Posts

Showing posts from January, 2026

3 गंधवती (सुजला सुफला सस्यश्यामला)

‘‘सुजला सुफला सस्यश्यामला’’ 3 ‘‘ गंधवती ” - आपली वसुंधरा ही गंधवती आहे. सर्व सुगंधांचं आगर. पावसाचे चार थेंब तापलेल्या मातीवर पडताच मातीचा अस्सा सुगंध दरवळायला लागतो की मन वेडावून जातं. असा गंध जगात दुसरा सापडणार नाही.   अन्नपूर्णा स्तोत्रात सर्व प्राणीमात्रांना अन्न पुरवणारी शिवाची पत्नी पार्वती ही दुसरी तिसरी कोणी नसून उर्वी म्हणजे पृथ्वी असल्याचा उल्लेख आहे. (उर्वी सर्व जनेश्वरी- श्लोक 7) ज्या प्रमाणे आपण ध्वज हा राष्ट्राचं प्रतिक मानतो त्याप्रमाणे संपूर्ण पृथ्वीच्या मध्यभागी असलेल्या भारतभूमीला आपण जगाचं प्रतिक मानतो. (पूर्वी zero meridian ही काल्पनिक रेखा भारताच्या मध्यातून उज्जयनीतून जाते असं सर्वत्र मानलं जायचं. ब्रिटिशांच्या सत्तेनंतर ती इंग्लंडमधून जाते असं मानू लागले.) आपल्या भारतभूमीचं वर्णन करताना श्री जगद्गुरू शंकराचार्य म्हणतात, ‘‘ह्या भारतभूमीच्या, ह्या उर्वीच्या, ह्या पार्वतीच्या अंगाला अत्यंत सुगंधी उटी लावलेली आहे. त्यात केशर, चंदन, आगरू, वाळा अशा सुगंधी वनस्पती आहेत. आपल्या भारतभूमीचा नकाशा पाहिला तर भारतभूमीच्या कपाळाच्या जागी असलेल्या काश्मिरमधे केशराची शे...

2 ‘‘ नदीचा जन्मदिवस ’’ (सुजला सुफला सस्यश्यामला)

‘‘सुजला सुफला सस्यश्यामला’’ 2 ‘‘ नदीचा जन्मदिवस ’’ एकदा वसंतपंचमीला आम्ही काहीजण IRCTC तर्फे मध्यप्रदेशात ओंकारेश्वराच्या दर्शनाला गेलो होतो. ओंकारेश्वर हे कावेरी आणि नर्मदा नद्यांच्या संगमावर असलेलं ज्योतिर्लिंग आहे. (ही कावेरी कर्नााटकातील नव्हे.... मध्यप्रदेशातील) तेव्हा तेथे सर्व घाट सजवले जात होते सर्वत्र सुंदर रोषणाई केली गेली होती. देवळांवर विविध रंगी उजेडाचे झोत सोडले होते. आमची राहण्याची सोय नर्मदेच्या तिरी, मध्यप्रदेश टूरिझमच्या ‘Temple View’ यात्रीनिवासात केली होती. रात्री जाग आल्यावर रात्रीच्या नीरव शांततेत समोर वाहणारा नर्मदेचा वेगवान प्रवाह, ओंकारेश्वर मंदिर आणि 108 फूट उंच बाल शंकराचार्यांचा पुतळा प्रकाशाच्या रोषणाईत उजळून गेलेले दिसत होते. मनाला प्रसन्न करत होते. तो वेगवान प्रवाह पाहून वारंवार नर्मदाष्टक जिभेवर रेंगाळत होतं.   पुढे पुढेचि धावतो जलौघ नर्मदे तुझा मिळावयासि सिंधुलाचि ओढ लागली तुला तरंगमालिका असंख्य रम्य सौम्य सुंदरा तुझ्या पदास भूषवी अनंत ह्या अनंत ह्य...

1 ‘‘ आपली झाडं आपले प्राणी ’’ (सुजला सुफला सस्यश्यामला)

  रसिक वाचक हो! ‘‘सुजला सुफला सस्यश्यामला’’   ही नवीन लेखमाला आपण सुरू करत आहोत. लेखमालेचं शीर्षक हे आपल्या भारतभूमीशिवाय दुसर्‍या कोणाला लागू होणार? भारतभूमीविषयी विशेष प्रेम, आस्था असलेल्या अरुंधती प्रवीण दिक्षित ह्याची ही लेखमाला आपल्या मासिकात   आपण समाविष्ट करत आहोत. जरूर वाचा. ‘‘सुजला सुफला सस्यश्यामला’’ ( feb.) 1 ‘‘ आपली झाडं आपले प्राणी ’’ असच एक बेट आहे. त्याचं नाव आहे रॉड्रिग्ज! मॉरिशसच्या अखत्यारीत येणारं! मॉरिशस सरकारच्या कामानिमित्त श्री. दीक्षितांबरोबर त्या बेटावर 4-5    दिवस राहण्याचा योग आला. श्री. दीक्षित आणि त्याच्या सार्‍या टीमसोबत छोट्याशा एअरपोर्टवर उतरलो. सरकारी गाडी न्यायला आली होती.   गाडीत रेडिओ चालू होता .  आम्ही गप्पा मारत असतांनाच ड्रायव्हरने रेडिओवर चालू असलेल्या बातम्यांकडे आमचं लक्ष वेधलं .  इंडियाहून आपल्या मदतीसाठी मॉरिशसला आलेले भारतीय डेलिगेशन रॉड्रिग्जला पोचल्याचे ठळक बातम्यांमधे सुरवातीलाच सविस्तर सांगत होते . ‘‘ भारतीय डेलिगेशनचं स्थानिक प्रशासनातर्फे स्वागत असो’’! असं सांगितलं जात होतं.   मला त्...