घनघनमाला
घनघनमाला
आपल्या तृषार्त भूमीला कायम मेघांची ओढ लागलेली असते. सूर्य दर्शन
नाही असा लांबलचक काळ आपल्याकडे नसतो. तिन्ही मौसम साही ऋतु आपल्या आपल्या वेळेला
येऊन भारतावर कृपेचा वर्षाव करत असतात. वर्षभर सततचा पिरपिर पाऊस---"आता तरी
जा बाबा—" असा नकोसा नाराज सूर लावू देत नाही. उन्हाळ्याने धरणी तापून माती मोकळी
मोकळी होत असताना चिमण्या आणि पक्ष्यांनी मातीत पंख फरफर करत मृत्तिका स्नान सुरू
केलं की; कावळ्यांनी घरटी बांधायला सुरवात केली की; गुलमोहराने आपली लालचुटुक
छत्री उघडली की; अमलतासाने आपल्या कानात पुष्कराजाची पिवळी कर्णफुले माळली की; कडुनिंब
आणि आंब्यावर पुन्हा लाल चमकदार पालवी डोकावू लागली की; आकाशात अगस्तीच्या तार्याचा
अस्त झाला की; पावशाने ‘पेरते व्हा’ ची साद घातली की ---------- !!!
आकाशातून ढगांचे गोळे
आनंदानी डोकावून पाहू लागतात. दही घुसळायला लागल्यावर थोडे थोडे लोण्याचे अस्तित्व
जाणवावे तसे निळ्याशार आकाशात वार्यानी घुसळायला सुरवात केली की ढगांचे हलके हलके
उमटणारे फरकाटे हळुहळु लोण्याच्या गोळ्यांसारख्या ढगांमधे एकत्रित व्हायला लागतात.
आकाशात पांढरे ढग्गु गोळे दाट होत काळ्या रंगाकडे झुकायला लागतात. वार्याचं
घुसळणं सुरूच असतं आणि बघता बघता आकाशात ढगांचं दाट लोणी तयार होतं. काळ्या काळ्या
ढगांच्या एकावर एक थप्प्या साठायला सुरवात होते. विविध आकाराचे ढग सकाळ संध्याकाळ
छानशी चित्रनगरी तयार करतात. त्यात गणपती, शंकर, मगर, देऊळ अशी कुठली कुठली चित्र
तयार झाली आहेत हे पहायचा सर्वांनाच नाद लागतो.
कालिदासालाही एका भल्या मोठ्या ढगाला पाहून त्यात डोंगराला धडक
देणारा भला मोठा गजराज दिसायला लागतो. ह्या प्रवासी ढगाला तो आपल्या प्रियेच्या
घराचा (अगदी आज ‘लोकेशन’ कळविल्या प्रमाणे) कुठून कसा कसा जा हा सविस्तर मार्ग
सांगतो.
पहिला पाऊस येतो तोही येतांना साग्रसंगित त्याच्या येण्याची वर्दी
देत, नगारे वाजवतच येतो. बिजलीचे आसूड ढगांतून ओढत येतो. अशा ह्या पहिल्या पावसाची
वाट आपण सारेच जण पहात असतो. प्राणी, पक्षी, माणसं तर वाट पहातच असतात पण झाडं आणि
चुपचाप झोपलेल्या बियाही ह्या पावसाची वाट बघत असतात.
ह्या झाडांमधेच दक्षिण
भारतात असलेलं एक खास झाड आहे. त्याचं नाव
अंकोल. जानेवारी फेब्रुवारीतच त्याला फुलं येऊन छोटी गोडसर फळं जमिनीवर विखुरतात.
मुंग्या ही गोड फळं खाऊन टाकतात आणि आतल्या बिया जमिनीवर पसरतात. ह्या चिमुकल्या बिया
पावसाची वाट बघत असतात. त्यांना जणु पावसाच्या थेंबांची पहिली टपटप ऐकू येते.
