Posts

Showing posts from March, 2023

सत्याची धार –

Image
  सत्याची धार –   सर्वात धारदार शस्त्र कोणत ? असं जर कोणी विचारलं तर मी म्हणेन की सत्याची नजर . सत्याची धार फार लखलखित असते . सत्याच्या नजरेला नजर देणं किती अवघड असतं हे मी अनेकवेळेला अनुभवलं आहे . गोष्टही तशीच होती . आम्ही त्या बंगल्यात नव्याने रहायला जाण्यापूर्वी बंगला ठीकठाक आहे ना ? म्हणून पहायला गेलो होतो . बंगला जुना असल्याने आणि अनेक वर्ष न वापरल्यामुळे साफसफाई , रंगरंगोटी आवश्यक होती . त्यामुळे घर उघडतांना PWD चे Engineer आणि सफाई कामगार अशी काही मंडळी उभी असतांना त्या घोळक्याचा भाग म्हणून तीही तेथे उभी होती . तिची उगीचच लुडबुड आणि घर पहायची अनाठायी उत्सुकता मला पसंत नव्हती . दिसायला छान होती पण मला माझ्या घरात ती पसंत नव्हती . घराच्या दरवाजाचं कुलूप उघडून जरा फट किलकिली झाल्या झाल्या आमच्या सर्वांच्या पायातून पुढे जाऊन ती सर्वप्रथम घरात घुसली . श्शुक श्शुक करून सर्वांनी तिला घालवून द्यायचा प्रयत्न केले पण तिचे मोठ्ठे डोळे आमच्यावर रोखून तिने...