताही
असेल.
तृणावर्ताच्या बाबतीत बोलायचे
तर उत्तरेत
लू/धुळीची
वादळं ही ऋतुनुसार
उन्हाळ्यासोबत
येणारी
नैसर्गिक
आपत्ती
आहे.
धुळीची
वादळं इतकी तीव्र असतात की वाटेत येणार्या
गाड्याही
उडवू शकतात.
त्यामुळे
एका छोट्या
बालकाला
ह्या लूने उडवणे फारसे अवघड नाही.
बैलगाडीचे रूप घेतलेला
शकटक मोडून पडला असेल तर तो कृष्णाच्या
लाथेने
मोडून पडला असे न मानता लाकडाला
आतून वाळवी लागली असेल त्यामुळे कावळा बसायला
फांदी मोडायला
ह्या न्यायाने
शकटकाचाही
प्रश्न
निकालात
निघू शकतो.
कृष्ण सुदैवी
होता अस मानलं तरी कृष्णाचं
टिकून राहणं फार फार अत्यावश्यक
होतं.
आणि तो त्या सर्व अपघातातून
बचावला,
उत्तम प्रकारे
बचावला
हेही तेवढच खर आहे.
गोकुळातले हे लढे कंसविरोधी
आणि बचावात्मक
असले तरी दोन लढे मात्र पूर्ण वेगळे होते.
त्यांचा
कंसाशी
काही संबंध नव्हता.
हे लढे स्वसंरक्षणार्थ
नसून गोकुळाच्या
रक्षणार्थ
होते.
पर्यावरणाच्या
रक्षणार्थ
किंवा निसर्गाशी
कृतज्ञता
व्यक्त
करण्यासाठी
होते.
एक होता यमुनेच्या पाण्यावर
कबजा करून राहिलेल्या
कालियाविरुद्ध.
यमुनेच्या
पाण्याच्या
हक्कासाठी
लढलेला.
तर दुसरा होता गोवर्धनाचा.
वृंदावनाचा प्राण
आणि त्राण असलेल्या
गोवर्धन
पर्वताच्या
सन्मानाचा,
संरक्षणाचा.
त्याच्यावरील
जैव वैविध्याची
जपणूक करणारा.
निसर्गाशी
मेळ घालणारा.
इंद्रयाग
नाकारून
गोवर्धनपूजेतून
इंद्राला
धडा शिकवण्यासाठी
हा लढा कृष्णाच्या
नेतृत्वाखाली
सार्या
गोकुळवासीयांनी
दिला आहे.
------------------------------------------------
लेखणी अरुंधतीची -
Comments
Post a Comment