गंगा -
गंगा - कुठल्याही नदीच्या काठावर अथवा पुलावर उभं राहून नदी चा तो कमनीय ‘ नीर ’ देह निरखत उभं राहणं अपार आनंदाची अनुभूती देणारं असतं . श्रीरंगाची तीन ठिकाणी लवलेली काया / त्रिभंगाकृती मूर्ती असो वा नदीचा वळणं वळणं घेत जाणारा ( meandering ) प्रवाह असो . नाकासमोर सरळ फक्त आपल्यापुरतं जीवन चालत राहणं हे त्या दोघांनाही अ मान्य . दरवेळेला स्वतःची वाट वाकडी करून आपल्या आजूबाजूच्या निसर्गाची , पशु पक्ष्यांची , लोकांची अगदी किडामुंगीचीही दखल घेत , खुशाली विचारत , त्यांची दुःख जाणून घेत , ती दूर करत , जास्तीत जास्त भूतमात्रांना सुखी समाधानी करत , आनंदी करत जाणारे त्यांचे जीवनप्रवाह पाहतांना ते स्वतःच परमानंदाच े अखंड वाहणारे , कधीही न आटणारे , अत्यंत निर्लेप स्त्रोत वा निर्झर आहेत असं वाटतं . दुसर्याला देण्याचा आनंद विलक्षण असतो . नाहीतर एवढा मोठा...