Posts

Showing posts from June, 2024

पुणे ते दिल्ली by गोवा express

  पुणे ते दिल्ली by गोवा express Dear शेकरू , शिंगरु, कांगारू, & My Dear लेकरु,            Here starts our journey on the foot marks of Shri Ram by Ramayan Express. One day Aba found out that there are exiting travel packages offered by IRCTC and he comfortably booked our tickets on line.   *४मार्च* At wee hour at 3:30 am lekaru (Kanad) dropped us at Pune station  and without any hassle we boarded the 🚂 train ! खड्डक् with a big sound and with 💥 bang, engine joined the train ; Changing the direction of  Goa Express . …And started the train in the same direction it came from ; but at different destination. We were going to Delhi. Sky was dark and with every second its shades were changing from dark black to deep blue . On the Bright Red pink horizon bright shining प्रभात तारा(Vines ) and little upward in the sky , bright white sparkling crescent moon! After a long time we were watching them together, shining in their true spirit along with the horizon. ……..,… T

रामायण Express- ची माहिती

  रामायण Express- ची माहिती    IRCTC तर्फे जाणार्‍या रामायण express च्या   प्रवासाची माहिती देण्याचा प्रयत्न करते. तुम्ही IRCTC अ‍ॅप डाऊनलोड केलं असेल तर त्यांच्या विविध टूर्स व पॅकेजेस् ची माहिती मिळते. ही ट्रेन दिल्लीच्या सफदरजंग स्टेशनवरून सुटते. हॉटेल लीला शेजारी सफदरजंग स्टेशन आहे. दिल्लीला आपण आपले पोचायला लागते. ट्रेन दिल्लीहून सुटते व शेवटी दिल्लीलाच शेवटचा थांबा असला तरी आपण (महाराष्ट्रवासी) त्या आधी नागपूरला उतरू शकतो. त्याप्रमाणे परतीचे रिझर्वेशन रामायण express च्या नागपूरला पोचण्याच्या वळेनुसार आधीच करून ठेवलेले उत्तम. रामायण express   ही संपूर्ण ट्रेन श्रीराम भारतवर्षात ज्या जया जागी गेले त्या त्या मुख्य जागी तुम्हाला घेऊन जाते. एक टोपी, छत्री व गळ्यात घालायला   I Card दिले जाते. त्यावर लाावायला आपला 1 फोटो बरोबर असलेला बरा. AC Coupe   AC First class, AC second class, AC Third class अशी   संपूर्ण ट्रेन AC आहे. बेडिंग, टॉवेल ची सोय उत्तम असते. ट्रेनमधे स्नानासाठी गरम पाण्याचे शॉवर्स/ बादलीबाथ मस्त! ट्रेनमधेच Restaurants अप्रतिम असतात. पोटोबाची काळजी करावी लागत

रामायण Express भाग 29 यात्रा -

  रामायण Express भाग 29 यात्रा - आपल्या ज्या कोणी दूरदृष्टीच्या पूर्वजांनी, ऋषी, मुनींनी ‘तीर्थयात्रा’ ह्या प्रवास प्रकाराची सुरवात केली; त्यांच्या दूरदर्शीपणाला वारंवार नमन! भौगोलिक दृष्ट्या भारताचा भूभाग एकसंध होता आाणि आहे. पण!! तीर्थयात्रेच्या निमित्ताने मनानेही सर्व भागातील भारतीयांना एकमेकांना सांधत राहिला. जोडत राहिला. तीर्थक्षेत्रे फक्त धोंडा पाणी राहिली नाहीत; तर पवित्र गंगा, यमुना, नर्मदा, कृष्णा, कावेरी, तुंगभद्रा अशा अनेको अनेक नद्यांचं जल शरीरातील रक्तवाहिन्यांप्रमाणे समाजाच्या धमन्या धमन्यांमधून वाहत राहिले; आणि भारतीयांच्या हृदयातील एकत्वाच्या भावनेला पुष्ट करत राहिले.     ह्या नद्यांच्या जलौघासमवेत एकरूप असलेल्या सनातन संस्कारांनी विविध समाजातील, विविध क्षेत्रातील मनामनांना सांधत, बांधत भारताची सामाजिक, ऐतिहासिक, भौगोलिक, सांस्कृतिक   अशी अन्तर्बाह्य एकात्मता निर्माण केली. यात्रा एका जागेहून दुसर्‍या जागी जाण्याचा नुसता विनाउद्देश प्रवास न राहता ‘आपल्या’ देशाचा ‘आपल्याला’ परिचय घडवण्यासाठीची ‘‘भारत अनुभूती यात्रा’’ झाली.   ‘आपल्या’ नदया, ‘आपले’   पर्वत, ‘आपली’ जं

