2 ॥ दश-सुंदरी-चरितम् ॥ 2 पहिली मैत्री-
।। द श सु न्द री च रि त म् ।। 2 पहिली मैत्री ह्या विश्वसुंदर्या दिशा सतत माझ्या बरोबर असल्या तरी त्यांची माझी खरी मैत्री लग्नानंतरच झाली . माझ्या माहेरी घरात सतत माणसांचा राबता असे . घराला कुलुप मी फा रच अभावाने पाहिल होतं . घरही भर वस्तीत असल्याने रस्त्यावर उशीरापर्यंत वर्दळ असे . माणूस दिसणं हे किती किमती आहे हे जाणवलं नव्हतं तेव्हा . रोज माझ्याभोवती अलगद फिरणार्या दिशांचीही कदर नव्हती मला . लग्नानंतर मात्र हातात चुडा भरून प्रवीण दीक्षितां सोबत औरंगाबादला आले . प्रवीण ASP (Assistant Superintendent Of Police) होते . ( तेव्हा औरंगाबादला पोलीस कमिशनरेट झाली नव्हती .) चुडा भरतांना मनगटावरून उतरलेलं घड्याळ माहेरीच राहून गेलं होतं . एक टा जीव सदाशिव असलेल्या दीक्षितांच्या घरात दुसरं घड्याळ नव्हतं . जे होतं ते त्यांचं मनगटी घड्याळ त्यांना अत्यंत आवश्यक असल्य...