7 हैमहंस कथा (सुवर्णहंसाची कथा )

 

7 हैमहंस कथा

                                          सुवर्णहंसाची कथा

एका अशाच कुठल्यातरी राज्यात चित्ररथ नावाचा राजा राज्य करत होता. त्याच्या राज्यात कमळांनी सतत फुललेलं पद्मसरोवर नावाचं एक सरोवर होतं. राजाचे रक्षक त्या सरोवराची काळजी घेत असत. आणि त्याची राखणही करत असत. तिथे सुवर्णमय खूप हंस त्या पाण्यात विहार करत असत. ह्या कांचनी हंसांचं एक सोन्याचं पीस दर सहा महिन्यांनी झडून जात असे. ती सर्व सुवर्ण पिसे हे रक्षक गोळा करून राजाला आणून देत. एकदिवस हेमवर्ण नावाचा अजून एक कुठला तरी मोठा पक्षी त्या सरोवरात येऊन राहू लागला. त्याचा हा आगावूपणा पाहून इतर सोनहंस त्याला म्हणाले, हे सरोवर म्हणजे आमचे निवासस्थान आहे. आामच्या मालकिचे आहे. तू असा अचानक आमच्यामधे बळजबरीने रहायला येऊ शकत नाही. हे सरोवर आाम्ही चित्ररथ राजाकडून भाड्याने घेतले आहे. येथे राहण्याच्या बदल्यात आम्ही प्रत्येकजण दर सहा महिन्यांनी आमचे एक सुवर्णपीस त्याला भेट देतो.

बघता बघता त्या पक्षांमधील कलह विकोपाला गेला. तेव्हा तो भला मोठा हेमवर्ण पक्षी चित्ररथाकडे गेला. त्याला मुजरा करून चेहर्‍यावर अत्यंत नम्रभाव दाखवत म्हणाला, ``महाराज मी ह्या सरोवरात रहायला आलो तर हे बाकी सुवर्णहंस मला येथून हुसकावून लावत आहेत. इतकच काय ते मला म्हणाले, ``चित्ररथ कोण लागून गेला? आम्ही त्याला जाणत नाही. तो राजा आमचं काहीही बिघडवू शकत नाही. आम्ही तुलाच काय पण कोणालाही येथे उतरू देणार नाही.’’

त्यांच्या त्या बढाया ऐकून मी त्यांना म्हणालो. तुमचे हे वक्तव्य अशोभनीय आहे. तुमची ही दर्पोक्ती मी राजाला जाऊन सांगतो. महाराज मी आापल्या चरणांवर शरण आलो आहे. जी खरी खुरी गोष्ट होती ती जशीच्या तशी मी आपल्याला सांगितली. आता आपली जी आज्ञा होईल ती इश्वरेच्छा! 

त्या ढोंगी हेमवर्णाचं संभाषण ऐकून राजा चित्ररथ रागाने लाल झाला. त्या सुवर्णहंसांची ही हिम्मत!  असं म्हणत त्याने ताबडतोब आपल्या शिपायाला बोलावलं आणि पद्मसरोवरातल्या त्या सर्व सुवर्णहंसांना तत्क्षणी ठार मारून घेऊन येण्याची आज्ञा फर्मावली.

राजाची आज्ञा मिळालेला तो शिपायी हातात एक बला मोठा सोटा घेऊन पद्मसरोवराच्या दिशेनी निघाला. त्याला सोटा घेऊन येतांना एका वृद्ध हंसानी पाहिलं. त्याचा तो आवेश पाहूनच तो सर्व काही समजून गेला आणि आापल्या सर्व बांधवांना हाक मारत म्हणाला,

स्वजनहो! मला काही ही वेळ बरी दिसत नाही. तो भला मोठा हेमवर्ण राजाकडे आपली तक्रार करणार होता. आता येत असलेला शिपाईही नेहमी प्रमाणे आापली काळजी घेण्यासाठी येत आाहे असे काही दिसत नाही. त्याच्या चेहर्‍यावरील कणखर भाव, हातातील सोटा मला तर काही वेगळच सांगत आहे. आपल्या प्राणांवर बेतेल की का ह्या शंकेनी मी सर्वांना सावध करू इच्छितो. तुम्ही लवकर माझ्या मताशी सहमती दाखवून लवकरात लवकर उंच भरारी घेऊन येथून उडा. पक्ष्यांनाही त्या वृद्ध हंसाचं बोलणं पटल आणि तात्काळ सर्व पक्षी तेथून उडून गेले.

