17 घृतान्धब्राह्मण कथा - ( तुपाने अंधळ्या झालेल्या ब्राह्मणाची कथा- )

 

17 घृतान्धब्राह्मण कथा -

( तुपाने अंधळ्या झालेल्या ब्राह्मणाची कथा )

एका आटपाट नगरात  एक यज्ञदत्त नावाचा एक विवाहित  आपल्या पत्नीसोबत राहत होता. रोज त्याची पत्नी घीवर आणि छान रुचकर पदार्थ बनवून तिच्या प्रियकरासाठी गुपचुप घेऊन जात असे. एक दिवस यज्ञदत्ताने तिला घीवर बनवून घेऊन जातांना पाहिलं. तो तिच्यावर लक्ष ठेऊ लागला. एक दिवस त्याने आपल्या पत्नीला विचारलं, ``राणी, रोज रोज तू हे घीवर बनवतेस आणि कुठे घेऊन जातेस? मला खरं खरं सांग.’’ त्याची पत्नीही मोठी हजरजबाबी होती.  ती म्हणाली, ``इथून थोड्याच अंतरावर देवीचं देऊळ आहे. मी एक व्रत ठेवलं आहे. त्या व्रतानुसार मी रोज नवीन पक्वान्न बनवून देवीला बळी म्हणून घेऊन जाते.’’ पतीचा विश्वास वाढावा म्हणून रोज  पक्वान्नांसह देवीच्या देवळात जायचा जणू तिचा नियमच झाला. आपल्या पतीचा आपल्यावर विश्वास बसलेला आहे असे वाटून आता तर ती अजूनच धीट होऊन पतीसमोरच वेगवेगळे रुचकर पदार्थ बनवू लागली आणि निश्चिन्तपणे पतीच्या समोरच ते घेऊन देवीच्या देवळात जाऊ लागली. तिच्या अशा वागण्याने पतीचा तिच्यावरचा विश्वास दृढ होईल असं तिला वाटू लागलं.

एक दिवस ती पक्वान्न घेऊन देवीच्या देवळात आली. मंदिरात देवापुढे ते झाकलेलं ताट ठेऊन ती नदीत स्नान करायला गेली. तेव्हा दुसर्‍या रस्त्यानी तिचा पतीही मंदिरामागे येऊन थांबला. स्नान करून ती गंध, फूल, धूप दीप आदींनी देवीची पूजा करू लागली. पूजा झाल्यावार देवीला नमस्कार करून म्हणाली, ``माते असा काहीतरी उपाय सुचव ज्याने माझा पती आंधळा होईल’’

ते ऐकत उभा असलेला पती दचकला पण आवाज बदलून  देवीच्या आवाजात म्हणाला, ``मुली, तू रोज साजुक तुपात घेवर वा स्वादिष्ट मिष्टान्न बनवून रोज तुझ्या पतीला  खाऊ घाल; तो लवकरच आंधळा होईल.’’ त्या कुलटेलाही देवीच बोलत आहे असे वाटून, ती आपल्या पतीच्या बोलण्याला फसली. त्याच्या जाळ्यात अडकली. रोज रुचकर पदार्थ बननवून आपल्या पतीला खाऊ घालू लागली. काही दिवस गेल्यावर तिचा पती म्हणाला, “राणी, दिवसेंदिवस मला जरा कमी दिसायला लागलं आहे.” हे ऐकताच देवीचा वर फळला ह्या कल्पनेनी त्या कुलटेला तर अत्यानंद झाला. ही गोष्ट तिने आपल्या प्रियकरालाही सांगितली. त्यामुळे हळुहळु दिवसेंदिवस तोही  निःशंक होऊन हिच्या घरी येऊ लागला. हा आंधळा आता मला काय करणार आहे ह्या कल्पनेनी दोघेही घरात मोकळेपणाने राहू लागले. एक दिवस जराही भय, लज्जा न बाळगता घरात प्रवेश करत असतांनाच जवळच उभ्या असलेल्या कुलटेच्या पतीने त्या पत्नीच्या प्रियकराला पकडून लाथाबुक्यांनी तुडवलं. त्याच्या त्या ठोशांनी तो प्रियकर तेथेच मरण पावला.   फसवणार्‍या आपल्या पत्नीचे  नाक कापून त्या पतीने तिलाही घराबाहेर घालवून दिलं.

ही कथा सांगून झाल्यावर मंदविष साप म्हणाला की, मी ह्या मूर्ख बेडकांचं वाहन बनून त्यांची हौस का पुरवतो आहे हे मला चांगलं माहित आहे. परंतु मी त्या ब्राह्मणाप्रमाणे मला अनुकूल अशा सुयोग्य वेळेची प्रतिक्षा करत आहे.

----------------------------------------------------------

 

ही कथा सांगून झाल्यावर मंदविष साप म्हणाला की, मी ह्या मूर्ख बेडकांचं वाहन बनून त्यांची हौस का पुरवतो आहे हे मला चांगलं माहित आहे. परंतु मी त्या ब्राह्मणाप्रमाणे मला अनुकूल अशा सुयोग्य वेळेची प्रतिक्षा करत आहे.

मंदविष साप गालाल्या गालात हसत पुन्हा पुन्हा गाणं गुणगुणत राहिला,

किती रुचकर हे बेडुक विविध चवींचे

पुरवतील चोचले मम रसनेचे

पुरतील अजुन खूप दिवस मज साचे

हे बेडुक किती रुचकर विविध चवींचे

मंदविष आनंदाने आपल्याशीच गुणगुणत असलेल्या गाण्यातील काही अर्धवट शब्द जलपादाच्या कानावर पडले आणि तो जरा दचकला. त्याला काळजी वाटायला लागली. भयभीत होऊन, मंदविष काय गुणगुणत होता हे जाणून घेण्यासाठी तो मंदविषाला म्हणाला, ``मित्रा, आत्ता तू हे काय असम्बद्ध गुणगुणत होतास? तुझं बोलणं तर अनुचित, आमच्या विरोधी, एखाद्या शत्रूने बोलावे तसे आहे. हे गाणं ऐकून मी तर शहारून गेलो आहे. 

सापही आपल्या मनातील खरा उद्देश, त्याचं बेडकांचं वाहन होण्यामागील खरं प्रयोजन, त्याच्या मनातील बेडुक खायची तीव्र इच्छा हे सारं लपवत म्हणाला, छे छे!! महाराज माझ्या मनात आपल्याविरुद्ध काहीही कटकारस्थान वा गैर विचार नाहीत. आपण निश्चिन्त असा. मूर्ख जलपादही त्याच्या त्या वाक्याला भुलला. फसला. त्याच्या कपटी वाक्यावरच विश्वास ठेऊन त्या संधीसाधू सापाची कुटिल चाल ओळखू शकला नाही. आणि पूर्वीप्रमाणेच त्याला आपलं वाहन समजून त्याच्याशी गप्पा, गोष्टी, विनोद करत राहिला. सरतेशेवटी त्या सापाने त्या तळ्यातल्या सर्व बेडकांना खाऊन टाकले. त्या बेडकांचा एकही वंशज शिल्लक राहिला नाही.

Comments

Popular posts from this blog

मॉरिशसच्या अंतरंगात – अर्पण पत्रिका -

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)

दशसुन्दरीचरितम् -