Posts

Showing posts from November, 2026

10 मङ्गलम्

  म ङ्ग ल म् ‘मंगलम्’   ह्या लेखासोबत आपली ‘सस्य श्यामला’ ही दहा लेखपुष्पांची माला ओवून पूर्ण होत आहे. मंगलकार्य असो वा मंगलमूर्तीचा उत्सव असो; हाती घेतलेले कार्य निर्विघ्न पार पडले ह्यासाठी, कृतज्ञतापूर्वक आपण देवाची पूजा करून काही मागणे मागतो. सुख, समृद्धीसाठी घरोघरी अनेक प्रकारच्या पूजा मनोभावे केल्या जातात;   सत्यनारायणाची पूजा घरोघरी घातली जाते; पण मागणे हे मात्र विश्व कल्याणासाठी मागितले जाते.   सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः । सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दःखमाप्नुयात् ।। सर्वजण सुखी असोत. सर्व निरोगी असोत, सर्वांच्या जीवनात मंगलमय घटना घडोत. सर्वांना कल्याणाचा मार्ग दिसो. दुःख कोणाच्या वाट्याला न येवो. पंढरपूरची वारी सम्पन्न झाली की, आषाढी एकादशीला पहाटे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची पूजा होते. सर्व पत्रकार मुख्यमंत्र्यांना विचारतात, ‘‘देवाकडे काय मागणे मागितले’’? प्रत्येक आदरणीय मुख्यमंत्री हेच सांगतात की, ‘‘विठुराया माझ्या राज्यात, माझ्या देशात चांगला पाऊस पडु देत, सर्वांना प्यायला आणि शेतीला मुबलक पाणी दे. सोळा आणे पीक येऊ दे,...

9 ‘‘ सुजला भारतभूमीचे दर्यावर्दी पुत्र ’’

9 ‘‘ सुजला भारतभूमीचे दर्यावर्दी पुत्र ’’     पाण्यात राहून सर्व जलचरांची पाण्याशी मैत्री असते. मग माणसाची कशी नसेल बर? सुजला असलेल्या भारतभूमीला तीन बाजूंनी 7000 कि.मी. इतका प्रशस्त व दीर्घ सागर किनारा लाभला आहे. तर भारताच्या ताब्यातील सर्व बेटे धरली तर हा समुद्र किनारा 11 ते 12 हजार कि. मि. इतका सुदूर पसरला आहे. भारतभूमीचं सौंदर्य, ऐश्वर्य शेकडो पटींनी वाढवायचे काम हे किनारे   करतात. भारताच्या पूर्वेला गंगासागर किंवा महोदधी तर पश्चिमेला असलेला सिंधूसागर भारताचे किनारे समृद्ध करतात.   अथांग समुद्र आम्हा भारतीयांना अनादि काळापासून बोलवत आहे. लाटांचे हात पसरून माणसांना, जहाजांना तारण्यासाठी उत्सुक आहे. झाड दिसल्यावर पक्षी ज्या सहजतेने झाडावर बसतो त्याप्रमाणे माणसाला पाणी पाहून त्यात सूर मारवा असं वाटणार नाही हे कसं शक्य आहे? त्याच्यात नाव, जहाज घालून त्याचा अथांगपणा आजमावावा असं कुतुहल कसं वाटलं नसेल? आपल्या पलिकडे कोण शेजारी राहत असावा हे कुतुहल माणसाला स्वस्थ कसं बसु देईल? दर्यावर्दीपण भारतीयांच्या नसानसातून पूर्वीपासून सळसळत आहे. मोती, विविध खनिजं, क्र...

शाकम्भरी इति विख्याता

    शाकम्भरी इति विख्याता ‘अल निनो’ चा प्रभाव आपण ह्या वर्षी पावसाळ्याच्या सुरवातीलाच आज पाणी कपात! उद्या पाणी कपात!!---- म्हणत अनुभवला आहे. एक दिवस पाणी नाही म्हटलं की तोंडचं पाणी पळतं; मग असा दुष्काळ एक नाही दोन नाही तब्बल शंभर वर्षे पडला तर काय होईल?   आपल्याला माहित आहे का? असा भीषण दुष्काळ भारतात खरोखर शंभर वर्ष पडला होता. नेमका हा कालखंड कोणता हे मात्र शास्त्रज्ञांना कळत नव्हतं.   त्यांनी पूर्वीचे दस्ताऐवज धुंडाळायला सुरवात केली. पू्र्वीच्या ठिकठिकाणच्या पावसाच्या नोंदी शोधल्या गेल्या. ठिकठिकाणच्या नद्यांवरील पातळी दाखवणार्‍या नोंदी तपासल्या. पण नाही. त्यांना हा कालखंड काही सापडेना. मग त्यांनी संस्कृत स्तोत्रे, पोथ्या शोधायला सुरवात केली आणि काय आश्चर्य! सापडला! हा कालखंड त्यांना सापडला!! देवीसप्तशतीमधे 11 व्या अध्यायात 46 व्या श्लोकात भारतात भयंकर दुष्काळ पडणार असल्याचे भाकित तेव्हाच्या हवामान तज्ज्ञानी केले असल्याचा उल्लेख आहे. आपल्याकडे कुठल्याही गोष्टीचे श्रेय स्वतः घेण्याची पद्धत नव्हती; त्यामुळे देव/देवी म्हणाली म्हणत, देवाला/देवीला श्रेय देऊन ऋषीमु...