Posts

रानफुले -

  रा न फु ले - कोणीही न लावता, रानात उगवणारी ती रानफुलं! त्यांना कुंडीत, सज्जात, मानवाने बनवलेल्या बागांमधे रुची नसते. तेथे त्यांचा जीव घुसमटतो, मोकळ्या आकाशाखाली, निसर्गाच्या सानिध्यात, वसुंधरेच्या कुशीत, माळरानांवर, दगडांच्या खोबणीत, कडे-कपारीत, पठारांवर , सूर्यासोबत हसत, वार्‍यासवे डुलत डोलत, बरड वाळवंटात पाय रोवून; तर धुवाँधार पावसात न कुजता न मोडता, ती त्यांच्या मनस्वी जगण्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतात. कोमल तर इतकी की, तोडली तर लगेच सुकून जातात. कृष्णाच्या सोबत्यानी गुंफलेल्या ह्या रानफुलांची कायम ताजी टवटवीत राहणारी आपाद वनपुष्पमाला म्हणजेच पायापर्यंत रुळणारी माळ कृष्णाच्या गळ्यात असल्याचे उल्लेख अच्युताष्टकात आहेत(श्लोक7). वृत्तही मोठं गोड ‘स्रग्धरा!’ त्याचा अर्थच   पुष्पमाला धारण करणारं! मराठीत श्लोकाच्या ओळीचा अर्थ देते- रानपुष्पेच   ताजी   सुगंधी   अती सोबत्यांनी   खुडोनीच   जी   गुंफिली कृष्णकंठी   रुळे   पुष्पमालाच   ती गोजिरी   बाळमूर्ती   दिसे   साजिरी   ।। रानफुलांचा कोमल ताजेपणा टिकू...

घनघनमाला

  घ न घन माला आपल्या तृषार्त भूमीला कायम मेघांची ओढ लागलेली असते. सूर्य दर्शन नाही असा लांबलचक काळ आपल्याकडे नसतो. तिन्ही मौसम साही ऋतु आपल्या आपल्या वेळेला येऊन भारतावर कृपेचा वर्षाव करत असतात. वर्षभर सततचा पिरपिर पाऊस---"आता तरी जा बाबा—" असा नकोसा नाराज सूर लावू देत नाही. उन्हाळ्याने धरणी तापून माती मोकळी मोकळी होत असताना चिमण्या आणि पक्ष्यांनी मातीत पंख फरफर करत मृत्तिका स्नान सुरू केलं की; कावळ्यांनी घरटी बांधायला सुरवात केली की; गुलमोहराने आपली लालचुटुक छत्री उघडली की; अमलतासाने आपल्या कानात पुष्कराजाची पिवळी कर्णफुले माळली की; कडुनिंब आणि आंब्यावर पुन्हा लाल चमकदार पालवी डोकावू लागली की; आकाशात अगस्तीच्या तार्‍याचा अस्त झाला की; पावशाने ‘पेरते व्हा’ ची साद घातली की ---------- !!!   आकाशातून ढगांचे गोळे आनंदानी डोकावून पाहू लागतात. दही घुसळायला लागल्यावर थोडे थोडे लोण्याचे अस्तित्व जाणवावे तसे निळ्याशार आकाशात वार्‍यानी घुसळायला सुरवात केली की ढगांचे हलके हलके उमटणारे फरकाटे हळुहळु लोण्याच्या गोळ्यांसारख्या ढगांमधे एकत्रित व्हायला लागतात. आकाशात पांढरे ढग्गु गोळे दा...