7 ॥ मित्रसम्प्राप्तिः ॥
7॥
मित्रसम्प्राप्तिः ॥
1 नाव, 2 गद्य, 3 संस्कृत श्लोक, 4 श्लोकार्थ मराठी गद्य, 5 श्लोकार्थ पद्य मराठी, 6 श्लोकवृत्त माहिती, 7 श्लोकातील शब्दार्थ, 8 इतर माहिती
प्रिय मित्रा, हिरण्यका!
हे जाणल्यावर तरी हातून गेलेल्या सम्पत्तीसाठी इतकं व्यथित होणं, हळहळत राहणं वा झाल्या
गोष्टीबद्दल पश्चाताप करत राहणं योग्य नाही. कधी कधी धन असूनही त्याचा उपभोग घेता येत
नाही वा उपभोग घेणं अत्यंत कठीण, दुष्प्राप्य होऊन बसतं. ज्या सम्पत्तीचा काहीही उपयोग
करता येत नाही वा जी कुठल्या कामी येत नाही ती सम्पत्ती, असूनही अस्तित्वात नाही असेच
समजले पाहिजे. ती नसल्यातच जमा असल्यासारखी असते.
विचार करून बघ, जर एखादी
व्यक्ती घरामध्ये गाडून, पुरून ठेवलेल्या धनामुळे स्वतःला धनी, श्रीमंत समजत असेल,
तर त्याने पुरून ठेवलेल्या त्या धनाच्या जोरावर आपणही आपल्याला धनाढ्य का समजू नये?(154)
गृहमध्यनिखातेन
धनेन धनिनो यदि ।
भवामः
किं न तेनैव धनेन धनिनो वयम ? ।। 154
घरात
पुरलेल्या त्या । धनाच्याच बळावरी ।
धनाढ्य
आपणा मानी । व्यक्ती कोणी जरी तरी ।।
त्याच
त्या पुरलेल्या त्या । धनाच्याच बळावरी ।
श्रीमंत
का न मानावे । आपणे आपणासची ।। 154
मित्रा! तसाही विचार
केला तर, आपण मिळवलेली सम्पत्ती खर्च करणं हेच त्याचं योग्य रक्षण करणं आहे. तळ्यातल्या
पाण्याला पाट काढून ते सुदूर शेताशेतात पोचवल्यानेच त्याची सुरक्षा ठेवली असं म्हणता
येईल. त्याचा जर असा योग्य विनियोग झाला नाही तर साठून राहिलेलं ते पाणी शेवाळं, घाण
वाढून त्याला दुर्गंध येऊ लागेल.(155)
उपार्जितानामर्थानां त्याग एव हि रक्षणम्
।
तडागोदरसंस्थानां परीवाह इवाम्भसाम्
।। 155
ज्याप्रमाणे तलावाचे । पाणी शेतात सोडुनी
।
जाता खेळविले सार्या । शेतांमध्ये
सदूरची ।।
तेव्हाच म्हणता येते । तळ्याच्या रक्षिले
जला ।
तसे दान व खर्चाने । जाते संरक्षिले
धना ।। 155
आपण मिळवलेल्या धनाचा
योग्य विनयोग तरी केला पाहिजे नाहीतर ते दान तरी देऊन टाकलं पाहिजे. मधमाशी मोठ्या
कष्टाने मध जमवते. तो सुरक्षित ठेवते पण त्याचा उपयोग तिला फारच कमी होतो. माणूस वा
अस्वलासारखे इतर प्राणी तो मध खातात, वापरतात, काढून घेतात.(156)
दातव्यं भोक्तव्यं धनविषये सञ्चयो न
कर्तव्यः ।
पश्येह मधुकरीणां सञ्चितमर्थं हरन्त्यन्ये
।। 156
उपभोग स्वतः घ्यावा । सत्पात्री दान
वा करा ।
नका साठवु सम्पत्ती । योग्य तो विनियोग
हा ।।
मधमाशा चिकाटीने । साठवीती मधा जरी
