धियां साक्षी शुद्धः –
धियां साक्षी शुद्धः – महाभारतातील भीषण युद्धाचं वर्णन गीते च्या सुरवातीला असलेल्या गीता-महातम्यातील श्लोकात दिलं आहे. तो श्लोक असा आहे, भीष्मद्रोणतटा जयद्रथजला गान्धारनीलोत्पला शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला । अश्वत्थामविकर्णघोरमकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पाण्डवै रणनदी कैवर्तकः केशवः ।। म्हणजेच, जी रोरावत जातसे रणनदी संहारकारी महा भीष्म द्रोणचि काठ दुर्गम तिचे ना लागती जे करा । सूडाने गढुळे जयद्रथरुपी पाणी जिचे सर्वथा जेथे धूर्त लबाड त्या शकुनिच्या जाळ्याच नीलोत्पला ।। लाटां भीषण उंच ह्या धडकती राधेयरूपी महा लाभे वेग महा भयानक तिला योद्धा कृपाचार्य हा । घेई जी वळसेचि घातक जिला दुर्योधनी भोवरे अश्वत्थाम विकर्ण शल्य मगरी मासे महाकाय ते ।। गेले पार करोनि ती रणनदी कौंतेय ते सर्वही नावाडी असताच केशव कशी जाणार ना नाव ती । लाभे ज्यासचि कृष्णसंग बरवा चिंता तयासी नसे जाई पार करोनि तो भवनदी चित्ती जया कृष्ण...