Posts

Showing posts from March, 2026

तुकाराम बीज-

  तुकाराम बीज- कुठल्याही चमत्कारांवर माझा विश्वास नाही . तरूणपणी हा ताठरपणा, कडकपणा जरा अजूनच जास्त असतो. एक बंगाली मैत्रिण आणि मी एकदा तुकारामबीजेला देहूला जाऊ या का? म्हणून ठरवत होतो. सर्वांनी सांगितलं, ‘तेव्हा देहूला खूप गर्दी असते हं, उगीच जाऊ नका.’ आम्हालाही पटत होतं. पण ज्या नांदुरकी वृक्षावरून तुकोबाराय सदेह वैकुंठाला गेले त्याची पानं दुपारी बरोबर बारा वाजता सळसळतात आणि तुकोबारायांचं तेथील निसर्गात भरून राहिलेलं अस्तित्व जाणवतं असं जे म्हणतात त्याचा प्रत्यय येतो का नाही हे पहायला आम्ही दोघी उत्सुक होतो. आणि कसं काय माहित नाही पण, आमच्या मनातील शंका वा लोकश्रद्धेवर आमच्या मनात उत्पन्न झालेला संदेह पाहून तुकोबोरायांनी थेट निमंत्रणाचा खलिताच पाठवला असावा. त्याच दिवशी मैत्रिणीच्या पतिदेवांना ऑफिसच्या कामासाठी गाडीने देहूवरून पुढे कुठेतरी कामाला जायचं होतं.  त्यांनी आम्हाला देहूला सोडायचं मान्य केलं. आणि ज्याच्यासाठी केला होता अट्टाहास – त्या नांदुरकीच्या ओढीने आम्ही देहूला पोचलो. अकरा साडे अकरा वाजले असावेत. प्रचंड उन्हाने आमचा ताबा घेतला. त्यात जनतेचा महासागर लोटले...