पुणे ते दिल्ली by गोवा express

 

पुणे ते दिल्ली by गोवा express

Dear शेकरू , शिंगरु, कांगारू, & My Dear लेकरु, 

          Here starts our journey on the foot marks of Shri Ram by Ramayan Express. One day Aba found out that there are exiting travel packages offered by IRCTC and he comfortably booked our tickets on line.

 

*४मार्च*

At wee hour at 3:30 am lekaru (Kanad) dropped us at Pune station 

and without any hassle we boarded the 🚂 train !

खड्डक् with a big sound and with 💥 bang, engine joined the train ; Changing the direction of  Goa Express . …And started the train in the same direction it came from ; but at different destination. We were going to Delhi.

Sky was dark and with every second its shades were changing from dark black to deep blue . On the Bright Red pink horizon bright shining प्रभात तारा(Vines ) and little upward in the sky , bright white sparkling crescent moon! After a long time we were watching them together, shining in their true spirit along with the horizon.

……..,…

Train stopped at odd place. It was not a station. Our ticket checker  Kulkarni informed , “this is  Courd Daund  दौंड क्वार्ड line) “. So this route avoids main station. Train was before time hence was resting for some time. 

……….

विसापूर आलं . सूर्य इमारती मागून नाही तर  क्षितिजावर थेट जमिनीच्या पोटातून वर येत होता.  

 

 

गावाकडचा  ग्राम्य, सुंदर परिसर  दिसू लागला .  टोकदार कळसाची देवळं , त्यांच्यावर फडफडणारे झेंडे, नांगरलेली शेतं, काळीभोर जमिन, दोन, चार, सहा फूट जाडीचा गालिचा अंथरावा तशी हिरवीगार शेतं, कांद्याच्या शेताचा गालिचा जाडीला फूट दिडफूट असला तरी त्याचा गडद हिरवा रंग आणि बिया तयार होण्यासाठी ठेवलेल्या कांद्यांवर पांढरे फुलांचे गोलक ! हिरवागच्च पाच सहा फूट जाडीचा उंच गालिचा  उसाच्या फडाचा!  ज्वारीची कणसं डुलताएत तर कुठे गहू कापणीनंतर उरलेला पिवळा वाढ्यांचा गालिचा!  शेततळी शेतांना समृद्धी वाटून शांत पहुडली होती. भारताची सुजला, सुफला भूमि मोठी ऐंश्वर्यवती, आनंददायी आहे.

 

कुठे कुठे कडेला उगवलेली पिवळ्या फुलांची तरवड, तर कुठे निळसर फुलांनी लगडलेली रुई! आहा! तेवढ्यात एक हरिण पळत गेलं  पाठमोरं असूनही त्याची सरळ मोठी शिंगं स्पष्ट दिसत होती.सकाळची आता सुप्रभात झाली. शहरात न दिसण्यामुळे  गायी, बैल, छकडे, बैलगाड्या, इतकच काय गाढवं दिसलं तरी अप्रूप वाटत होतं

चिंच चिंचांच्या आकड्यांनी लगडलेली, आंबा मोहरलेला, शेता शेतातून फिरणारे बगळे (cattle egrets ) early bird 🦅 catches more 🐛worms खरं करून दाखवत होते. कुठे पक्ष्यांनी गर्दी केलेली झाडं ;तर कुठे वटवाघुळांनी! तेवढ्यात एका झाडावर सुगरणीचे खोपेच खोपे!  तर नारळाच्या झाडावर शुभ्र बगळे! No pollution! झाडं एकदम निरोगी, धुतल्यासारखी स्वच्छ! छान स्वच्छ platforms ! मधेच एका टुमदार स्टेशनच्या इमारतींवर चढलेली मधुमालतीची बहरलेली वेल!

 

ह्या वेळचा बदल म्हणजे अनेक ठिकाणी घराघरांवर फडकणारे भगवे झेंडे! हा फक्त बाह्य बदल नाही तर जनमनाच्या तळात दबलेला आवाज मुक्तपणे बाहेर आल्याची निशाणी तर नाही! मन सुखावलं!

गाडी पुढे चालली आहे निसर्ग, झाडी मागे पडत आहे. मधेच दिसून गेलेले क्षण

 

भुसावळला कोळशानी भरभरून जाणाऱ्या मालगाड्या भुसावळला thermal power station असल्याचं सांगत होत्या तर

“केळीचे फुलले बाग” दिसू लागले आणि “जळगाव आलं रे आलं “ ची दवंडी देऊ लागले. प्लॅटफॅार्मवर ही केळीविक्रीते वाढले. 

तासन्तास क्षितिज दर्शन सोहळा अपूर्व होता. पळसांनी बहार आणली.

5 मार्च 2024

सुप्रभात! धावणारी ट्रेनअनेक स्टेशन्स मागे टाकत आग्रा, मथुरा----- सकाळी 7 वाजता दिल्लीला पोचली.

 

 

Comments

Popular posts from this blog

रामायण Expressअनुक्रमणिका

रामायण Express- ची माहिती

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)