Posts

रामायण Express – भाग 11 काशी विश्वनाथ ते सीता समाहिता स्थल

    रामायण Express – भाग 11 काशी विश्वनाथ ते सीता समाहिता स्थल   यः पठति लिखति पश्यति परिपृच्छति पण्डितान् उपाश्रयति । तस्य दिवरकिरणैः नलिनिदलमिव विकास्यते बुद्धिः ।।   सूर्य किरणांमुळे कमळाच्या पाकळ्या जशा हळु हळु उमलत जात पूर्ण कमळच छान उमलतं; त्या प्रमाणे जो वाचतो, म्हणतो, पाठ करतो, लिहून काढतो, पहातो, परत परत प्रश्न विचारून आपल्या शंकांचं निरसन करून घेतो, अनुभवी, विद्वानांच्या सहवासात राहतो; त्याला हुशार होण्यासाठी अमका क्लास, तमकी ट्यूशन असे अजून वेगळे कष्ट घ्यावे लागत नाहीत. तो हळु हळु सहजपणे विद्वान होतो. त्याच्या बुद्धीचा   विकास होतो.   दशरथनंदन श्रीरामाचं शिक्षण वसिष्ठ महर्षीकडे उत्तमपणे चालू होतं. वेद, शास्त्र ह्यांचं वाचन, पठण, मनन, लिखाण सर्व यथासांग चालू होतं. समस्यांकडे राजकुमाराने कसं पहावं ही दृष्टीही वसिष्ठांकडून त्याला मिळाली होती. पण पुढील म्हणजे--- पश्यति, परिपृच्छति, पण्डितान् उपाश्रयति   ह्या तीन्हीची कसर विश्वामित्रांनी भरून काढली.   ह्या विशाल जगाचा प्रत्यक्ष अनुभव, तेथील समस्या, त्यांचे बारकावे, प्...

रामायण Express – भाग 10 सरयु गंगा संगम

  रामायण Express – भाग 10 सरयु गंगा संगम राजा दशरथ विश्वामित्र ऋषींसोबत रामलक्ष्मणांना पाठवण्यास धजत नव्हता. नसनसत्या शंका आणि भीतीने तो हादरून गेला होता. तेव्हा वसिष्ठ महर्षी राजा दशरथाला म्हणाले, ‘‘हे राजा, राम, लक्ष्मण अस्त्रविद्या जाणत असोत वा नसोत राक्षस त्यांच्या केसालाही धक्का लावू शकणार नाहीत. चारही बाजूंनी धगधगणार्‍या अग्नीनी सुरक्षित केलेल्या जागी ठेवलेल्या अमृताला ज्या प्रमाणे कोणी हात लावू शकत नाही त्याप्रमाणे कुशिकनंदन विश्वामित्रांकडे सोपवलेल्या ह्या राजकुमारांना कोणीही राक्षस वक्र दृष्टीने पाहू शकणार नाहीत.’’ ‘‘विश्वामित्रांच्या प्रचंड क्षमतेबद्दल तू शंका घेऊ नकोस.’’ वसिष्ठांनी राजाला   धीर देत सांगितलं, ‘‘विश्वामित्रांचा केवढा प्रभाव आहे हे मोठ्या मोठ्यां देवदेवतांना, राजामहाराजांना अजून माहित नाही; पण ही सर्व अस्त्र प्रजापति कृशाश्व ह्यांनी तयार केलेली आहेत आणि ती सर्व विश्वामित्रांकडे सोपवली आहेत. त्या अस्त्रांचा विधिवत् वापर फक्त तेच जाणतात. जी अस्त्र आज उपलब्ध नाहीत, ती तयार करण्याची प्रचंड क्षमता फक्त विश्वामित्रांकडेच आहे. स्वतः एकटे विश्वामित्र...

रामायण Express भाग - 9 बक्सर

  रामायण Express भाग - 9 बक्सर Railway, Bus, आणि E-Rickshaw ह्यांचे पेड गुंफत आमची त्रिवेणी यात्रा सुरू होती. इतिहासाचा घटनाक्रम जरी मागेपुढे होत असला तरी फार फरक पडत नव्हता. रामायण आपल्या रक्तात बालपणापासून असल्यामुळे रामायण कालीन घटनेला अनुस्यूत असलेली, पण न पाहिलेली/माहित नससलेली   ती पवित्र स्थानं मनातल्या रिकाम्या जागांमधे अपसूक जाऊन बसत होती. काल सीतामढी रोड वरून निघालेली रामायण express बक्सरला पोचत होती. बक्सर म्हटलं की, ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध बनारसचा राजा बलवंतसिंह, बंगालचा नबाब मीर कासीम आणि अवधचा नबाब शुजाउदौला ह्या तिघांनी एकत्र येऊन 22,23 ऑक्टो. 1764 मधे झालेली बक्सरची लढाईच आपल्याला माहित असते. दुर्दैवाने तेव्हा विस्तारवादी ईस्ट इंडिया कंपनीने हे युद्ध जिंकून बिहार,बंगाल अवध ह्या अत्यंत समृद्ध क्षेत्रातून सारा वसुलीचे अधिकार मिळवले आणि भारताची आर्थिक घडी पार विस्कटवून टाकली. हेच बक्सर शहर रामाच्या पराक्रमासाठी प्रसिद्ध असल्याचं ऐकून मात्र फार प्रसन्न वाटलं.   सकाळचा चहा ब्रेकफास्ट आटोपून मंडळी रामरेखा घाटच्या दिशेनी निघाली . ग्रीन रिक्शा...