रामायण Express - भाग - 28 रामटेक (नागपूर)

Image
  रामायण Express - भाग - 28 रामटेक (नागपूर) सुहृत् हो! आमच्यासोबत ऑस्ट्रेलिया, अमेरिका, इंग्लंड मधे स्थायिक झालेले काही परदेशस्थित अनिवासी भारतीय ही होते. ललिता लंडनहून आली होती. तिचे पणजोबा गुजरातमधे मातीची भांडी बनवणारे कुंभार होते. आज ती लंडनमधे रहात होती. सम्पन्न होती. भारतप्रेमाने भारत यात्रेसाठी आली होती. आम्ही रामेश्वरला आलो तेव्हा मंदिरात लवकर दर्शन होण्यासाठी मैत्रिणींशी बोलत बोलत तिने मोठ्या पर्समधून पाकिट काढलं. तिकिट काढून छोटं पाकीट पर्समधे टाकलं. दर्शन करून मंदिराबाहेर आल्यावर काही किरकोळ खरेदीसाठी पर्समधे हात घालते तो काय!---- पाकिटच नाही. भयंकर घाबरली. मटकन खाली बसली. जणु ब्रह्मांड आठवलं. सगळं जग आपल्याभोवती फिरतय वाटायला लागलं. तिच्या पायातले त्राणच गेले. पाकिटात पासपोर्ट, सर्व पैसे, महत्त्वाचा दैस्ताऐवज सर्व काही होते. त्यांच्याविना ती परतीचा प्रवास करू शकत नव्हती. पैसे नसल्याने परत गुजरातलाही जाऊ शकत नव्हती. देवळाच्या दरवाजातच पोलीसचौकी होती. ती मैत्रिणींसोबत धावत धावत चौकीत गेली. झालेली गोष्ट सांगितली. पोलीस शांतपणे तिला चौकीत घेऊन गेला. एक पाकिट काढून तिच्यास

रामायण Express – भाग 27 वाल्मिकी रामायण- सीतेच्या शोधात वानरसेना-

  रामायण Express – भाग 27 वाल्मिकी रामायण- सीतेच्या शोधात वानरसेना- मित्रांनो, भूतकाळात घडलेल्या प्रसंगांची सुसंगतवार शृंखला आपल्याला माहित असते; त्यामुळे त्यातील कुठला प्रसंग असा घडला असता तर--? ह्या विचारांनी मन तितकं आशंकित होत नाही. मनाचा थरकाप होत नाही कारण भविष्यातली पुढची घडी, पुढचा क्षण काय झाला होता हे ज्ञात असतं. धक्क्याची तीव्रताही   पातळ झालेली असते. पण तोच प्रसंग वर्तमानकालात चालू असला तर आपण त्या प्रसंगातील पात्र असू शकतो. प्रत्येक प्रसंग असा घडेल का तसा घडेल ह्या भीतीने , काय योग्य काय अयोग्य, कुठला मार्ग आपल्याला यशापर्यंत पोचवेल? इत्यादि विचारांनी शंकित असतो.   वालीपुत्र अंगदाचंही तस होत होतं.   सुग्रीवाच्या आज्ञेनुसार सर्व वानर सीतेला शोधायला बाहेर तर पडले पण म्हणावं तसं यश येत नव्हतं. सुग्रीवाने घालून दिलेली 1महिन्याची मुदतही संपली होती. मयसूराने निर्माण केलेल्या एका गुहेत सर्व वानर गेले खरे पण त्या गुहेतून बाहेर पडायचा रस्ता बंद झाल्याने त्याना उशीर झाला होता. स्वयंप्रभा नावाच्या तापसीने त्याना बाहेर काढले. आपण परत गेलो तर सुग्रीव आपल्याला देहदंड देईल ह्या

