Posts

Showing posts from July, 2025

भर्तृहरी-

  भर्तृ हरी -   काही गोष्टी लहानपणी वाचलेल्या असतात. पण ! त्याचा अर्थ कळेपर्यंत आयुष्य संपत येतं. भर्तृहरी नावाचा राजा होता. एक दिवस त्याच्या सभेत एक साधू आला. तो म्हणाला, ‘‘राजा, तू प्रजाहितदक्ष आहेस. न्यायी आहेस, कलेचा भोक्ता आहेस, सर्व सद्गुण तुझ्यावर प्रसन्न आहेत.   मी तुला एक फळ देतो. हे फळ जो कोणी खाईल तो अमर होईल.’’ साधूने झोळीतून एक फळ काढून राजाच्या हातात ठेवलं आणि तो निघून गेला. त्या फळाचा आकार, रंग, रूप इतकं मोहक होतं की ते पहाताक्षणीच खावं असं कोणालाही वाटावं. पण राजा फार निस्पृह होता; त्याने विचार केला की, ‘माझी लाडकी राणी खूप सुंदर आहे. माझ्या राज्याच्या कामापुढे मी तिच्याकडे लक्षच देऊ शकत नाही. मी हे फळ तिला देईन.’ राजाने राणीला फळ दिलं. -----पण! राणीचं उत्कट प्रेम सरसेनापतीवर होतं. राणीने विचार केला सरसेनापती जर उद्याचा राजा झाला तर ---! तिने ते फळ सरसेनापतीला दिलं. सरनौबत पद कायम रहावं म्हणून   सेनापती राणीवर खोटं खोटं   प्रेम आहे असं भासवत असला तरी त्याचं प्रेम एका लावण्यवती गणिकेवर होतं. त्याने ते फळ   त्या गणिकेला दिलं. त्या ग...

मेघदूतम्

  मेघ दूतम् मेघदूत म्हटल की जिभेवर सहजपणे ‘‘आषाढस्य प्रथम दिवसे’’ ही ओळ येते,   खरतर ती काही ह्या काव्याची   पहिली ओळ नाही किंवा   कुठल्या श्लोकाचीही पहिली ओळ नाही.   ती आहे दुसर्‍या श्लोकाची तिसरी ओळ!   पण आज ती त्या काव्याची ओळख सांगणारी   काव्यमुद्रा ठरली आहे. अनेक मराठी कवी व तज्ज्ञांनी केलेल्या अनुवादातही   ‘‘आषाढाच्या प्रथम दिवशी’’   अशीच त्या श्लोकाची सुरवात केली आहे. कवि कालिदासाचा जन्म दिन, वर्ष, इतकच काय पण त्याचं खरं नावही कोणाला माहित नाही. पण आषाढच्या पहिल्या दिवसाला त्याच्या काव्यामुळे इतकं महत्त्व प्राप्त झालं की हा दिवस कविकुलगरू कालिदास दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जाऊ लागला.   काही गोष्टी माणसाला कृतार्थ करणार्‍या असतात. धन्य करणार्‍या असतात.   काशी विश्वनाथाचं दर्शन असो वा पवित्र गंगामय्याचं स्नान असो!   ती अनुभूतीच वेगळी असते. किती यात्रेकरूंनी त्याचा लाभ घेतला, ह्याच्याशी माझं काही देणं घेणं नसतं. माझ्या आधीही लाखो यात्रेकरू येउन गेलेले असतात; नंतरही लाखो येणार असतात.   पण----! मला काशीची तीर...