बिजलीची चमकदार रेघ त्यांच्याही मनात एक ओढ निर्माण करते. आणि एका रात्रीत रानोमाळ
इतस्ततः पडलेल्या सगळ्या बिया मूळ झाडाच्या बुंध्याला जाऊन चिकटतात. झाडाच्या मुळांपाशीच रुजतात, उगवतात. झाडाला जर
पार बांधलेला असेल तर पाराला जाऊन चिकटतात. कशा ते अजून कोणालाच कळलं नाही. असं म्हणतात की, ह्या बिया झाडाला कशा चिकटतात
हे पहायला आद्य शंकराचार्य रात्रभर जागे राहिले पण त्यांनाही ही जादू लक्षात आली
नाही. बिन पायाच्या बिया कुठल्या ओढीने आपल्या जन्मदात्या झाडाला भेटायला जातात न
कळे. अंकोलाच्या बियांची झाडाकडे धाव घेणारी तीव्र ओढ पाहून आद्य शंकराचार्यांना
वाटलं भक्ती असावी ती अशी! ते म्हणतात,
येती पुष्प फळे वसंतऋतुते अंकोलवृक्षास त्या
बीजे मुक्तची वाळुनी पसरती मातीत त्या खालच्या।।
जाता ग्रीष्म सरून वावटळ ती येतेच जेंव्हा नवी
संगे घेउन पावसास चमके विद्युलता ती नभी ।।
काळोख्या रजनीस ती विखुरली बीजेच मातीतली
घेती आश्रय घट्टची बिलगुनी वृक्षास फांद्यांसही।।
ना सोडी तरुसी तिथेच रुजती अंकोल वृक्षापदी
तैसे चित्त सदैव पाउलि तुझ्या राहो भवानीपती ।।
त्यासी अन्य गती नसो तुजविणा गंगाधरा कोणती
माझी भक्ति रुजो तुझ्याच चरणी ही प्रार्थना एकची।।
कोरड्या मातीवर पाण्याचे थेंब पडले की सुगंध दरवळतो आणि त्याचसोबत
मातीच्या उबदार कुशीत गाढ झोपलेल्या चिमुकल्या बियांना नवीन जीवनाची सुरवात
करण्याचा संदेश मिळतो. पावसाच्या थेंबांमुळे विशेषतः एकदल धान्याचे बियाणे 30 ते
40 टक्के अधिक वेगाने अंकुरित होते.
अमेरिकेतील मॅसेच्युसेट्स इंस्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीच्या
वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनानुसार, प्रत्येक बी ला जमिनीची खालची दिशा आणि
आकाशाची वरची दिशा समजेल असा स्टॅटोलिथ नावाचा दाट,जड अशा स्टार्चनी बनलेला
पिटुकला भाग/अवयव प्रत्येक पेशीच्या बुडापाशी असतो. जेव्हा पावसाचे थेंब जमिनीवर
अथवा पाण्यात पडतात तेव्हा टपटप होणारा आवाज ध्वनीलहरी आणि हळुवार दबावाच्या लहरी
निर्माण करतात. त्याने जवळपासच्या बियांमधले स्टॅटोलिथचे कण जागृत होतात, जरा
मोकळे होतात. त्यांना वरची दिशा कळते आणि वरच्या दिशेने अंकुर वेगाने वाढायला
सुरवात होते. (MIT News)
पावसाच्या थेंबांमुळे तयार
होणार्या तरंगलहरी बियांना जागवतात आणि त्यांच्या अकुरण्याची वेळ आल्याची त्यांना
आठवण करून देतात.
पहिल्या पावसात चिंब भिजायची तीव्र इच्छा, वर्षास्नान आणि पावसात
न्हाऊन चिंब झालेली; पावसाने समृद्ध झालेली पृथ्वीरूपी लक्ष्मी ह्या अत्यानंद
देणार्या भारतीय कल्पना मला फार वेगळ्या आणि अनमोल वाटतात.
