अंगिरस आणि सांदीपनी
अंगिरस आणि सांदीपनी अंगिरस मुनी अत्यंत तेजस्वी व ब्रह्मज्ञानी होते. सर्वप्रथम त्यांनीच कृत्रिम रित्या अग्नीची निर्मिती केली असे म्हटले जाते. (अनेक पाठभेदही आहेत.) पण आजच्या भाषेत सांगायचं झालं तर अंगिरस हे महान शास्त्रज्ञ असले पाहिजेत. अंगिरसांचा शिष्य परिवारही मोठा होता. अनेक बुद्धिमान शिष्य त्यांच्या गुरूकुलात शिकत होते व विद्यापारंगत होत होते. त्यातच सांदीपनीही होता. सांदीपनी इतर विद्यार्थ्यांसारखा हुशार नव्हता पण सांदीपनीकडे एक दुसराच गुण होता. त्याच्यात विलक्षण सेवाभावी वृत्ती होती. गुरूंची सेवा तो अत्यंत मनोभावे करत असे. त्याचा अनन्यभाव असा की माझ्या गुरूचे आसनही मीच घालीन, त्यांना पाणीही मीच देईन, अन्नही मीच रांधीन, वाढीनही मीच, त्यांचा बिछाना मीच घालीन, पायही मीच दाबीन, गुरूच्या मुखातून जे जे बाहेर पडेल ते ते मीच त्याला देईन. सांदीपनीच्या ह्या अनन्य सेवेमुळे अंगिरसाच्या मनात सांदीपनीबद्दल प्रेम नसते उपजले तरच नवल. एकदा अंगिरस ऋषी आजारी पडले. त्यांना आपल्या आजाराचं स्वरूप समजून चुकलं होत. ह्या आजारातून आपण बरे होऊ शकणार नाही हे लक्षात येताच अंग...