रामायण Express – भाग - 17 खर दूषणाचा निःपात
रामायण Express – भाग - 17 खर दूषणाचा निःपात सुहृत् हो! कोशल किंवा कोसलाची राजधानी अयोध्या आणि पूर्ण उत्तर प्रदेश, बिहार, नेपाळ, मध्यप्रदेश आणि तेथून महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगाणा हा कितीक योजनांचा आत्ताच्या भाषेत बोलायचं तर मैलांचा किंवा किलोमिटरचा प्रवास हा केवळ अंतराचा हिशोब नसून रामाच्या जीवनाचा अभूतपूर्व प्रवास होता. आजही ही श्री राम चरित-सरिता गुप्त सरस्वती नदीप्रमाणे भारतभर अदृश्यपणे प्रत्येक पर्वत, शिळा, खडक आणि मातीच्या कणाकणाखालून वहाते आहे. प्रत्येक भारतीयांच्या विचारविश्वाला हलकेच स्पर्श करत चैतन्याला एक नवा जोम देत आहे. ‘ठुमक चलत रामचंद्र बाजत पैंजनियाँ’ --- ह्या रामलला पासून आकाशीचा चंद्र मागणारा ---- कौसल्येचा बालक राम ---- ते कमरेला तलवार, हातात धनुष्य खांद्यावर बाणांचा भाता लावून विश्वामित्रांसोबत कानावर भुरभुरू उडणारे केस येणारा, कानांवर केसांच्या लाडिक लडी रुळणारा (काकपक्षधारी) 12-13 वर्षांचा कुमार दशरथनंदन राम; --- ते विश्वामित्रांकडून अनेक विद्या शिकून तयार झालेला विजयी विनयी कोदंडधारी राम; --- अनेक राक्षसांचा निप्पात करणारा आत्मविश्वासाने परि...