पावसात भिजून चिंब चिंब होणार्या वसुंधरेला पाहून; तिच्यावर चारी
दिशांनी जलवर्षाव करणारे हत्तीसारखे
प्रचंड ढग पाहून; पावसामुळे तृप्त, सुजला, सुफला झालेली वसुंधरा पाहून; ह्या
सस्यश्यामला वसुंधरेच्या रूपातील गजांत लक्ष्मीची मूर्ती साकार करत कनकधारा
स्तोत्रात श्री आद्य शंकराचार्य म्हणतात,
हे माय! ऐश्वर्य़ आणि औदार्य हे दोन्ही गुण हातात हात घालून अत्यंत
नम्र भावाने जणु तुझ्यापाशी कायमचे राहतात. माहेर सासर दोन्हीकडून तू सम्पन्न
आहेस. अमृताच्या सागराची तू पुत्री आहेस. तर तिन्ही लोकांचे, चौदा भुवनांचे जे
नायक श्रीविष्णू त्यांची तू धर्मपत्नी आहेस. ह्या सर्व विश्वाची, जगाची तू माय
आहेस. तुझ्या ऐश्वर्याला काही कमीच नाही. माते तुला मी वारंवार नमस्कार करतो.
माते चारी दिशात जणु चार मदमस्त हत्ती त्यांच्या सोंडेत सुवर्णकलश
घेऊन उभे आहेत. त्यांचे कलश अत्यंत पवित्र अशा स्वर्गीय जलाने भरलेले आहेत. वारंवार
ते तुझ्यावर त्या विमल जलाचा वर्षाव करत आहेत. तुला अभिषेक करत आहेत. त्या
स्फटिकासमान पारदर्शक जलाने तू अगदी चिंब चिंब झाली आहेस. माय ह्या जलाने कदाचित
तू बाह्यांगाने ओली झाली असशील ही; परंतु तुझ्या हृदयात दयेचा पाझर स्वभावतःच आहे.
सर्वांचं दारिद्र्य, दुःख, भय दूर करून सर्वांवर कृपा करणारं तुझं मन अत्यंत
दयार्द्र आहे. तुला ‘सर्वोपकारकरणाय सदार्द्रचित्ता’ म्हणतात
ते उगीच का? तुझ्यासारखी अत्यंत कनवाळु,
सर्वांवर उपकार करण्यासाठी सदैव कटिबद्ध अशी कोणी व्यक्ती मिळू शकेल का?
श्रीसूक्तामधेही लक्ष्मीचे ‘आर्द्रा’
हे विशेषण आले आहे. पाऊस-पाण्याने छान भिजलेल्या जमिनीलाही लक्ष्मी म्हटले जाते ते
ह्यासाठीच. अशी जमिन धान्याच्या रूपात जणू लक्ष्मीच देत असते.
अन्नपूर्णास्तोत्रातील अन्नपूर्णा दुसरी तिसरी कोणी नसून उर्वी म्हणजे ही वसुंधराच आहे.
हे माय म्हणूनच सुजला, सुफला सस्यश्यामला अशा ऐश्वर्यसम्पन्न आणि
औदार्यपूर्ण असलेल्या तुला मी शरण आलो आहे . माझं मनोरथ तूच पूर्ण करू शकशील. माय
तुला पुन्हा पुन्हा वंदन!