वरील कथा सांगून तो ब्राह्मण सर्व शेजार्‍यापाजार्‍यांना म्हणाला, `` म्हणून मी म्हणतो की जो आपल्यावर अनन्यभावे विसंबून आहे, जो आापल्या आश्रयाला आला आहे, त्याचं रक्षण करणं हे तुमचं कर्तव्य आहे आणि ते जर तुम्ही केलं नाही तर पद्मतलावातील सुवर्णहंस चित्ररथाच्या राज्यातून जसे उडून गेले तसं तुमचं ऐश्वर्य कधीच हातून निसटून जातं.

दुसर्‍या दिवशी सकाळीच तो ब्राह्मण स्वतः मातीच्या कटोर्‍यात दूध घेऊन त्या वारुळापाशी आला आणी मोठ्या मोठ्याने त्या नागदेवतेची स्तुती स्तोत्रे गाऊ लागला. बराच वेळ वारुळात शांत बसलेला नाग ब्राह्मणाची पुन्हा पुन्हा आाळवणी ऐकून आतूनच बोलला, ``अरेरे एका सुवर्णमुद्रेच्या लोभापायी तू पुत्रशोकही विसरून येथे आलास? आता तुझी माझी मैत्री कदापि होऊ शकत नाही. काल तुझ्या मुलानी तारुण्याच्या मस्तीत अति लोभानी माझ्या माथ्यावर मारलेला सोट्याचा जीवघेणा तडाखा मी कधीच विसरू शकणार नाही ना तू आपल्या मुलाचा सर्पदंशाने तडफडून झालेला मृत्यू! आाता तुझी माझी मैत्री योग्य नाही. एवढं बोलून एक बहुमूल्य हिरा त्या ब्राह्मणाला भेट देऊन तो नाग म्हणाला आता परत कधीही येथे येऊ नकोस. इतकं बोलून तो आापल्या बिळात निघून गेला.

तो ब्राह्मणही हातातल्या हिर्‍याकडे बघत आापल्या अविचारी मुलाच्या कृत्याचा पश्चात्ताप करत घरी परत आला.

 वरील कथा सांगून रक्ताक्ष म्हणाला, `` म्हणून मी म्हणतो की, ती जळणारी चिता पहा, लाठीच्या तडाख्यानी छिन्नविच्छिन्न झालेला माझा रक्ताळलेला फणा पहा. मैत्री एकदा तुटली की परत कितीही कृत्रिम प्रेमाचा वर्षाव केला तरी जुळत नाही.

म्हणून सांगतो की शत्रूच्या ह्या एका मंत्र्याला ठार मारलं तर आापल राज्य विनासायास निष्कंटक होईल.’’

मंत्रीवर रक्ताक्षाचं सर्व बोलणं ऐकून घेतल्यावर एक दीर्घ श्वास सोडत घुबडांचा राजा उलूकराज अरिमर्दन मंत्री क्रूराक्षाकडे वळून म्हणाला, मंत्रीवर हे काय सांगत होते ते आपल्याला योग्य वाटते का?

त्यावर क्रूराक्ष म्हणाला, छे छे! ह्याला माझी सम्मती नाही. ह्यांनी जे काही सांगितलं ते पू्र्णपणे निर्दयपणाचं आहे. शरण आलेल्याशी कसं वागायला पाहिजे ह्याची एक गोष्टच आपल्याला सांगतो. एका कबुतराकडे शरण आलेल्या शत्रूचे त्याने कसे यथोचित स्वागत केले इतकेच नव्हे तर आपलचं मांस त्याला देऊन त्याचा कसा अतिथीसत्कार केला, ते सर्वच आख्यान मोठे हृदयंगम आणि अनुकरणीय आहे.

श्रूयते हि कपोतेन शत्रुः शरणमागतः ।

पूजितश्च यथान्यायं स्वैश्च मांसैर्निमन्त्रितः ।। 132

शत्रू भुकेला शरणागताची । दारीच येता अतिथी म्हणूनी ।

त्याला यथाशक्ति कबूतराने । स्वमांस देऊनचि तोषवीले ।। 132

 आश्चर्यानी अरिमर्दनानी विचारलं कुठलं आख्यान? कसली गोष्ट?

तेव्हा क्रूराक्ष पुढील गोष्ट सांगू लागला,

----------------------------------------

 

 

 

 

Comments

Popular posts from this blog

मॉरिशसच्या अंतरंगात – अर्पण पत्रिका -

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)

दशसुन्दरीचरितम् -