राजा भोज आणि अमूल्य हिरा राजा भोज त्याच्या योग्य न्याय देण्यासाठी प्रसिद्ध होता. न्याय दानाचं काम वाटतं तेवढं सोपं नसतं. गोष्टी दिसतात तशा नसतात. त्यांचे अनेक कंगोरे असतात. धर्म हा सूक्ष्म असतो. एका प्रसंगी न्याय्य वाटणारे विचार दुसर्या प्रसंगात अन्यायकारक असू शकतात. अशा वेळी अत्यंत जागरूकपणे न्याय देणे अपेक्षित असते. एकदा भोजाकडे दोन भाऊ न्याय मागायाला आले. ते एका धनिकाचे पुत्र होते. धनिकाने मरण्यापूर्वी त्याच्या सर्व सम्पत्तीची योग्य रीतीने दोघांमधे वाटणी केलेली होती. त्याच्याकडे असलेले दोन सुलक्षणी घोडे दोघांना एकएक असे दिले होते. त्या धनिकाजवळ एक अमूल्य हिरा होता. हा अत्यंत महागडा हिरा ह्या कुठल्या मुलाला द्यावा ह्यासाठी त्याने एक अट लिहून बंद पाकिटात ठेवली होती व राजा त्यावर निर्णय घेईल असे सांगितले होते. वडिलांनी लिहीलेली ती वाटणीची अट घेऊन ती दोन्ही मुले राजाकडे आली. राजाने तो बंद लिफाफा उघडून सर्व दरबारी आणि त्या दोन्ही भावांसमक्ष प्रधानास ते पत्र वाचून दाखवायला सांगितले. ‘‘राजा, माझ्या दोन्ही मुलांच्या घोडदौडीची शर्यतीत ज्याचा घोडा मागे राहील त्याला हा अमूल...
Comments
Post a Comment