चारी
दिशात सजले गज स्वागतासी
गंगा सलीलयुत हेमघटा धरोनी
वर्षाव
ते तुजवरी करिती जलाचा
आहे अती विमल जे सुखवी तनूला॥17.1
तू
चिंब गे सुखद त्या जल-वृष्टीने ची
पुत्रीच त्या जलधिची सुखसागराची
आहेत थोर उपकार तुझेच आई
विश्वावरी सकल या गणती न त्यासी।।17.2
सत्ता अबाधित जयाचिच तीन
लोकी
त्या लोकनाथ हरिची असशीच
पत्नी
प्राणप्रियाच हरिची जननी
जगाची
माते करी नमन मी तव
पादपद्मी ।।17.3
-------------------------------------------------
अरुंधतीप्रवीणदीक्षित-
घनघनमाला
आपल्या तृषार्त भूमीला कायम मेघांची ओढ लागलेली असते. सूर्य दर्शन
नाही असा लांबलचक काळ आपल्याकडे नसतो. तिन्ही मौसम साही ऋतु आपल्या आपल्या वेळेला
येऊन भारतावर कृपेचा वर्षाव करत असतात. वर्षभर सततचा पिरपिर पाऊस---"आता तरी
जा बाबा—" असा नकोसा नाराज सूर लावू देत नाहीत. उन्हाळ्याने धरणी तापून माती
मोकळी मोकळी होत असताना चिमण्या आणि पक्ष्यांनी मातीत पंख फरफर करत मृत्तिका स्नान
सुरू केलं की; कावळ्यांनी घरटी बांधायला सुरवात केली की; गुलमोहराने आपली लालचुटुक
छत्री उघडली की; अमलतासाने आपल्या कानात पुष्कराजाची पिवळी कर्णफुले माळली की;
कडुनिंब आणि आंब्यावर पुन्हा लाल चमकदार पानं डोकावू लागली की; आकाशात अगस्तीच्या
तार्याचा अस्त झाला की; पावशाने ‘पेरते व्हा’ ची साद घातली की ----------- !!!
आकाशातून ढगांचे गोळे आनंदानी
डोकावून पाहू लागतात. दही घुसळायला लागल्यावर थोडे थोडे लोण्याचे अस्तित्व जाणवावे
तसे निळ्याशार आकाशात वार्यानी घुसळायला सुरवात केली की ढगांचे हलके हलके उमटणारे
फरकाटे हळुहळु लोण्याच्या गोळ्यांसारख्या ढगांमधे एकत्रित व्हायला लागतात. आकाशात
पांढरे ढग्गु गोळे दाट होत काळ्या रंगाकडे झुकायला लागतात. वार्याचं घुसळणं सुरूच
असतं आणि बघता बघता आकाशात ढगांचं दाट लोणी तयार होतं. काळ्या काळ्या ढगांच्या
एकावर एक थप्प्या साठायला सुरवात होते. विविध आकाराचे ढग सकाळ संध्याकाळ छानशी
चित्रनगरी तयार करतात. त्यात गणपती, शंकर, मगर, देऊळ अशी कुठली कुठली चित्र तयार
झाली आहेत हे पहायचा सर्वांनाच नाद लागतो.
कालिदासालाही एका भल्या मोठ्या ढगाला पाहून त्यात डोंगराला धडक
देणारा भला मोठा गजराज दिसायला लागतो. ह्या प्रवासी ढगाला तो आपल्या प्रियेच्या
घराचा (अगदी आज ‘लोकेशन’ कळविल्या प्रमाणे) कुठून कसा कसा जा हा सविस्तर मार्ग
सांगतो.
पहिला पाऊस येतो तोही येतांना साग्रसंगित त्याच्या येण्याची वर्दी
देत, नगारे वाजवतच येतो. बिजलीचे आसूड ढगांतून ओढत येतो. अशा ह्या पहिल्या पावसाची
वाट आपण सारेच जण पहात असतो. प्राणी, पक्षी, माणसं तर वाट पहातच असतात पण झाडं आणि
चुपचाप झोपलेल्या बियाही ह्या पावसाची वाट बघत असतात.
ह्या झाडांमधेच दक्षिण
भारतात असलेलं एक खास झाड आहे. त्याचं नाव
अंकोल. जानेवारी फेब्रुवारीतच त्याला फुलं येऊन छोटी गोडसर फळं जमिनीवर विखुरतात.
मुंग्या ही गोड फळं खाऊन टाकतात आणि आतल्या बिया जमिनीवर पसरतात. ह्या चिमुकल्या
बिया पावसाची वाट बघत असतात. त्यांना जणु पावसाच्या थेंबांची पहिली टपटप ऐकू येते.
