रामायण Express- ची माहिती

 

रामायण Express- ची माहिती 

 IRCTC तर्फे जाणार्‍या रामायण express च्या  प्रवासाची माहिती देण्याचा प्रयत्न करते. तुम्ही IRCTC अ‍ॅप डाऊनलोड केलं असेल तर त्यांच्या विविध टूर्स व पॅकेजेस् ची माहिती मिळते.

ही ट्रेन दिल्लीच्या सफदरजंग स्टेशनवरून सुटते. हॉटेल लीला शेजारी सफदरजंग स्टेशन आहे. दिल्लीला आपण आपले पोचायला लागते. ट्रेन दिल्लीहून सुटते व शेवटी दिल्लीलाच शेवटचा थांबा असला तरी आपण (महाराष्ट्रवासी) त्या आधी नागपूरला उतरू शकतो. त्याप्रमाणे परतीचे रिझर्वेशन रामायण express च्या नागपूरला पोचण्याच्या वळेनुसार आधीच करून ठेवलेले उत्तम.

रामायण express  ही संपूर्ण ट्रेन श्रीराम भारतवर्षात ज्या जया जागी गेले त्या त्या मुख्य जागी तुम्हाला घेऊन जाते. एक टोपी, छत्री व गळ्यात घालायला  I Card दिले जाते. त्यावर लाावायला आपला 1 फोटो बरोबर असलेला बरा.

AC Coupe  AC First class, AC second class, AC Third class अशी  संपूर्ण ट्रेन AC आहे. बेडिंग, टॉवेल ची सोय उत्तम असते.

ट्रेनमधे स्नानासाठी गरम पाण्याचे शॉवर्स/ बादलीबाथ मस्त!

ट्रेनमधेच Restaurants अप्रतिम असतात. पोटोबाची काळजी करावी लागत नाही. AC 3 ला जागेवरच सर्व्हिस मिळते. बाकी जणांची  ट्रेनच्या सुंदर डायनिंग हॉलमधे उत्तम व्यवस्था असते.  बेड टी/कॉफी पासून लाड होतात.

पाण्याच्या मुबलक बाटल्या बस व ट्रेनमधे मिळतात.  स्वतःची छोटी रिकामी बाटली बरोबर ठेवल्यास तीर्थस्थानांना भेट देताना बरोबर भरून घेता येते. चालताना बरी पडते.

धार्मिक स्थळांच्या स्टेशन्सवर गाडी थांबली की दुसर्‍या टाय अप केलेल्या Tourist organization  च्या  AC बसेस तयार असतात. तेथपर्यंत तुमचे 1 वा 2 दिवसाचे सामान छोट्या बॅगेत घेऊन उतरताना ट्रेनमधे ठेवलेल्या सामानाची काळजी करावी लागत नाही. गाडीमधे उत्तम security with Web Cam  असते. गाडीत  त्या गाडीच्या पॅसेंजर्स शिवाय कोणी येत वा जात नाही. गाडी कुठल्याही स्टेशनवर तांबली की प्रत्येक वेळी दरवाजा उघडताक्षणीच त्यासमोर armed guard उभे राहतात. कुठल्याही अनाहूताला आत प्रवेश मिळत नाही. 

बस पर्यंत पोचायला स्टेशनला असलेला जिना आपापले सामान घेऊन  बहुतेक वेळा चढावा उतरावा लागतो. व बस पर्यंत पोचावे लागते.

ज्या ठिकाणी जाणार व थांबणार असतो तेथे रहायची, जेवायची झोपायची सोय उत्तम हॉटेलमधे  असते. (तुम्ही निवडलेल्या क्लासप्रमाणे थोडे वरखाली असते.)

त्याच बसेस सर्व उतारुंना घेऊन तेथे असलेल्या 1-2 ठिकाणी घेऊन जातात. कोणाला वेगळी ठिकाणे पहायची असतील तर आधीच आपल्या मित्र व समविचारींसोबत आधीच ठरवून आपली आपली   रिक्शा वा टॅक्सी करून आपल्या खर्चाने जाऊ शकतात. हॉटेलच्या परिसरात भरपूर रिक्शा, टॅक्सिज मिळतात. दिलेल्या वेळेत परत यावे. ( हे काही वेळा जास्त बरे पडते.) लांबच्या जागांना बससोबत असणे बरे.

सर्व पाहून झाल्यावर बस पार्किंगपर्यंत चालत यावे अपेक्षित आहे.

काही ठिकाण VIP दर्शनासाठी 150 ते 300 रु. पर्यंत तिकिट असते. ती online काढून ठेवल्यास बरे. त्यातल्या त्यात अयोध्या, काशीविश्वनाथ. त्याचे पैसे आपण भरावे लागतात. त्याला प्रचंड रांग असते. दिलेल्या वेळेत दर्शन होणे अशक्य असते. म्हणून online booking बरे.  तुम्हाला अभिषेक करायचा असला तर online आधीच पैसे भरून योग्य वेळ आधीच book केलेली असावी. ऐनवेळी गडबड होते. त्यातल्या त्यात अयोध्या व काशीविश्वनाथाला हे आवश्यक आहे.  काही 5-10 रुपये किमतीची तिकीटं गर्दी असेल तर टुरिस्ट कंपनी स्वतःच काढून वाटते.

हॉटेल वा ट्रेनच्या बाहेर धार्मिक स्थळी असाल तर चहा/कॉफी असा हाय टी मिळत नाही जिथे जे उपलब्ध असेल ते प्रवासी विकत घेतात. पण बहुतेक वेळी हॉटेलमधे सर्व सांभाळले जाते. काही वेळा बसमधे बसल्याबसल्या तोंड हलवण्यापुरता सुकामेवा एका छोट्या डब्यात घेऊन गेला तर (बाकी खाऊ ट्रेनमधे आरामात ठेऊ शकता.) वेळ छान जातो. किंवा ज्याला ज्याची आवड असेल असे काही. 

काशीत आरती पहायला अनेकांनी क्रूज चा हट्ट धरल्यावर तोही पुरवला गेला. अनेक देवळांमधे गर्दीतून जाणे येणे आपल्या हिमतीवर करावे लागते. बस पार्किंग ते देऊळ reasonable अंतर असलं तरी काही वेळा पार्किंग जवळ न मिळता खूप दूर असू शकते. अयोध्या वा काशी, रामेश्वरम सारख्या ठिकाणी.

बाकी गाडीत बसल्यापासून उतरेपर्यंत 17 रात्री 18 दिवस रहाणे, खाणे ह्याचे वेगळे पैसे द्यावे लागत नाहीत. आपण तीर्थयात्रेला आलो आहोत खरेदी करायला नाही हे  लक्षात घेऊन खरेदी करायला मात्र फार वेळ मिळत नाही.

-----------------------------   

Comments

Popular posts from this blog

रामायण Expressअनुक्रमणिका

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)