Posts

1 ‘‘ आपली झाडं आपले प्राणी ’’ (सुजला सुफला सस्यश्यामला)

  रसिक वाचक हो! ‘‘सुजला सुफला सस्यश्यामला’’   ही नवीन लेखमाला आपण सुरू करत आहोत. लेखमालेचं शीर्षक हे आपल्या भारतभूमीशिवाय दुसर्‍या कोणाला लागू होणार? भारतभूमीविषयी विशेष प्रेम, आस्था असलेल्या अरुंधती प्रवीण दिक्षित ह्याची ही लेखमाला आपल्या मासिकात   आपण समाविष्ट करत आहोत. जरूर वाचा. ‘‘सुजला सुफला सस्यश्यामला’’ ( feb.) 1 ‘‘ आपली झाडं आपले प्राणी ’’ असच एक बेट आहे. त्याचं नाव आहे रॉड्रिग्ज! मॉरिशसच्या अखत्यारीत येणारं! मॉरिशस सरकारच्या कामानिमित्त श्री. दीक्षितांबरोबर त्या बेटावर 4-5    दिवस राहण्याचा योग आला. श्री. दीक्षित आणि त्याच्या सार्‍या टीमसोबत छोट्याशा एअरपोर्टवर उतरलो. सरकारी गाडी न्यायला आली होती.   गाडीत रेडिओ चालू होता .  आम्ही गप्पा मारत असतांनाच ड्रायव्हरने रेडिओवर चालू असलेल्या बातम्यांकडे आमचं लक्ष वेधलं .  इंडियाहून आपल्या मदतीसाठी मॉरिशसला आलेले भारतीय डेलिगेशन रॉड्रिग्जला पोचल्याचे ठळक बातम्यांमधे सुरवातीलाच सविस्तर सांगत होते . ‘‘ भारतीय डेलिगेशनचं स्थानिक प्रशासनातर्फे स्वागत असो’’! असं सांगितलं जात होतं.   मला त्...

धियां साक्षी शुद्धः –

  धियां साक्षी शुद्धः –   महाभारतातील भीषण युद्धाचं वर्णन गीते च्या   सुरवातीला असलेल्या गीता-महातम्यातील श्लोकात दिलं आहे. तो श्लोक असा   आहे, भीष्मद्रोणतटा जयद्रथजला गान्धारनीलोत्पला शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला । अश्वत्थामविकर्णघोरमकरा दुर्योधनावर्तिनी   सोत्तीर्णा खलु पाण्डवै रणनदी कैवर्तकः केशवः ।। म्हणजेच, जी रोरावत जातसे रणनदी संहारकारी महा भीष्म द्रोणचि काठ दुर्गम तिचे ना लागती जे करा । सूडाने गढुळे जयद्रथरुपी पाणी जिचे सर्वथा जेथे धूर्त लबाड त्या शकुनिच्या जाळ्याच नीलोत्पला ।।   लाटां भीषण उंच ह्या धडकती राधेयरूपी महा लाभे वेग महा भयानक तिला योद्धा कृपाचार्य हा । घेई जी वळसेचि घातक जिला दुर्योधनी भोवरे अश्वत्थाम विकर्ण शल्य मगरी मासे महाकाय ते ।।   गेले पार करोनि ती रणनदी कौंतेय ते सर्वही नावाडी असताच केशव कशी जाणार ना नाव ती । लाभे ज्यासचि कृष्णसंग बरवा चिंता तयासी नसे जाई पार करोनि तो भवनदी चित्ती जया कृष्ण...

एकाम्रवन आणि जगन्नाथ -

  एकाम्रवन आणि जगन्नाथ -   पुरीच्या जगन्नाथासमोर उभे होतो.   महा प्रचंड गर्दी , सतत दूर दूरहून येणारे लोकांचे लोंढे , मंदिरात पाय ठेवायलाही जागा नाही , उड्या मारून मारून घेतलेले जगन्नाथाचे दर्शन , त्यातही गाभार्‍याचा दरवाजा असा काही अर्धवट उघडलेला किंवा   जास्त करून लावलेला की त्यातून बलराम दिसेल पण कृष्ण दिसूच नये . वाकवाकून दिसला दिसला म्हणत चित्तचोराचं झालेलं दर्शन-- (आपल्या मंदिरांमधे दरवाजे अर्धवट उघडे ठेवायच्या, चारी बाजूंना मोठे दरवाजे असूनही एक छोटासा दिंडी दरवाजा एघडा ठेवायचा, देवाचा दरवाजा किंवा पडदा अचानक चालू बंद करायच्या   मंदिरवाल्यांनी शोधलेल्या प्रथा ह्या चेंगराचेंगरी होण्यास जास्त पोषक आणि स्टँपीडमधेच भक्तांना मोक्ष प्रदान करणार्‍या असतात का?) सगळच जरा मनाला नाराजीकडे झुकवणारं होतं. लांबून लांबून शेकडो बसेस भरभरून आलेल्या गरीब सुदाम्यांच्या आणि सुदामदेवींच्या चेहर्‍यावरील श्रद्धा आणि कृष्ण भेटीचा आनंद पाहून मलाच जरा खजील झाल्यासारखं वाटत होतं. खूप दिवस पुरीच्या जगन्नाथाला जायच जायचं म्हणूनही जाणं राहून जात ह...