बिजलीची चमकदार रेघ त्यांच्याही मनात एक ओढ निर्माण करते. आणि एका रात्रीत रानोमाळ
इतस्ततः पडलेल्या सगळ्या बिया मूळ झाडाच्या बुंध्याला जाऊन चिकटतात. झाडाच्या मुळांपाशीच रुजतात, उगवतात. झाडाला जर
पार बांधलेला असेल तर पाराला जाऊन चिकटतात. कशा ते अजून कोणालाच कळलं नाही. असं म्हणतात की, ह्या बिया झाडाला कशा चिकटतात
हे पहायला आद्य शंकराचार्य रात्रभर जागे राहिले पण त्यांनाही ही जादू लक्षात आली
नाही. बिन पायाच्या बिया कुठल्या ओढीने आपल्या जन्मदात्या झाडाला भेटायला जातात न
कळे. अंकोलाच्या बियांची झाडाकडे धाव घेणारी तीव्र ओढ पाहून आद्य शंकराचार्यांना
वाटलं भक्ती असावी ती अशी! (शिवानंदलहरी)
येती पुष्प फळे वसंतऋतुते अंकोलवृक्षास त्या
बीजे मुक्तची वाळुनी पसरती मातीत त्या खालच्या।।
जाता ग्रीष्म सरून वावटळ ती येतेच जेंव्हा नवी
संगे घेउन पावसास चमके विद्युलता ती नभी ।।
काळोख्या रजनीस ती विखुरली बीजेच मातीतली
घेती आश्रय घट्टची बिलगुनी वृक्षास फांद्यांसही।।
ना सोडी तरुसी तिथेच रुजती अंकोल वृक्षापदी
तैसे चित्त सदैव पाउलि तुझ्या राहो भवानीपती ।।
त्यासी अन्य गती नसो तुजविणा गंगाधरा कोणती
माझी भक्ति रुजो तुझ्याच चरणी ही प्रार्थना एकची।।
कोरड्या मातीवर पाण्याचे थेंब पडले की सुगंध दरवळतो आणि त्याचसोबत
मातीच्या उबदार कुशीत गाढ झोपलेल्या चिमुकल्या बियांना नवीन जीवनाची सुरवात
करण्याचा संदेश मिळतो. पावसाच्या थेंबांमुळे विशेषतः एकदल धान्याचे बियाणे 30 ते
40 टक्के अधिक वेगाने अंकुरित होते.
अमेरिकेतील मॅसेच्युसेट्स इंस्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीच्या
वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनानुसार, प्रत्येक बी ला जमिनीची खालची दिशा आणि
आकाशाची वरची दिशा समजेल असा स्टॅटोलिथ नावाचा दाट,जड अशा स्टार्चनी बनलेला
पिटुकला भाग/अवयव प्रत्येक पेशीच्या बुडापाशी असतो. जेव्हा पावसाचे थेंब जमिनीवर
अथवा पाण्यात पडतात तेव्हा टपटप होणारा आवाज ध्वनीलहरी आणि हळुवार दबावाच्या लहरी निर्माण
करतात. त्याने जवळपासच्या बियांमधले स्टॅटोलिथचे कण जागृत होतात, जरा मोकळे होतात.
त्यांना वरची दिशा कळते आणि वरच्या दिशेने अंकुर वेगाने वाढायला सुरवात होते. (MIT
News)
पावसाच्या थेंबांमुळे तयार
होणार्या तरंगलहरी बियांना जागवतात आणि त्यांच्या अकुरण्याची वेळ आल्याची त्यांना
आठवण करून देतात.
पहिल्या पावसात चिंब भिजायची तीव्र इच्छा, वर्षास्नान आणि पावसात
न्हाऊन चिंब झालेली; पावसाने समृद्ध झालेली पृथ्वीरूपी लक्ष्मी ह्या अत्यानंद
देणार्या भारतीय कल्पना मला फार वेगळ्या आणि अनमोल वाटतात.