रामायण Express – भाग 26 भद्राचलम्

  रामायण Express – भाग 26 भद्राचलम् रामेश्वरम् ह्या तामिळनाडू प्रांतातून   तेलंगाणातील भद्राचलम् च्या दिशेने आमचा प्रवास सुरू झाला. सकाळी 11 वाजता अचानक तेनाली गाव दिसलं आणि तैलबुद्धीचा हजरजबाबी तेनालीराम भेटल्याचा आनंद झाला.   चिलुवुरूला असंख्य क्रॉस दसत होते. तर कोलुनकोडा ला एकमेव पर्वत जमिनीतून वर आलेला दिसत होता. ह्या भागामधे डोंगर रांगा नसून असे एकटे दुकटे पर्वत/ धराधर अधूनमधून दिसतात. अयोध्येला रामललाच्या प्राणप्रतिष्ठे निमित्ताने मोदीजींनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देणारे   तुरळक भगवेध्वज दक्षिणेत प्रथमच दिसले. आत्ताच्या लोकसभेच्या निडणुकात दक्षिणेत मोदिजींना मिळालेला विजय जणु आम्हाला आधीच कानात गूज सांगून गेला होता. कृष्णेचं भव्य पात्र अनेक ठिकाणी नाममात्र दिसत होतं. पाण्याबरोबर वाहून आलेल्या वाळूने ते भरलं होतं. ठिकठिकाणी म्हशींचे तांडे त्यात निवांत रमतगमत चालले होते. कुठे भल्या मोठ्या पुलांच बांधकाम अर्धच राहिलेलं दिसत होतं. तेवढ्यात विजयवाडा जं. आलं. आणि निळी पांढरी चपल चुणचुणीत वंदेभारत ट्रेन आली. सामान घ्यायला इ-रिक्शा आली. आजादी का अमृत मोहोत्सव लिहिलेल्या मालगाड्य

रामायण Express – भाग 25 रामेश्वरम्

Image
  रामायण Express –   भाग 25 रामेश्वरम् आपली रामायण Express ट्रेन नेहमीच्या वर्दळीच्या स्टेशन्सना न थांबता मुख्य स्टेशन पासून जरा जवळपासच्या स्टेशनवर थांबत असे. नित्याच्या वेळेवर धवणार्‍या ट्रेन्सच्या दिनचर्येत त्याने ढवळाढवळ न होता रामायण express चे यात्री जरा आरामात चढू उतरू शकत. ट्रेन थांबली आणि दरवाजे उघडले की ट्रेनचे शस्त्रसज्ज गार्डस लगेचच त्या त्या डब्याच्या दरवाज्या समोर सज्ज उभे असत. कोणा अनाहूत बाहेरच्यांना आत प्रवेश करू देत नसत. त्यामुळे चोर, लुटारूंपासून गाडी शतप्रतिशत सुरक्षित असे.   निर्धारित वेळेवर धाणार्‍या महत्त्वाच्या ट्रेन्सना प्राधान्य मिळणे योग्यच असल्याने काहीवेळा ठरलेल्या वेळापेक्षा थोडा उशीर झाला तरी पुढच्या गंतव्यापर्यंत जायला बसेसही बाहेर वाट बघत असत. पुढच्या हॉटेल्सचे व खोल्यांचे आगाऊ राखीव आरक्षण असल्याने त्यासाठी यात्रींना टेन्शन घ्यायची गरज नसे. संध्याकाळी पाच वाजता आमची ट्रेन मदुराईपासून 54 कि.मि. वर असलेल्या मनमदुराईस पोचली. पुढे रामेश्वरम्   पर्यंतच्या बस प्रवासाला तीन तास लागणार असल्याने निघण्यापूर्वीच `हाय टी’ची काळजी ट्रेनमधे घेतली गेली होती. डि