Posts

Showing posts from February, 2023

15 सिंहजम्बूकगुहा कथा ( सिंह आणि कोल्ह्याच्या गुहेची कथा )

  15 सिंहजम्बूक गु हा कथा सिंह आणि कोल्ह्याच्या गुहेची कथा एका विशाल जंगलात खरनखर नावाचा एक सिंह त्याने त्याच्या आखत्यारीत केलेल्या प्रदेशात रहात होता . एक दिवस शिकारीच्या शोधात तो वनात इकडे तिकडे हिंडत होता पण , खूप प्रयत्न करूनही त्याला शिकार मिळाली नाही . भुकेने अत्यंत व्याकूळ होऊन तो इकडे तिकडे हिंडत असतांना संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळेला त्याला एक गुहा दिसली . त्या गुहेत शिरता शिरता त्याने विचार केला की , रात्री विश्राम करायला कोणी ना कोणी प्राणी येथे येईलच आणि मला आयती शिकारही मिळेल त्यामळे मी येथेच लपून बसतो आणि एखाद्या प्राण्याची वाट बघत बसतो . त्याने जसा विचार केला होता तसच घडलं . काही वेळातच त्या गुहेमधे राहणारा दधिपुच्छ नावाचा कोल्हा तेथे आला . पण अत्यंत सतर्क असलेल्या कोल्ह्याने त्या गुहेच्या बाहेरच जमिनीवर उमटलेल्या सिंहाच्या पंजांचे ठसे पाहिले . नीट पाहिल्यावर त्याच्या लक्षात आलं की हे ठसे फक्त एकाच दिशेने म्हणजे गुहेकडे जाणारे आहेत . बाहेर येणार ठसे काही दिसत नाहीत . ते ठसे पाहून त्याने विचार केला की , `` आता तर मी मेलोच ! ह्या गुहेत सिंह नक्कीच आला आहे . पण...