Posts

Showing posts from February, 2026

‘सर गुलगुल द बुलबुल’

Image
  Dear बुलबुल!   मी जेथे जेथे पतीसवे नवीन बदलीच्या गावी जायचे तेथे तेथे जवळच्याच झाडाच्या फांदीवर, कधी वेलाच्या कमानीवर तर कधी कुंडीतल्या झाडावरच तू तुझी वाटीसारखी गोलगोल सुबक सुंदर घरटी बांधून तुझाही संसार थाटायचास. कावळा चिमण्यांच्या अरसिक काड्यांच्या बोजड घरांहून तुझी ही वेगळी सुंदर वाटीसारखी सुबक घरटी मला फार आवडत. तुझ्यासवे मांजर, मुंगुस, साप, सरडे आदि एकमेकांचे शत्रू असलेले अतिथीही घरी हजर होत. आणि तुझ्या पिलांना वाचवण्याची अजून एक नसती जबाबदारी माझ्यावर येऊन पडे. वरवर तुझ्यावर डाफरत मी तुझ्या संसारात समरस होऊन ती पार पाडू लागे. तुझा फास्ट कलर आपल्या सस्य श्यामल देशाला अगदी शोभेसा! तू काही स्थलांतरि पक्षीही नाहीस. ब्रह्म मुहूर्ताला ऊठायची तुला पिढ्यानु पिढ्या लागलेली सनातन सवयही तीच! तरी तुझा जरा आगाऊ ‘स्नॉबिश’ पणा पाहिला की तू जरा अंतर राखूनच मानवी जीवनात वावरतोस असं वाटतं वा तुझा शिष्ठपणा पाहून तुला फार जवळ कोणी केलं नसावं. शुक सारिका मोरांना जवळ करणार्‍या देवदेवताही तुझ्यापासून जरा फटकूनच असतात.   कदाचित अलेक्झांडरच्या शिरस्राणासारखा दिसणारा तुझा तुरा तुल...