Posts

Showing posts from September, 2024

भाषेचे अलंकार -

  भाषेचे अलंकार - प्रत्येक भाषेत म्हणी आणि वाक्प्रचार असतात. कधी ते मनुष्याच्या स्वभावाचं बारकाईने वर्णन करणारे असतात. कधी तिथल्या निसर्गाशी निगडीत असतात. तिथल्या प्राण्यापक्ष्यांच्या स्वभाव मनुष्यप्राण्याला जोडणारे असतात. शेतात जन्मलेल्या म्हणी पिकपाण्याचं नातं माणसाच्याा रोजच्या व्यवहाराशी जोडतात तर, घरात जन्मलेल्या म्हणी स्त्री-पुरुषांच्या कर्मकहाणीशी जोडलेल्या असतात. म्हणी धान्याप्रमाणे दळदार टपोर्‍या असतात तर कधी मोत्याप्रमाणे चमकदार असतात. प्रसंगाला मोजक्या शब्दात नेमकेपणाने सांगणार्‍या असतात. एकमात्र खरं की, त्या बंदुकीच्या गोळीप्रमाणे लक्ष्याचा अचूक वेध घेणार्‍या असतात.   म्हणी आणि वाक्प्रचार हे भाषेचे अलंकार यमक, अनुप्रास, अमुक वृत्त, तमुक छंद --- इ. इ. बारीक कलाकुसरीच्या अलंकारांसारखे नाहीत तर, पाटलाच्या बायकोच्या गळ्यातील वा शेतात काम करणार्‍या म्हातारीच्या गळ्यातील; ठसठशीत बोरमाळ वा एकदाणीसारखे डोळ्यात भरणारे, मनाचा वेध घेणारे असतात. ‘‘पटलं तर व्हय म्हना सारखे’’ निर्णायक मत मागणारे किंवा देणारे; बंद्या रुपयासारखे असतात. आता बंदा रुपया नाही. पण पेटिएम् सारखे बटण दाबताच क