काढून घेतला जातो । माणसांकडुनी परी
।। 156
धनाचा उपयोग/व्यय तीन
प्रकारांनी होतो. एकतर दान द्यावे, नाहीतर
त्याचा उपभोग घ्यावा. नाहीतर ते नष्ट पावते. जो कोणी दानही देत नाही वा सम्पत्तीचा
उपभोगही घेत नाही; त्याने मिळविलेल्या धनाची
तिसरी अवस्था होते. म्हणजे ते नष्ट पावते. (157)
दानं भोगो नाशस्तिस्रो गतयो भवन्ति
वित्तस्य ।
यो न ददाति न भुङ्क्ते तस्य तृतीया
गतिर्भवति ।। 157
धनाच्या विनियोगाचे । मार्ग तीनच ते
खरे ।
दान वा उपभोगावे । नष्ट होतेच वा स्वये
।।
जो मार्ग पहिले दोन । अवलम्बे न सत्वरी
।
सम्पत्तीचीच त्याच्या हो । होतसे तिसरी
गती ।। 157
हे लक्षात घेऊन, सारासार
विचार करणार्या, दूरदर्शी, दक्ष माणसाने फक्त साठवून ठेवण्यासाठी, संचय करण्यासाठी
किंवा पुरून ठेवण्यासाठी धनार्जन करू नये. कारण असं नुसतच साठवून ठेवलेलं धन नंतर चिंतेचा
विषय बनतं. दुखःदायक ठरतं. कोणी शहाण्या माणसाने योग्यच म्हटलं आहे,--
जो आपल्या पत्नी, मुलांना
उन्हाळ्यात कडक उन्हाने कष्ट होऊ नयेत, त्यांना सुखं मिळावं, थंडावा लाभावा, म्हणून
सुखाच्या आशेने स्वतः अग्नी सेवन करतो/सहन करतो त्याचा उद्देश सफळ होत नाही आणि त्याला
प्रसन्नताही लाभत नाही. म्हणजे त्याने एकट्याने अग्नी सेवन करून, सहन करू रणरणत्या
वैशाखाच्या गर्मीवर काही परिणाम होत नाही. आणि त्याने एकट्याने पत्नीमुलांसाठी फक्त
कष्ट आणि कष्टच सोसून तेही सुखी होत नाहीत ना तो सुखी होऊ शकतो. (158)
धनादिकेषु खिद्यन्ते येऽत्र मूर्खाः
सुखाशया ।
तप्ता ग्रीष्मेण सेवन्ते शैत्यार्थं
ते हुताशनम् ।। 158 ।।
परिवारास ना व्हावा । ग्रीष्माचा त्रासही
जरा
म्हणून सोसतो अग्नी । द्याया शीतलता
तया
अशा मूर्खासमा जोची । कष्टवी देह आपुला
मुले, पत्नी, धनासाठी । सुखी होईल तो
कसा? ।। 158 ।।
अ अ अ अ ल ग ग अ । अ अ अ अ ल ग ल अ
सर्पाः पिबन्ति पवनं न च दुर्बलास्ते,
शुष्कैस्तृणैर्वनगजा बलिनो भवन्ति ।
कन्दैः फलैर्मुनिवरा गमयन्ति कालं,
सन्तोष एव पुरुषस्य परं निधानम् ।।
159 ।।
वारा पिऊन जरि राहति नागसर्प
सामर्थ्यहीन नच ते असती जहाल
खातीच शुष्क गवता गज ते विशाल
अंगी असून बळ, ताकद ती अफाट ।।
159.1 ।।
रानातली फळमुळे मुनि भक्षितात
ज्ञानप्रभाव असुनी जनमानसात
सन्तोष हाच खजिना बहुमूल्य ऐसा
सामर्थ्यवान मनुजा नित लाभलेला ।।
159.2 ।।
ग ग ल । ग ल ल । ल ग ल । ल ग ल । ग
ग
सन्तोषामृततृप्तानां यत्सुखं शान्तचेतसाम्
।
कुतस्तद्धनलुब्धानामितश्चेतश्च धावताम्?
