भुंगा –
भुंगा – भुंगा पोखरु दे सदैव हृदया ; सांगो मला सर्वदा ` पीडा - खंड ’ कसा असे वगळला आयुष्य ग्रंथातला झाले कागद ते गहाळ मधले आयुष्य ग्रंथातले लागो ही मज टोचणी निशिदिनी ते खंड ना वाचले दुःखाचा खडकाळ दुर्गम कडा गेलो चढोनी न मी काट्याच्यासम राहु दे सलतची हे दुःख माझ्या हृदी माझे लब्धप्रतिष्ठितात उठणे वा बैसणे वागणे हे ऐश्वर्य विलास भोग सगळे ना वैभवासी उणे राहो ते परि पोखरीत हृदया “ ते खंड ” प्रत्यक्ष मी पाहीले नच वाचले अनुभवे काहीच ह्या जीवनी दुःखाचा पथ त्रासदायक महा मी चाललो ना कधी राहो हीच क्षणोक्षणी सल मना काट्यासमा टोचरी उंची झुंबर , गालिचे सजविती उत्कृष्ट शिल्पे घरा संगितासमवेत नृत्य करिती बाला हसोनी जरा सारेची स्तुतिने मला रिझविती त्या धुंद शब्दातुनी नाकारून सुखा , निमंत्रण दिले ना घोर मार्गा कधी कष्टाचा खडकाळ तो पथ पहा मी चाललो ना कधी आनंदातहि राहु दे सलत ही त्या वेदनेची सुरी सौख्याचा पथ हा सरून मजला हा ! धाप लागेल की घेई मी बसुनीच धूळ भरल्या रस्त्यात जेंव्हा कधी तेंव्हाही मनभृंग ...