Posts

Showing posts from January, 2024

हलवा -

  हलवा - जानेवारी महिना, पुण्याची थंडी, रात्री आम्हा मुलांची निजानीज होत आहे. सोलापुरी जाड चांदरींवर चिकटलेल्या दुलया, रग, कांबळी अंगावर ओढून घेता घेतासुद्धा आईने पेटवलेल्या कोळशांच्या रसरशीत निखार्‍यांची धग डोळ्यालाही सुखावून जातीए. आत्ताशा गॅस आल्यापासून ही शेगडी काही खास प्रसंगांनाच बाहेर निघत असे. त्यातल्या त्यात संक्रांतीच्या एक महिना आधीपासून ती माळ्यावरून ओट्यावर उतरत असे. आणि रथसप्तमीला ह्याच शेगडीच्या रसरशीत निखार्‍यांवर छोट्याशा सु गडातील दूध उतू गेलं की सूर्याला पोचलं म्हणत मगच माळ्यावर जात असे. जळलेल्या दुधाचा एक खरपूस वास तिला येत असे. रात्री निजानीज झाली आणि थंडीची शिरशिरी जाणवू लागलेली असताना   ही रसरशीत पेटलेली शेगडी आणि तिच्या शेजारी बसलेली आई हे मोठं उबदार दृश्य असे. साखरेचा पाक असलेलं भांडं, आणि वाट्यांमधे खसखस, बदाम, भोपळ्याच्या बिया, लवंग, वेलदोडे असं काय काय घेऊन चुलीशेजारी बसत आईनी चुलीची धग मंद केली की खुर्चीवर पेंगणार्‍या मांजराने खुर्चीवरून उतरून परत पायाशी लगटून येऊन बसावं तसं मीही उबदार पांघरुण सोडून `आई आज तू कसला हलवा करणार आहेस?' म्हणत आईला...