।। 160 ।।
सन्तोष-अमृता प्याले । समाधानीच जे
नर
त्या शांतचित्त लोकांना । सुख लाभे
चिरंतन ।। 160.1 ।।
सुख ते लाभणे कैसे । लोभी लोकांस संभव
धावती ते धनामागे । फुटेतो उरि तोवर
।। 160.2 ।।
अ अ अ अ ल ग ग अ । अ अ अ अ ल ग ल अ
पीयूषमिव सन्तोषं पिबतां निवृतिः परा
।
दुःखं निरन्तरं पुंसामसन्तोषवतां पुनः
।। 161 ।।
प्राप्त झाली जयांसी ती । सुधा संतोषरूप
ती
परमानंद मिळे त्यांना । असंतुष्टास दुःखची ।। 161 ।।
अ अ अ अ ल ग ग अ । अ अ अ अ ल ग ल अ
निरोधाच्चेतसोऽक्षाणि निरुद्धान्यखिलान्यपि
।
आच्छादिते रवौ मेघैराच्छन्नाः स्युर्गभस्तयः
।। 162 ।।
झाकता सूर्य मेघांनी । जाती किरण झाकले
मना आवरिता तैसे । होती निश्चल इंद्रिये
।। 162 ।।
अ अ अ अ ल ग ग अ । अ अ अ अ ल ग ल अ
वाञ्छाविच्छेदनं प्राहुः स्वाथ्यं शान्ता महर्षयः।
वाञ्छा निवर्तते नाऽर्थे
पिपासेवाग्निसेवनैः ।। 163
काबूत इंद्रिये ज्यांची । शांतचित्तचि
जे मुनी
सांगती वासनांचे त्या । उच्चाटन मनातुनी
हेच स्वास्थ्य असे मोठे । लोभ हाव नसे
बरी
सेवनानेच अग्नीच्या । तृष्णा कैसी शमेल
ती ।।163
अनिन्द्यमपि निन्दन्ति स्तुवन्त्यस्तुत्यमुच्चकैः ।
स्वापतेयकृते मर्त्याः किं किं नाम कुर्वते? ।। 164 ।।
सभ्याची करिती निंदा । असभ्यास प्रशंसती
माणसे धनलोभाने । योग्यायोग्य न पाहती
धर्मार्थं यस्य वित्तेहा वरं तस्य निरीहता ।
प्रक्षालनाद्धि पङ्कस्य दूरादस्पर्शनं वरम् ।। 165 ।।
वित्त ना साठवावे ते । करण्या धर्मकार्य
ते
जाऊन चिखलामध्ये । धुणे नंतर का बरे? ।। 165
अ अ अ अ ल ग ग अ । अ अ अ अ ल ग ल अ
दानेन तुल्यो निधिरस्ति नाऽन्यो,
लोभाच्च नान्योस्ति रिपुः पृथिव्याम् ।
विभूषणं शीलसमं न
चाऽन्यत्
सन्तोषतुल्यं धनमस्ति नान्यत् ।। 166
दानासमा दुजा नाही । खजिना धरणीवरी
लोभासमा दुजा नाही । शत्रू पृथ्वीवरी
कुणी ।।
सदाचाराविना नाही । अलंकार मनोहरी ।
समाधानाविना नाही । अमूल्य धन काहिही
अ अ अ अ ल ग ग अ । अ अ अ अ ल ग ल अ
दारिद्र्यस्य परा मूर्तिर्याच्ञा न
द्रविणाल्पता ।
जरद्गवधनः शर्वस्तथाऽपि परमेश्वरः ।।
167 ।।
अभाव धनद्रव्याचा । हे ना दारिद्र्य
न्यूनता
लाचार याचना ही तो । मूर्तिमंत दरिद्रता
।।
संपत्ती वृद्ध नंदी ही । शिवाची असली
जरी
तरी संबोधती त्यासी । परमेश्वर ह्या
जगी ।।167
सकृत्कन्दुकपातेन पतत्यार्यः पतन्नपि
।
तथा पतति मूर्खस्तु मृत्पिण्डपतनं यथा
।। 168
पडलेला जसा येतो । चेंडू उसळुनी वरी
