ब्रह्मध्वज नमस्तेऽस्तु !
.jpg)
ब्रह्मध्वज नमस्तेऽस्तु ! अशोक चंक्रांकिता, ध्वजा ही राष्ट्राची देवता देवता----गाणं ऐकताना आपल्या राष्ट्रध्वजावरील निळ्या रंगाचं अशोक चिन्ह, त्याच्यावरील 24 आरे असं सर्व चित्र डोळ्यासमोर आपोआप येत राहतं. त्यासोबत अशोकाची गोष्ट, अशोकस्तंभ, स्तंभावरील चार रुबाबदार सिंह! सगळ्या कशा भारताच्या मातीचं नातं सांगणार्या भूषणावह गोष्टी!---मन भरून येतील अशा! ---छाती अभिमानाने भरून येईल अशा! महाराष्ट्राला शिवराजांचा वारसा वा प्रतिक म्हणून लाभलेला जरीपटका म्हणजे महाराष्ट्राची देवताच जणू. पूर्वी ध्वज घेऊन सैन्याच्या आघाडीला राहणारे शूर वीर ‘बिन्नीचे स्वार’ म्हणून ओळखले जात. समरांगणावर जोवर ध्वज फडकत आहे तोवर आपलं सैन्य विजयी आहे हे वेगळं सांगायला लागत नसे. बिन्नीचा स्वार पडला तरी त्याच्या हातातील झेंडा सहजपणे दुसरा सांभाळत असे पण ध्वज खाली पडू देत नसे. इतकं महत्त्व त्या ध्वजाला आहे. प्रत्येक राष्ट्राचा आपला झेंडा असतो. उगवत्या सूर्याचा प्रदेश हे सांगणारा जपानचा झेंडा पांढर्याशुभ्र पृष्ठभागावर लालबुंद सूर्य दाखवतो. तर अमेरिकेत 50 states आहेत हे सांगण्...