3 ॥ दश-सुंदरी-चरितम् ॥ दश मैत्रिणींनी दाखवलेली नवी दिशा-
।। द श सु न्द री च रि त म् ।। 3 दश मैत्रिणींनी दाखवलेली नवी दिशा - ह्या दिशांनी निरनिराळी माणसं भेटवली , पोलीसदलाचीही ओळख करून दिली तशीच इतर वेळेला आपण गेलोच नसतो अशा किती किती इवल्या टिवल्या गावां पासून ते मति गुंग व्हावी अशा भव्य शहरांतून फिरवलं . आपला देश असा आतून आतून पाहतांना त्याचं अंतरंग काही प्रमाणात माझ्या मनात उलगडत गेलं . चित्रित झालं ; जे एका गावाला कायमचं राहून कधीच कळलं नसतं . विशाल भारताचं व्यक्तिमत्त्व माझ्या मनावर काही अंश का होईना कोरलं जात होतं . विशाल भारताच्या छत्रछायेत मला खरोखरच्या वैविध्यातील एकतेचा , सर्वत्र एक असलेल्या भारतीय संस्कृतीच्या स्पंदनाचा अनुभव येत होता . व्यास महर्षी त्यांच्या नवग्रह स्तोत्रात चंद्राचं वर्णन करतांना , चंद्राचा पांढरा शुभ्र रंग समजाऊन सांगतांना कधी समुद्रावरचा धवल शंख उचलून दाखवतात , कधी हिमालयात नेऊन हिवाळ्याच्या सुरवातीला तेथील झर्यांवर तयार होत असलेले पांढरेशुभ्र बर्फाचे ...