संकटी पडता तैसा । नरश्रेष्ठ त्वरे
उठी ।।
चिखलाचा परी गोळा । राहे पडून भूवरी
संकटातून तैसाची । उभारी मूर्ख ना धरी
।। 168
सुलभाः पुरुषाः राजन् ! सततं प्रियवादिनः ।
अप्रियस्य च पथ्यस्य वक्ता श्रोता च
दुर्लभः ।। 169 ।।
अनेक असती राजा ! स्तुतिपाठक नित्य
ते।
भेटती सहजी जेची । गोडबोलेच फक्त जे
।
निर्भीड स्पष्ट श्रेयाचे । ऐसे कडक
बोलणे
सुनावेल असा वक्ता । आणि श्रोता न लाभणे
।।169
अप्रियाण्यपि पथ्यानि ये वदन्ति नृणामिह
।
त एव सुहृदः प्रोक्ता अन्ये स्युर्नामधारकाः
।। 170 ।।
जे ना रुचेल मित्रासी । हितावह असे
परी।
बोले स्पष्ट! सुहृद् तोची । बाकीचे ‘‘नाममित्र’’ची ।।170
कृतान्तपाशबद्धानां दैवोपहतचेतसाम्
।
बुद्धयः कुब्जगामिन्यो भवन्ति महतामपि
।।182
यमाने टाकता फास
अ अ अ अ ल ग ग अ । अ अ अ अ ल ग ल अ
विधात्रा रचिता या सा ललाटेऽक्षरमालिका
।
न तां मार्जयितुं शक्ताः । स्वबुद्ध्याऽप्यतिपण्डिताः
।। 183
चे
दयितजनविप्रयोगा वित्तवियोगाश्च केन सह्याः स्युः
।
यदि सुमहौषधिकल्पो वयस्यजनसङ्गमो न स्यात् ।। 184
रामबाण इलाजाच्या । सारखी मित्रसंगती
जरी ना लाभली कोणा । सोसणे शक्य का
तयी ।।
वियोग प्रिय आप्तांचा । सम्पत्ति नाश
दुर्गती
दुःखात धीर देण्यासी । मैत्री हीच महौषधी
।। 184
वरं प्राणपरित्यागो न वियोगो भवादृशैः
।
प्राणा जन्मान्तरे भूयो भवन्ति न भवद्विधाः
।।185
नको वियोग मित्राचा । आपुल्या सारख्या
भल्या ।
प्राणत्यागहि त्यापेक्षा । बरा वाटे
मला कसा ।।
लाभती दुसर्या जन्मी । पंचप्राण पु्न्हा
नरा ।
दोस्त ना मिळती श्रेष्ठ । आपल्यासारखे
पुन्हा ।।185
एकस्य दुःखस्य न यावदन्त
गच्छाम्यहं पारमिवाऽर्णवस्य ।
तावद्वितीयं समुपस्तितं मे,
छिद्रेष्वनर्था बहुली भवन्ति ।।
186
ना पार केलेचि मी एक विघ्न
तो कोसळे ते दुजे घोर दुःख
अथांग ह्या सागरा पार जावे
कैसेची सोसून विची-तडखे ।।
होता जरी एकची सूक्ष्म छिद्र
थैमान घालीति उत्पात सर्व ।।186
( विची – लाटा
)
ग ग ल । ग ग ल । ग ग ल । ग ग
यावदस्खलितं तावत्सुखं याति समे पथि
।
स्खलिते च समुत्पन्ने विषमं च पदे पदे
।। 187
जोवरी न पडे खाली । चाले निःशंक तोवरी
अनायास जसा चाले । सपाट पथि कोणिही
एकवेळा परी तोची । पडला जर खालती
वारंवार पडे खाली । लागे ठोकर त्या
पदी ।।187
यन्नम्रं सगुणं चाऽपि यच्चापत्सु न
सीदति ।
धनुर्मित्रं कलत्रं च दुर्लभं शुद्धवंशजम्
।। 188
