रिव्हॉल्व्हर
रिव्हॉल्व्हर ( ही गोष्ट खूप पू्वी 30- 35 वर्षांपूर्वी लिहिली आहे. कुठलीही खरी/सत्य घटना नाही; तेव्हा वेपन्स बद्दल बहुतेक आपण सर्वच अज्ञानी होतो म्हणून, फक्त फायरिंग बद्दल माहिती सांगण्यासाठी लिहीली होती.) प्रवीण सरांची ची बदली दौंड ला एसं. आर.पी. ग्रुप 7 ला कमांडंट म्हणून झाली होती. एस्. आर. पी. म्हटलं की तेंव्हा लोकांच्या मनात दरारा उत्पन्न होत असे. मोठी दंगल किंवा दोन गटात प्रचंड ताण तणाव निर्माण झाला की सरकारची सर्व मदार SRP वर असे. एका हातात लोखंडी जाळी, दुस र् या हातात लाठी, आणि कमरेला रिव्हॉलव्हर अडकवलेले शस्त्रसज्ज आणि शिस्तबद्ध जवान त्यांच्या गाडीतून उतरायला लागलेकीच दंगलखोरांचं धाबं दणाणून जात असे. त्यांना पळता भुई थोडी होई. आणि परिस्थिती चिघळण्याआधीच नियंत्रणात येई. कित्येकवेळा एस्. आर्. पी.च्या जवानांची नुसती उपस्थितीच दंगल आटोक्यात आणून जनतेला `सद्रक्षणाय' ची ग्वाही देत असे. अशा ताण तणावाच्या वेळेला सर्व जवान मानसीकरित्या अतीशय सक्षम, शस्त्रसज्ज आणि शस्त्र सरावात निपुण असणे फारच आवश्यक बाब होती. अपल्या जवानांना कायम क...