रामायण Express भाग 22 पम्पासरोवराकडे किष्किंधा काण्ड

 

रामायण Express

भाग 22

राम - पम्पासरोवराकडे (किष्किन्धा  कण्ड)



मित्रानो, सीतेला शोधणं सोपं नव्हतच! हताश झालेल्या रामाला लक्ष्मणाचा उपदेश पटला पण पुढे काय कराव? हे काहीच सुचत नव्हत. कळत नव्हत. ‘‘लक्ष्मणा, तूच सांग आता काय कराव?’’ अस म्हणत रामाने लक्ष्मणाकडे पाहिलं. ‘‘आपण जवळची सारी जनपद शोधू या. (जनपद म्हणजे गावं, छोट्या वस्त्या) येथील, पर्वत, गुहा पालथ्या घालू, येथे जनपदातील कोणी काही सीतेसंदर्भात सांगू शकत असेल तर पाहू.’’ लक्ष्मण नुसताच आज्ञाधारक, आज्ञापालक धाकटा भाऊ नाही तर रामाच्या मनात आशेचा किरण निर्माण करणारा, रामाच्या मागे खंबीरपणे उभा राहून प्रत्येक संकटातून त्याला पार करायला मदत करणारा सच्चा साथी आहे.  

जिथे तुटलेला रथ, तुटलेले बाण, रक्ताचा सडा पडलेला दिसत होता तेथेच जवळ आासपास  राम लक्ष्मण सीतेचा कसून शोध घेत असतानाच त्यांना एक भला मोठा पक्षी पडलेला दिसला. हा पक्षी नसून हाच मायावी राक्षस असावा. ह्यानेच माझ्या सीतेला खाल्लं असावं असं म्हणत त्याला ठार मारायला राम धनुष्य सज्ज करत असतानाच तोडातून रक्त, फेस बाहेर येत असलेला जटायू म्हणाला, थांब! एकदा मला रावणाने मारलच आहे. दुसरयांदा तू मारू नकोस. मला माहित आहे दाट रानात एखादि औषधी वनस्पती शोधावी तसं तू सीतेला शोधत आहेस. पण रावण सीतेला पळवून घेऊन गेला आहे. जटायूने सर्व घटनाक्रम सविस्तर रामाला सांगितला. रावणाबरोबरच्या त्याच्या युद्धाची  हकिगत सांगितली. रावणाचा रथ मोडून त्याच्या पिशाच्च तोंडाच्या गाढवांना आणि सारथ्यालाही मारून टाकल्याची घटना सांगितली. सीतेच्या मानसिक अवस्थेची कल्पना दिली रावण सीतेला नैऋत्येकडे घेऊन गेल्याचेही सांगितले. आणि ----जटायू कायमचा सोडून गेला. अत्यंत दुःखी अंतःकरणाने मृत पित्याच्या अंगावरून हात फिरवावा त्याप्रमाणे रामाने त्याच्या अंगावरून प्रेमाने हात फिरवला आणि विधिवत् त्याचा अंत्यविधी केला. मित्रांनो, जटायूचे स्मृतिस्थल नाशिकपासून 45 कि.मि.वर जवळ इगपुरीजवळ ‘‘सर्वतीर्थ टाकेद’’ (घोटीवरून धामणगाववरून 20 कि.मि.) येथे आहे. नासिकच्या पंचवटीतून जाताना रामाला अत्यंत घनदाट आरण्याचा समना करत जायला लागलं. वाटेत अनेक पर्वत पार करायला लागले असा उल्लेख आहे. इगतपुरीचा नजारा जयांनी पाहिला असेल त्यांना सर्वतीर्थ टाकेद ला जटायू पडला आणि त्याचं क्रियाकर्मरामाने तिथे केलं हे पटेल.

 तसेच जटायूचे स्मृतिस्थल आंध्रमधे भद्राचलम् च्या जवळ लेपाक्षीलाही आहे आणि केरळमधे कोल्लम जिल्ह्यात जटायू नेचर पार्क येथेही आहे. आपण रामायण Express च्या रुळावरून जाण्यासाठी ‘‘सर्वतीर्थ टाकेद’’ पासून राम लक्ष्मण कसे गेले असतील हा शोध पाहू.

जटायूने सांगितल्याप्रमाणे रामलक्ष्मणांनी नैऋत्येचा रस्ता धरला. रस्ता कुठला हो! एकानंतर दुसर घनदाट जंगल पार करत जायचं! अनेक राक्षसांशी सामना करत आणि लक्ष्मणाने अयोमुखी राक्षसिणीला शूर्पणखेप्रमाणेच अद्दल घडवली तर राम लक्ष्मणाने कबंध राक्षसाच्या दोन्ही भुजा कापून कबंधाला ठार मारलं. कबंध शापमुक्त झाला आणि रामाला त्याने बौद्धिक मदत करण्याचे वचन दिले. रामलक्ष्मणाने कबंधाला अग्नी देऊन त्याचे अत्यंसंस्कार केल्यावर त्याला दिव्य देह प्राप्त झाला. त्याच्या जवळ असलेलं दिव्य ज्ञान परत त्याला ज्ञात झालं. त्याने रामाला सीतेला सोडवण्यासाठीच्या वा शत्रूला नामोहरम करायच्या सहा युक्त्या सांगितल्या. संधि, विग्रह, यान, आसन, द्वैधिभाव आणि समाश्रय. मित्रांनो संपूर्ण पंचतंत्र ह्याच सहा नीती आपल्याला सांगतं.