लवचीक धनुष्या ज्या । दोरी सुधृढ बांधली
घामेजेना करी घेता । लढता समरांगणी
।।
सयोग्य वेळुपासूनी । केलेले धनु श्रेष्ठ
ते
तैसचि मित्र पत्नीही । सद्गुणी, नम्र
धीर ते ।।
संकटा पाहुनी ज्यांसी । भीतीने घाम
ना फुटे
विरळेच जगी ऐसे । धनु, मित्र, कलत्र
ते ।। 188
अ अ अ अ ल ग ग अ । अ अ अ अ ल ग ल अ
न मातरि न दारेषु न सोदर्ये नचात्मजे
।
विश्रम्भस्तादृशः पुंसां यादृङ् मित्रे
निरन्तरे ।। 189
असे मित्रावरी जैसा । गाढ विश्वास तो
भला ।
नसे विश्वास तो तैसा । माता पत्नीवरी
तसा ।। 189.1 ।।
विश्वास जितुका राहे । नितांत सुहृदावरी
सख्या भावावरीही ना । तितुका ना मुलावरी
।।189.2 ।।
अ अ अ अ ल ग ग अ । अ अ अ अ ल ग ल अ
असम्पतौ परो लाभो गुह्यस्य कथनं तथा
।
आपद्विमोक्षणं चैव मित्रस्यैतत्फलत्रयम्
।। 190 ।।
कंगालासचि लाभावा । विशाल खजिना जसा
आपत्तीत तसा देई । सुहृत् आधार तो महा
।। 190.1 ।।
ऐकूनी गुप्त गोष्टींसी । देई सल्ला
सुयोग्य त्या
सोडवी संकटातूनी । समर्थ करुनी तया
।। 190.2 ।।
अशी तीन महा कार्ये । करे सुहृद चांगला
नेई अशी निभावूनी । योग्य रीतीच मित्रता
।। 190.3 ।।
अ अ अ अ ल ग ग अ । अ अ अ अ ल ग ल अ
कायः संनिहिताऽपायः सम्पदः क्षणभङ्गुराः
।
समागमाः साऽपगमाः सर्वेषामेव देहिनाम्
।। 191
विनाशाजवळी आहे । देह हा नित्यची उभा
क्षणात गिळतो मृत्यू । देह नश्वर हा
पहा ।। 191.1
क्षणात जाय सम्पत्ती । लक्ष्मी चंचल
केवढी
अतूट मित्रता तीही । ताटातूट घडे क्षणी
।। 191.2
अ अ अ अ ल ग ग अ । अ अ अ अ ल ग ल अ
क्षते प्रहारा निपतन्त्यभीक्ष्णं,
धनक्षये दीप्यति जाठराग्निः ।
आपत्सु वैराणि समुल्लसन्ति,
छिद्रेष्वनर्था बहुली भवन्ति ।।192
घावावरी लागुन काही बाही
पुन्हा पुन्हा खोल करे तयासी
दारिद्र्य येता उदरी उठे तो
महा भुकेचा नित आगडोंब ।। 192.1
येता महा संकट चालुनीया
उठाव शत्रू करिती समग्रा
होता जरी भोक लहानसे ते
आकाशही कोसळण्या पुरे ते ।। 192.2
ल ग ल । ग ग ल । ल ग ल । ग ग
शोकारातिभयत्राणं प्रीतिविश्रम्भभाजनम्
।
केन रत्नमिदं सृष्टं मित्रमित्यक्षरद्वयम्
।।193
अत्याचारीच शत्रूच्या । भीती दहशती
पुढे
आधार देउनी रक्षी । स्नेहासी पात्र
जो असे ।।
डोळे झाकून ठेवावा । विश्वास ज्यावरी
अशी
अक्षरे मित्र ही दोन । कळेना निर्मिली कुणी ।। 193
व्यसनं प्र्याप्य यो मोहात्केवलं परिदेवयेत्
।
क्रन्दनं वर्धयत्येव तस्यान्तं नाऽधिगच्छति
।। 194
