13 मूषिकाविवाह-कथा (उंदरीच्या लग्नाची गोष्ट ) अपूर्ण
13 मूषिकाविवाह-कथा
199
ते 211 – 12 श्लोक
हिमालयातील एका दुर्गम
अति उंच पर्वतावरून एक धबधबा खाली दरीत कोसळे. तो प्रचंड प्रपात खाली कोसळतांना त्यावर
दुधाप्रमाणे फेस लवलव करत राही. त्या प्रपाताच्या घनगंभीर आवाजानी त्याच्या खालील कुंडातले
मासे घाबरून इकडे तिकडे सुळकन पळत असत. त्याच्या त्या चपळ हालचालींमुळे आणि त्या तरंगणार्या
फेसामुळे गंगेत जणु अनेक रंगांच्या लाटा निर्माण होत. अशा नसर्गरम्य ठिकाणी, गंगा किनारी
काही तपस्व्यांचा एक मोठा, स्वयंपूर्ण आश्रम होता. तेथे राहणारे मुनी यम नियमांच पालन
करीत. तप, स्वाध्याय, उपवास आणि योगाभ्यासात आापला वेळ घालवीत. गंगेच पवित्र पाणी,
तेथील कंदमूळं, फळं, काही प्रकारचं खाण्यास योग्य शेवाळ ह्यावर त्यांची दिनचर्या चालत
असे. लज्जा रक्षण करण्यापुरते कौपीन वा वल्कले इतक्याच कमितकमी गरजांवर ते तेथे आनंदाने
कालक्रमणा करत होते. तेथे याज्ञवल्क्य नावाचे एक ऋषी त्या आश्रमाचे कुलपती होते.
एक दिवस त्या गंगेच्या
पात्रात स्नान करून त्यांनी आचमनासाठी पाणी घेतलेलं असतांनाच वरून वेगानी उडणार्या
एका ससाण्याच्या चोचीतून निसटलं एक छोटं उंदराचं पिलु --- एक छोटी उंदरी त्यांच्या
हातात पडली. त्यांनी त्या उंदरीला एका वडाच्या पानावर ठेऊन पुन्हा एकदा स्नान, आचमन,
प्रायश्चित्त आदि सारे विधी उरकले. पाण्याबाहेर आाल्यावर वडाच्या पानावर घाबरून बसलेल्या
त्या उंदरीला त्यांनी आपल्या तपोबलानी एका छोट्या मुलीत रूपांतरीत केलं. आणि तिला घेऊन
ते आपल्या आश्रमात आले. त्यांच्या पत्नीला मुलबाळ नसल्याने ती बिचारी दुःखी असे. त्या
छोटुकलीला पत्नीच्या हवाली करत ते म्हणाले, ह्या छोटीला आजपासून तुझीच मुलगी समजून
तू तिची चांगली काळजी घे. तिला लहानाचं मोठं कर. ऋषीपत्नीही आनंदाने तिची काळजी घेऊ
लागली आणि बघता बघता ती मुलगी 12 वर्षांची झाली. त्याकाळी ते वय विवाह योग्य किंवा
जरा जास्तच समजलं जायचं. सहाजिकच एक दिवस चिंतेने ऋषीपत्नी म्हणाली, ``अहो, हिच्या
विवाहाचं वय उलटून चाललय आणि आपण अगदीच कसे लक्ष देत नाही?’’
त्यावर ऋषी म्हणाले,
``तू म्हणतीएस ते ठीकच आहे.’’
चंद्र, गंधर्व आणि अग्नी
सर्वात आधी स्त्रियांचा उपभोग घेतात. नंतर पुरुष त्यांचा उपभोग घेतात. त्यामुळे स्त्रियांमधे
कुठलाच दोष रहात नाही. त्या निर्दोष होऊन जातात.
कारण चंद्र त्यांना सद्गुण,
पावित्र्य, निर्मल मन, शुद्ध निष्ठा प्रदान करतो. तर गंधर्व त्यांना मधुर वाणी आणि
चातुर्य प्रदान करतो. तर अग्नी त्यांना सर्वांगीण पवित्र्य देतो. त्यामुळे त्या निष्पाप
असतात. त्यांचं शरीर कायम शुद्ध असतं.
स्त्रियः पुरा सुरैर्भुक्ता
सोमगन्धर्ववह्निभिः ।
भुञ्जते मानुषाः पश्चात्
तस्माद्दोषो न विद्यते ।। 199
सोमस्तां ददौ शौचं गन्धर्वाः
शिक्षितां गिरम् ।
पावकः सर्वमेध्यत्वा
तस्मान्निष्कल्मषाः स्त्रियः ।।200
असम्प्राप्तरजा गौरी
प्राप्ते रजसि रोहिणी।
अव्यञ्जना भवेत् कन्या
कुचहीना च नग्निका।। 201
व्यञ्जनैस्तु समुत्पनैः
सोमो भुङ्ते हि कन्यकाम् ।
पयोधराभ्यां गन्धर्वा
रजस्यग्निः प्रतिष्ठितः ।।
अ अ अ अ ल ग ग अ । अ अ अ अ ल ग ल अ
( ललल
/गलल नको )
न आणि भ गण नको
Comments
Post a Comment