कबंध म्हणाला, रामा, जो काही कारणाने हालअपेष्टा भोगत असतो तोच संकटात सापडलेल्या दुसर्‍या माणसाला मदत करतो. रामा, तुझी पत्नी पळवण्यामुळे तू दुःखात आहेस तर ज्याची पत्नी कोणी पळवली आहे असाच एखादा नर तुला मदत करू शकतो. आणि आजमितीस मला अशा परिस्थितीत असलेल्या  अत्यंत पराक्रमी वानरश्रेष्ठ सुग्रीव नावाच्या वानराची आठवण येत आहे. त्याची पत्नी त्याच्या भावाने वालीने पळवली आहे. तो नक्कीच तुला मदत करेल. तू आता संश्रय नावाची नीती वापर.( संश्रय किंवा समाश्रय म्हणजे मदतीसाठी आपल्या सुहृदाच्या आश्रयाला जाणे) आणि सुहृद् सुग्रीवाच्या आश्रयाला जा. त्याच्या भावाने, वालीने अत्यंत रागावून त्याला घरातून हाकलवून दिलं आहे. त्याच्या पत्नीचेही हरण केले आहे. सुग्रीव पंपासरोवराकाठी असलेल्या ऋष्यमूक पर्वतावर चार वानरांसोबत राहत आहे. तो अत्यंत तेजस्वी, सत्यप्रतिज्ञ, विनयशील, धैर्यवान, बुद्धिमान, कार्यदक्ष आणि निर्भिक आहे. तू त्याला जाऊन भेट. अग्नीशेजारी आपली शस्त्रे ठेऊन शपथ घेऊन त्याच्याशी मैत्री कर. तो तुला मदत करेल.’’

कबंधाने त्यानंतर पंपासरोवराचे, तेथील वनस्थलीचे वर्णन करून तेथील मतंगवनात राहणार्‍या शबरीच्या आश्रमाविषयी सांगितले. पम्पासरोवराच्या पूर्वेला असलेल्या ऋष्यमूक पर्वताबद्दल सांगितले. ऋष्यमूक पर्वतावर असलेल्या सुग्रीवाच्या गुहेबद्दल सांगितले. ती गुफा खूप मोठी असली तरी त्यचे द्वार एका भल्या मोठ्या शिळेने झाकले आहे. त्यात आत शिरणे कष्टकारक आहे. पण आपण आवश्य सुग्रीवाबरोबर मैत्री करावी असे सांगू कबंध त्याच्या परम धामाला गेला.

इकडे रामलक्ष्मण पश्चिमेचा मार्ग घेत पम्पासरोवराजवळील मतंग ऋषीच्या आश्रमात पोचले. तेथे रामलक्ष्मणाची आणि शबरीची सुप्रसिद्ध भेट झाली.

सुहृत् हो, श्रीराम व लक्ष्मण ऋष्यमूक पर्वतावर सुग्रीवाला भेटले तेव्हा त्याने सीतेने तिच्या शेल्यात बांधून खाली टाकलेले रत्न माणकांचे दागिने श्रीरामांना दाखवले. रावण आकाशमार्गे सीतेला घेऊन जाताना तिला एका डोंगरावर पाच माकडं बसलेली दिसली. त्याच्याजवळ पडतील असे तिने सर्व दागिने खाली टाकले. ते सुग्रीव आणि त्याचे चार साथीदार होते.

मित्रांनो होस्पेटहून आपण ट़ॅक्सी घेऊन अनेगुंडी, हम्पी, बदामी हा परिसर पाहून येऊ शकता. प्रवासापूर्वी सर्व जागांचा अभ्यास करून गेल्यास नक्कीच फायदा होईल. रामायण express ला वेळेचे बंधन असल्याने सर्व पाहणे आम्हाला शक्य झाले नाही. ( आम्ही विजयी विठ्ठल मंदिर, विरुपाक्ष व कमळाच्या आकाराचा महाल पाहिला. आपण जाल तर नक्की अभ्यास करून कुठल्या जागा पहायच्या आहेत ते ठरवून जा. गुगल लिंक्सवरून आपण शबरी आश्रम, वाली, सुग्रीवाची गुफा पाहू शकाल.

https://www.enidhi.net/2024/01/durga-temple-and-vali-cave-north-hampi.html

https://www.google.com/search?q=vali+cave+hampi&rlz=1C1CHZN_enIN1015IN1015&oq=vali+cave+hampi&gs_lcrp=EgZjaHJvbWUyC

https://www.youtube.com/watch?v=RaYrL6YXLu0

Comments

Popular posts from this blog

रामायण Expressअनुक्रमणिका

रामायण Express- ची माहिती

काकोलूकीयम् (कावळे आणि घुबड यांची युद्धकथा)