अमृताचा स्वीकार -
अमृताचा स्वीकार - मी, सूर्य उगवल्याप्रमाणे अर्धगोल लाल, केशरी, पिवळ्या आकर्षक रंगाचा नवीन पायपोस / कॉयरमॅट दरवाजात ठेवला. मनीला घराबाहेर जायचं होतं. दवाजात नवीन कायसा भयंकर प्राणी तोंड उघडून बसलेला वाटून मनी दचकली. शेपूट फेंदारून तिरकी तिरकी चालत ती त्या पायपोसापर्यंत जाई आणि मागे येई. परत दबत दबत त्याच्यापर्यंत जाई वास घेई, त्याला झटकन पंजा मारून त्याची प्रतिक्रिया अजमावत परत गोंडेदार शेपूट फुलवून घाबरून मागे येई. ``अगं तो काही प्राणी नाही’’ म्हणत मी तो पायपोस तिच्याजवळ ढकलल्यावर तिने घाबरून पाचसहा फूट उंच उडी मारून धूम ठोकली. काही दिवसांनी ह्या नवीन गोष्टीची सवय झाल्यावर हिवाळ्यात उन्हं पडली की आपल्या पिल्लांना घेऊन ती त्या उबदार कॉयर मॅटवर मुक्काम ठोके. आम्हाला दरवाजातून बाहेर जायची वेळ आली तर तो पायपोस तिच्यासकट बाजूला सरकवून गेल्यानेही तिला फरक पडत नसे. तेंव्हा माझ्या लक्षात आलं की, नवीन गोष्टीचं स्वागत कधीच `स्वागतम् स्वागतम्---!!’ असं पायघड्या घालून होत नाही. अज्ञानातून झालेल्या विरोधातूनच होते. माझ्या आठवणीत कोळशाची शेगडी ते स्टोव्ह ते गॅस हे स्थित्यंतरही काही सरळ नव्...