सरसोत्सव
सरसोत्सव हिंदू धर्मातील सर्व देवदेवता ह्या निसर्गाचं, निसर्गातील विविध स्थित्यंतर वा चक्र, जसे जलचक्र, ऋतुचक्र, कालचक्र, जन्म-मृत्यूचक्र, उत्पत्ती-स्थिती-विलय, नवनिर्मिती आाणि विनाश, दृश्य आणि अदृश्य ह्यांचं एकमेकात होणार्या रूपांतरांशी निगडीत विश्वाच्या अनादि अनंत काळ चाललेल्या स्थित्यंतराचं, निसर्गात चाललेल्या घडामोडींचं प्रतिक आहेत. आपल्या पूर्वजांनी, आपलं जीवन ज्यांच्या ज्यांच्यावर अवलंबून आहे अशा, आपल्या रोजच्या जीवनाशी निगडीत, निसर्गात घडणार्या विविध घटनांना एका छानशा दृश्य प्रतिकात बद्ध करून त्यांच्या भोवती सामान्यांना आकर्षक वाटतील, सहज कळतील, रुचतील, पचतील अशा गोष्टींची निर्मिती केली. वर वर वाटणार्या गोष्टींमधे आकाशातील तार्यांची, त्यांच्या स्थितींची, त्यांच्या रहस्यांची पृथ्वीवरील घटनाक्रमाची, सर्वांमध्ये असलेल्या समान सूत्राची विविध माहिती दाटपणे गुंफून ठेवली. ती उलगडून पहायची शोधक नजर मात्र हवी! शिव आणि पार्वती हेही निसर्गातील अनेक घटनांचं प्रतिक! निसर्गात चालू असलेल्या अनेक निसर्ग चक्रांचं प्रतिक! जन्म-मृत्यूच्या चक्राचं! ऊन, वादळ, पाऊस ह्...