येता चालून आपत्ती । रडे केवळ व्यक्ति जी
वाढते दुःख ते त्याचे । लया जाती न
संकटे ।। 194
केवलं व्यसनस्योक्तं भेषजं नयपण्डितैः
।
तस्योच्छेदसमारम्भो विषादपरिवर्जनम्
।। 195
येता चालून आपत्ती । उपाय शोक हा नसे
धैर्याने
पाय रोवूनी । खंबीर राहणे उभे ।। 195.1 ।।
मूळापासून आपत्ती । उखडायास दुष्कर ।
प्रारंभ करणे हेची । एकमेवि औषध ।। 195.2 ।।
त्यजावा दुःख आवेग । त्यजावा शोक संताप।
असे हे नीतितज्ज्ञांचे । निःसंदिग्ध
खरे मत ।। 195.3 ।।
अतीतलाभस्य सुरक्षणार्थं,
भविष्यलाभस्य च सङ्गमार्थम् ।
आपत्प्रपन्नस्य च मोक्षणार्थं,
यन्मन्त्र्यतेऽसौ परमो हि मन्त्रः ।।
196
कमावलेल्या धन रक्षणासी
पुढे धनाची करण्यास प्राप्ती
आपत्तितूनी धन रक्षिण्यासी
करे विचारादि विमर्ष काही ।।
उपाय शोधून तयानुसारी
असे सदा सज्जचि जो कुणीही
तोची असे वास्तव योग्य मार्गी
सनम्त्र हा तो धन रक्षिण्यासी ।।
196
ल ग ल । ग ग ल । ल ग ल । ग ग
सिद्धि वा यदि वाऽसिद्धि । चित्तोत्साहो
निवेदयत् ।
प्रथमं सर्वजन्तूनां । तत्प्राज्ञो वेत्ति नेतरः ।।
197
अंकुरे हृदयातूनी । उत्साहाचाच अकुंर
पाहुनी जोम त्याचाची । कार्यारंभी निरंतर
।।
साफल्य वा असाफल्य । कार्याचे काय प्राक्तन
येई कळून प्राज्ञासी । जाणी ना इतरेजन ।। 197
प्राप्तो बन्धनमप्ययं गुरुमृगस्तावत्त्वया
मे हृतः,
सम्प्राप्तः कमठः सचाऽपि नियतं नष्टं
तवादेशतः ।
क्षुत्क्षामोऽत्र वने भ्रमामि शिशुकैस्त्यक्तः
समं भार्यया,
यच्चान्यन्न कृतं कृताान्त! कुरु ते
तच्चाऽपि सह्यं मया ।। 198
होते पुष्ट हरीण जे अडकले पाशात माझ्या
भले
ते आधीच हिरावुनी सहज हे दैवा कसे घेतले
होते कासव जे मला गवसले तेही पळाले
सुखे
रे आदेश तुझाचि पाळुन करी देई तुरी
सत्वरे ।। 198.1 ।।
ताटातूटचि होउनी मम अशी पत्नीमुलांपासुनी
झाला व्याकुळ जीव हा कळवळे भूके-तहानेमुळे
मृत्यो ! दाट वनात मी भटकतो जैसे तुवा
वांछिले
केले ना अजुनीच ते करि यमा!, सोसीन
तेही भले ।। 198.2 ।।
/
जे जे राहियले असेल अजुनी, स्वच्छंद
वागी तसे
ग ग ग । ल ल ग । ल ग ल । ल ल ग । ग ग ल । ग ग ल । ग
यो मित्राणि करोत्यत्र । न कौटिल्येन
वर्तते ।
तै समं न पराभूतिं सम्प्राप्नोति कथञ्चन
।। 199
जाय जोडीत मित्रांसी । तोडी विश्वास
ना कधी
पराभूत न होई तो । शत्रूच्याकडुनी कधी ।। 199
----------------------------------------------------------------------------
Comments
Post a Comment