भुंगा –

 

भुंगा

भुंगा पोखरु दे सदैव हृदया; सांगो मला सर्वदा

`पीडा-खंड कसा असे वगळला आयुष्य ग्रंथातला

झाले कागद ते गहाळ मधले आयुष्य ग्रंथातले

लागो ही मज टोचणी निशिदिनी ते खंड ना वाचले

दुःखाचा खडकाळ दुर्गम कडा गेलो चढोनी न मी

काट्याच्यासम राहु दे सलतची हे दुःख माझ्या हृदी

 

माझे लब्धप्रतिष्ठितात उठणे वा बैसणे वागणे

हे ऐश्वर्य विलास भोग सगळे ना वैभवासी उणे

राहो ते परि पोखरीत हृदया  ते खंड  प्रत्यक्ष मी 

पाहीले नच वाचले अनुभवे काहीच ह्या जीवनी

दुःखाचा पथ त्रासदायक महा मी चाललो ना कधी

राहो हीच क्षणोक्षणी सल मना काट्यासमा टोचरी

 

 

उंची झुंबर, गालिचे सजविती उत्कृष्ट शिल्पे घरा

संगितासमवेत नृत्य करिती बाला हसोनी जरा

सारेची स्तुतिने मला रिझविती त्या धुंद शब्दातुनी

नाकारून सुखा, निमंत्रण दिले ना घोर मार्गा कधी

कष्टाचा खडकाळ तो पथ पहा मी चाललो ना कधी

आनंदातहि राहु दे सलत ही त्या वेदनेची सुरी

 

सौख्याचा पथ हा सरून मजला हा! धाप लागेल की

घेई मी बसुनीच धूळ भरल्या रस्त्यात जेंव्हा कधी

तेंव्हाही मनभृंग तो कुरतडो ह्या वाळल्या फांदिसी

वारंवार करो मला कथन की, यात्रा नसे संपली

दुःखाच्या खडकाळ दुर्गम पथी मी चाललो ना कधी

अंतीही मज राहु दे सलतची ह्या वेदनेची सुरी

-------------------------------------------------------------

 

               खूप सुंदर कविता रविंद्रनाथांची. कविता वाचतांना क्षणोक्षणी वाटलं की, ही कविता एक भाषांतर आहे भारतीय मनातल्या भावनांचं इंग्रजीत केलेलं! ज्या भारतीय भाषेत, भारतीय मनात रुजलेल्या संस्कृतीतून जन्माला आल्या आहेत. अगदि शब्द सुद्धा भारतीय भाषेचे  अलगद इंग्रजीच्या मातीत जाऊन पडलेले, भारतीयतत्व न हरवता.

स्वतः एका गर्भश्रीमंत जमिनदार कुळातले. दुःख, दारिद्र, वेदना कधी वाट्याला नाही आली. (खर तर असं नाही) पण गौतम बुद्धाप्रमाणे दुसर्‍यांची दुःख , वेदना, दारिद्र्य पाहून हळवे झालेले.

                   देवा, इतरांच्या आयुष्यात जी दुःख त्यांना भोगायला लागतात. तो दुःखाचा पैलू माझ्या जीवनात मला भेटला नाही. जे दुःख भोगल्या नंतरच `जीवन त्यांना कळले होमहणता येतं, ती जीवनाला परिपूर्ण करणारी वेदना मला मिळाली नाही. चंद्राचा चमकदार प्रकाशित भाग माझ्या वाट्याला आला पण चंद्राचा अंधारमय भाग मला दिसलाच नाही.  जर तो आयुष्याचा अज्ञात पैलू / तो भाग, ते दुःख  वाट्यालाच आला नसेल माझ्या; तर मना खंत कर थोडी की, एका  महान अनुभवाला तू हुकलाच गड्या. तो इतरांना, गरीब जनतेला बसणारा दुःखाचा चटका, ती दुःखाची तीव्र वेदना , ती तिडीक ते शल्य माझ्या अंतरात्म्याला सतत टोचणी लावू दे.  ती पीडा, ती कळ सतत ध्यानी मनी स्वप्नी मला छळत राहू दे.

---let me not forget for a moment,

let me carry the pangs of this sorrow in my dreams

and in my wakeful hours.

