Posts

Showing posts from October, 2023

प्रभास

  प्रभास मित्रांनो! गद्य, पद्य, नाट्य, चित्र, शिल्प शास्त्र, गायन, गणित हे सर्व प्रकार स्वभावतःच एकमेकात इतके एकरूप आहेत की त्याना एकमेकांपासून पृथःक करणं म्हणजे साखरेतून त्याची गोडी काढून घेण्यासारखं आहे. पाण्यातून पातळपणा कसा काढता यावा? कठीण डोंगरातूनच नदी, निर्झर उगम पावतात तशी गद्यातून सहज कविता तयार होत जाते. गद्यात अनेक वेळा दुसर्‍या भाषेतील काव्यमय संदर्भ अथवा दुसर्‍या लेखकांची अवतरणं दिली तर लेख प्रभावी होतो. कवितेत अशी दुसर्‍या भाषेतील कवींची अवतरण त्याच्या भावार्थासह दिली तर काय हरकत आहे? सहज लयीत जाणार्‍या कवितेला मधे दुमड पडू नये, तिचा एकजिनसीपणा कमी होऊ नये सहज ह्या भाषेतून त्या भाषेत अलगद उतरता याव आणि परत आपल्या भाषत येता यावं ह्यासाठी समानवृत्त वापरून हा छोटासा प्रयोग केला आहे.   वाचताना मागे मंद स्वरात त्याच वृत्तातील   नरेंद्रभाई ओझांच्या स्वरातील शिवमहिम्न ऐकता यावं ह्यासाठी त्याचीही लिंक देत आहे.   https://www.google.com/search?q=Narendra+Ojha+%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%A8&rlz=1C1CHZN_enIN1015IN1015&am