सहस्रांशु श्रीहरी
सहस्रांशु श्रीहरी सूर्य उदयाचलावर येतांना पिसार्याप्रमाणे त्याच्या हजारो, लाखो किरणांना घेऊन येतो म्हणून सूर्याला सहस्रार्चि, सहस्रांशु, अंशुमान म्हणतात. प्रकाश हेच त्याचं स्वरूप. अंधारात बुडालेलं विश्व, सूर्यकिरण जणु परत वर उचलून आणतात. अंधारलेल्या डोळ्यांना परत एकदा जग स्वच्छ, स्पष्ट, निर्मळपणे दिसू लागतं. रात्रीच्या अंधारात लुप्त झालेल्या सा र्या वाटा दिसायला लागतात . कुठली वाट कुठे जाणार आहे , कुठल्या वाटेने गेलो तर आपण कोठे पोहचू हेही कळायला लागतं . आपल्या इच्छा , आवड आणि पाठीवर असलेल्या कर्तव्याच्या बोजानुसार प्रत्येकजण वेगवेगळी वाट धरतो . कोणी राजमार्ग पसंत करतो . कोणी दर्या डोंगरातून जाणारी वाट धरतो तर कुणी अजुन कुठली . डोळ्यांना दृष्टी देणारा सूर्य आपण पाहू शकतो पण जो आपल्या डोळ्यात ज्ञानाचं अंजन घालून, ज्ञानाचा उजेड तयार करून आपल्याला योग्य-अयोग्य, धर्म-अधर्म ह्या सूक्ष्म गोष्टींचं ज्ञान देतो तो विवेकसूर्य उदय पावून मनात उजाडायला सर्वच जण पात्र असतात असं मात्र नाही. कुठली वाट योग्य होती हे गतकाळाचं वि...