                     ते शल्य माझ्या हृदयात मला सतत बोचत राहो. मी तो दुःखाचा अनुभव घेतला नाही हा बाभळीचा काटा माझ्या मनात सलत राहो.

माझं हे ऐशोआरामाचं जीवन आहे. जगभर फिरतांना कुठच्याही व्यवसायात माझे हात कोपरापर्यंत सोन्यात बुडालेले असतील. पण हे वैभव, ही संम्पत्ती, हे ऐश्वर्य माझ्या हातात असतांना एक वेदनेची तीव्र कळ माझ्या मनात सतत उठत राहो आणि मला जाणीव करून देत राहो `` तू नक्की काय मिळवलस? तू जोपर्यंत `तोअनुभव घेतला नाहीस तोपर्यंत तुझे हात रिकामे आहेत.

As my days pass in the crowded market of this world

and my hands grow full with the daily profits,

let me ever feel that I have gained nothing

---let me not forget for a moment,

let me carry the pangs of this sorrow in my dreams

and in my wakeful hours.

 

                     सुखाच्या मागे धावता धावता एकदिवस धाप लागेल मला. सर्वसामान्य असेन त्यावेळी मी. माती मला म्हणत असेल ``तू क्या रोंदे मोहे? इक दिन ऐसा आएगा, मैं रोन्दूगी तोसे ।’’ मातीत मिळण्यासाठी मला मातीचाच आश्रय घ्यायला लागेल. त्या वेळेलाही माझा प्रवास अजून बाकी असेल कारण तो जीवनाचा भाग, तो जीवनाचा पैलू अजून माझ्या वाट्याला आला नसेल तर ते शल्य रात्रंदिवस मला पीडा करत राहो. राहीलही.

When I sit by the roadside, tired and panting,

when I spread my bed low in the dust,

let me ever feel that the long journey is still before me

---let me not forget a moment,

let me carry the pangs of this sorrow in my dreams

and in my wakeful hours.

 

                   जेंव्हा जेंव्हा आनंद, उत्साह, ऐश्वर्य माझ्या आजुबाजूला सळसळत असेल. वैभवाची कारंजी उसळत असतील, संगीताच्या मधुर स्वरांनी, माझं घर भरून गेलं असेल, माझी स्तुती गाणारे गोड चिवचिवाटासारखे बोल मला हवेहवेसे वाटत असतील तेंव्हा माझ्या हृदयात एक तीव्र कळ उठू दे, अरेरे!! जीवनाचा एक भाग मला कायमचा अज्ञातच राहून गेला. ती पीडा, ते दुःख ---- त्यांना माझ्या ह्या भरल्या घरात निमंत्रण द्यायला आजही मी राजी नाही ही खंत माझ्या मनाला भुंग्यासारखी सारखी पोखरत राहू दे.

When my rooms have been decked out and the flutes sound

and the laughter there is loud,

let me ever feel that I have not invited thee to my house

---let me not forget for a moment,

let me carry the pangs of this sorrow in my dreams

and in my wakeful hours

-----------------------------------------------------------

If it is not my portion to meet thee in this life

then let me ever feel that I have missed thy sight

---let me not forget for a moment,

let me carry the pangs of this sorrow in my dreams

and in my wakeful hours.

 

As my days pass in the crowded market of this world

and my hands grow full with the daily profits,

let me ever feel that I have gained nothing

---let me not forget for a moment,

let me carry the pangs of this sorrow in my dreams

and in my wakeful hours.

 

When I sit by the roadside, tired and panting,

when I spread my bed low in the dust,

let me ever feel that the long journey is still before me

---let me not forget a moment,

let me carry the pangs of this sorrow in my dreams

and in my wakeful hours.

 

When my rooms have been decked out and the flutes sound

and the laughter there is loud,

let me ever feel that I have not invited thee to my house

---let me not forget for a moment,

let me carry the pangs of this sorrow in my dreams

and in my wakeful hours

 

-        by Rabindranath Tagore

-----------------------------------------------------------------------

#लेखणीअरुंधतीची -

 

Comments

Popular posts from this blog

मॉरिशसच्या अंतरंगात – अर्पण पत्रिका -

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)

दशसुन्दरीचरितम् -