पावसात भिजून चिंब चिंब होणार्या वसुंधरेला पाहून; तिच्यावर चारी
दिशांनी जलवर्षाव करणारे हत्तीसारखे
प्रचंड ढग पाहून; पावसामुळे तृप्त, सुजला, सुफला झालेली वसुंधरा पाहून; ह्या
सस्यश्यामला वसुंधरेच्या रूपातील गजांतलक्ष्मीची मूर्ती साकार करत कनकधारा स्तोत्रात
श्री आद्य शंकराचार्य म्हणतात,
हे माय! ऐश्वर्य़ आणि औदार्य हे दोन्ही गुण हातात हात घालून अत्यंत
नम्र भावाने जणु तुझ्यापाशी कायमचे राहतात. माहेर सासर दोन्हीकडून तू सम्पन्न
आहेस. अमृताच्या सागराची तू पुत्री आहेस. तर तिन्ही लोकांचे, चौदा भुवनांचे जे
नायक श्रीविष्णू त्यांची तू धर्मपत्नी आहेस. ह्या सर्व विश्वाची, जगाची तू माय
आहेस. तुझ्या ऐश्वर्याला काही कमीच नाही.
माते चारी दिशात जणु चार मदमस्त हत्ती त्यांच्या सोंडेत सुवर्णकलश
घेऊन उभे आहेत. त्यांचे कलश अत्यंत पवित्र अशा स्वर्गीय जलाने भरलेले आहेत.
वारंवार ते तुझ्यावर त्या विमल जलाचा वर्षाव करत आहेत. तुला अभिषेक करत आहेत. त्या
स्फटिकासमान पारदर्शक जलाने तू अगदी चिंब चिंब झाली आहेस. माय ह्या जलाने कदाचित
तू बाह्यांगाने ओली झाली असशील ही; परंतु तुझ्या हृदयात दयेचा पाझर स्वभावतःच आहे.
सर्वांचं दारिद्र्य, दुःख, भय दूर करून सर्वांवर कृपा करणारं तुझं मन अत्यंत
दयार्द्र आहे. तुला ‘सर्वोपकारकरणाय सदार्द्रचित्ता’ म्हणतात
ते उगीच का? तुझ्यासारखी अत्यंत कनवाळु,
सर्वांवर उपकार करण्यासाठी सदैव कटिबद्ध अशी कोणी व्यक्ती मिळू शकेल का?
श्रीसूक्तामधेही लक्ष्मीचे ‘आर्द्रा’
हे विशेषण आले आहे. पाऊस-पाण्याने छान भिजलेल्या जमिनीलाही लक्ष्मी म्हटले जाते ते
ह्यासाठीच. अशी जमिन धान्याच्या रूपात जणू लक्ष्मीच देत असते.
अन्नपूर्णास्तोत्रातील अन्नपूर्णा दुसरी तिसरी कोणी नसून उर्वी म्हणजे ही वसुंधराच आहे.
हे माय म्हणूनच सुजला, सुफला सस्यश्यामला अशा ऐश्वर्यसम्पन्न आणि
औदार्यपूर्ण असलेल्या तुला मी शरण आलो आहे . माझं मनोरथ तूच पूर्ण करू शकशील. माय
तुला पुन्हा पुन्हा वंदन!
चारी
दिशात सजले गज स्वागतासी
गंगा सलीलयुत हेमघटा धरोनी
वर्षाव
ते तुजवरी करिती जलाचा
आहे अती विमल जे सुखवी तनूला॥17.1
तू
चिंब गे सुखद त्या जल-वृष्टीने ची
पुत्रीच त्या जलधिची सुखसागराची
आहेत थोर उपकार तुझेच आई
विश्वावरी सकल या गणती न त्यासी।।17.2
सत्ता अबाधित जयाचिच तीन
लोकी
त्या लोकनाथ हरिची असशीच
पत्नी
प्राणप्रियाच हरिची जननी
जगाची
माते करी नमन मी तव
पादपद्मी ।।17.3
-------------------------------------------------
अरुंधतीप्रवीणदीक्षित-
Comments
Post a Comment