शुभ्र बहार -
शुभ्र बहार - भोजराजाच्या औदार्याची , दानशूरपणाची कीर्ती ऐकून अनेक दरिद्री लोक मोठ्या अपेक्षेने धारानगरीत येत. कुठलेच काव्यगुण , साहित्यगुण नसलेले हे लोक विन्मुख परत जाऊ नयेत ह्यासाठी कालिदासाला काही ना काही युक्ती शोधावी लागे. प्रत्येकाच्या पात्रतेनुसार तो कोणाला एखादा श्लोक रचून देई आणि तो दरबारात म्हणायला सांगे तर कधी नुसतेच एखादे आशीर्वचन सांगे. पण त्यातही हे लोक काही ना काहीतरी गफलत करत आणि राजावर चमत्कारिक चमत्कारीक आशीर्वादांचा पाऊस पडे. अशावेळेला त्यांच्या चुका सुधारून त्या गरीब लोकांना धन मिळवून देण्यासाठी कालिदासच पुढे येई. एकदा एकजण कालिदासाने सांगितलेला आशीर्वाद घोकत घोकत दरबारात येत असतांना त्याला उंट हा नवीनच प्राणी दिसला. कुतुहलाने त्याचे नाव विचारले असता सांडणीस्वार म्हणाला , `` उष्ट्र म्हणतात याला. '' झाल! ह्या नवीन प्राण्याचं नाव चांगल लक्षात रहावं म्हणून तो उषरट उषरट घोकत राहिला आणि प्रत्यक्ष राजाच्या दरबारात पोचेतो कालिदासानी सांगितलेला मूळ आशीर्वाद विसरून ` उषरट...